Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास २

क — कानडाऊ योगेशु, Wed, 04/27/2016 - 09:22
.. .. रात्रीच्या रेल्वे प्रवासात नेहेमीसारखेच तु लोअर बर्थवर व मी मिडल बर्थवर पडतो.. झोपायच्या आधी मी पुन्हा समोरच्या साईडबर्थवर पहुडलेले सुंदर प्रकरण किलकिल्या डोळ्यांनी बोगीच्या सरकारी मंद प्रकाशात.. न्याहाळण्याचा प्रयत्न करत असतो.. थोडा वेळ जातो आणि अचानक कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु) तुझा हात येतो.. अन पाठोपाठ तुझा आवाज... ..अहो... झोपलात का? ...नाही? ...हात द्या हातात...! हे नेहेमीचेच असते! मी ही हातात हात देतो.. माझ्या बोटांशी लडिवाळपणे तू खेळत राहतेस.. थोडा वेळ जातो अन समजते.. मी तुझ्या प्रत्येक बोटांचे हलकेच चुंबन घेतो... मग तू हात खाली घेत म्हणतेस.. झोपा आता निवांत..आंणि सांभाळून.. नाहीतर खाली पडाल..! समोरचे सुंदर प्रकरण किंचित हसल्यासारखे वाटते..... बर्रर्रर्र ..माझ्या फोनवर मेसेज येतो.. ..ती झोपली...आता झोपा तुम्हीसुध्दा...! तेव्हाच इंजिनची शिटी वाजते... अन रेल्वेच्या खडखडात मला गडगडाटाचा भास होतो.. मला तिथे तेव्हा तू खरोखरच एखाद्या पल्लेदार प्रवासासारखी खूप खूप आवडतेस....! - कानडाऊ योगेशु (टू बी कंटीन्युड....) तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास १!

प्रतिक्रिया द्या
3326 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ज
जेपी Wed, 04/27/2016 - 09:27 नवीन
=)) आवडल..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 04/27/2016 - 09:27 नवीन
अरे वा. मस्त हे पण. आमच्या चौराकाकांचा बांगडीवाल्या हातात दोरी असलेला पोपट आठवला. ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 04/27/2016 - 09:33 नवीन
आता आगीन गाडीत पण ? तरी अजून बोट-बैलगाडी-चारचाकी-रिक्षा-दुचाकी-सायकल राहिले आहेत. याची नोंद घेणे. स्वगतः जबरा लिहितोय हा योग्या.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 04/27/2016 - 09:44 नवीन
अवघडे! अवघडल्यासारख होतंय आता...! ;) Sandy
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव Wed, 04/27/2016 - 09:50 नवीन
थोडक्यात 'पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन' आवडते म्हणा की....!
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Wed, 04/27/2016 - 10:30 नवीन
Vice-versa कधी घेउन येणार?
  • Log in or register to post comments
झ
झेन Wed, 04/27/2016 - 13:55 नवीन
मन वढाय वढाय उभया पिकाताल ढोर किती हाकल हाकलं फ़िरि येत पिकाव असं बाहिणाबाईंनी नेमक्या शब्दात सांगितल आहे.ते प्लेन, ट्रेन आणि बोट मधे पण लागू आहे.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 04/27/2016 - 14:52 नवीन
धन्यवाद मंडळी.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 04/27/2016 - 16:24 नवीन
लय भारी !
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Wed, 04/27/2016 - 17:52 नवीन
हे सहिय यार..........
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 04/27/2016 - 19:24 नवीन
जरा मसाला कमी पडला का यात!?
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 04/27/2016 - 22:17 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 04/28/2016 - 05:15 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 04/28/2016 - 06:13 नवीन
आवडंलं हे पण आणि या आधीचे पण.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/28/2016 - 06:34 नवीन
लैच आवडलं ! -दिलीप बिरुटे (सहप्रवासी)
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 04/28/2016 - 08:06 नवीन
-दिलीप बिरुटे (सहप्रवासी)
आज मला "जिस स्कूल मे तुम पढते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है!" हा डायलॉग खर्या अर्थाने समजला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा