Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(तिफण गोफण)

न — नाखु, Wed, 04/27/2016 - 11:38
मुळाक्षरे १ येते ऊबळ अधून -मधून , खाजर्या धाग्याची , टाळ्याखाऊ हर्षाची , तुझ्या कुजक्या शेर्यांची , अन त्यावर केलेल्या फेर्याची … येते सणक अधून -मधून , खुसपटी लिखाणाची , निसटलेल्या अर्थाची , तुझ्या डोळ्यातील अविश्वासाची , अन एकाचवेळी मिळालेल्या खेटरांची …. येते सुरसुरी अधून -सुरसुरी रतीबाच्या गवळ्याची , लागो झकाझकींची , तुझ्या खरडीतील (केलेल्या) मातीची , अन त्या क्षणी उडालेल्या एका आय्डीची …… ==================================== मुळाक्षरे २ ज्या लिखाणाला ऊंडारायचे(च) असते वाहवायचे असते ते पाहत नाही अनुमान किती खंग्री धाग्यात आर्तता किती अर्थाची काही शक्यता वा माहीतीचा कणसूरपणा ते खफत ठेच्काळत अवांतराच्या फटीत निर्लज्ज चिकाटीने उभारते अस्तित्वाची दखल जागल्या धाग्याला घ्यायला लावते मोकळे शी.डी. खत्म जोड काव्यनिग्रह ================================================ मुळाक्षरे ३ पुख्खे आता झोडायाचे मला भय वाटते, ही पुख्खे आता झोडायाचे मला भय वाटते! रसना गुंतुनी जातेय जी पुढच्या अर्थी निःसत्वसा त्याने दोस्तांनाही कापायचे मला भय वाटते! कुंथीत माझे जाहले आहेत उदर काचांतुनी मी खाउ जाता त्या (दोंद) सुटायाचे मला भय वाटते!! हा दाटला प्रतिबंध माझ्या भोवती चोहीकडे घुसमटला वारा सुटायाचे मला भय वाटते!! आहे नेहमीचा सोडा(वाला) अजुनी कितीतरी दूरसा अन ओळखीच्या नजरा, भेटायाचे मला भय वाटते!! -घणरेघ टीप- ही गजाल नाही. गजाल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा (लिंबूपाणी मुद्दाम) बाजूला ठेवून वाचावी ही नम्र विनंती.

प्रतिक्रिया द्या
3758 वाचन

💬 प्रतिसाद (9)
व
विजय पुरोहित Wed, 04/27/2016 - 11:52 नवीन
मस्तच नाखुकाका!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 04/27/2016 - 12:03 नवीन
हायला एका दगडात तीन पक्षी? भारीच.....आवडले पैजाराबुवा,
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 04/27/2016 - 12:05 नवीन
भूछत्र, कोडाई कनाल आणि गरम पाण्याचे कुंड विसरलात???
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 04/27/2016 - 12:07 नवीन
या तीन्हीचा अर्थ काय नक्की? नव्या माणसाला पण सांगा की राव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बोका-ए-आझम Wed, 04/27/2016 - 19:13 नवीन
Dive aagar हा नवीन रस निर्माण केल्याबद्दल नाखुकाकांचा पिंचित सत्कार करावा काब्रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
प
प्रचेतस Wed, 04/27/2016 - 19:16 नवीन
हाहा. अगदी अगदी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/27/2016 - 19:29 नवीन
नाखू(न) असरदार!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 04/27/2016 - 21:03 नवीन
सॉरी नाखुकाका. नाही समजले :(
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 04/29/2016 - 09:10 नवीन
यावं म्हनून असा घामटा का काढतोस? बाकी व्यनीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा