Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकट्याने रात हि पेलावी कशी

प — पथिक, Wed, 05/04/2016 - 07:39
एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी भारलेला अंधार रातराणीच्या गंधाने मंतरले मन एका विदेही स्पर्शाने क्षणांची माया हि तोडावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी लागता लागेना काळजाचा ठाव दूर दूर कुठेतरी सखयाचा गाव धुक्यातली वाट हि चालावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी उधाणली स्वप्ने भावनांना पूर दिसेना काठ कुठे डचमळे ऊर हृदयाची नाव पार लागावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी

प्रतिक्रिया द्या
3447 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ए
एस Wed, 05/04/2016 - 07:53 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 05/04/2016 - 07:54 नवीन
आपला हात जगन्नाथ म्हणावे आणि पेलावी बिनधास्त :)
  • Log in or register to post comments
प
पथिक Wed, 05/04/2016 - 12:19 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पुंबा Wed, 05/04/2016 - 16:04 नवीन
हाहाहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ख
खटपट्या Wed, 05/04/2016 - 18:14 नवीन
आवरा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
च
चांदणे संदीप Wed, 05/04/2016 - 07:56 नवीन
आवडली! Sandy
  • Log in or register to post comments
प
पथिक Wed, 05/04/2016 - 12:20 नवीन
धन्यवाद, एस आणि संदीप !
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Wed, 05/04/2016 - 14:51 नवीन
:))
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 05/04/2016 - 16:45 नवीन
बाकी 'पेलावी' हा शब्दप्रयोग फारच तीव्र कुचंबणा दाखवतोय... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
प
पथिक गुरुवार, 05/05/2016 - 06:05 नवीन
हा शब्द वापरावा कि नाही हा प्रश्न मलापण पडला होता. अजूनही बदलायचा विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
प
पथिक गुरुवार, 05/05/2016 - 06:01 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
व
विजय पुरोहित Wed, 05/04/2016 - 15:58 नवीन
कविता चांगली आहे पण प्रत्येक कडव्यामागेः एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी याऐवजीः एकट्याने रात हि पेलावी कशी एवढाच भाग सुटसुटीत वाटतोय असे मला तरी वाटते.
  • Log in or register to post comments
प
पथिक गुरुवार, 05/05/2016 - 06:02 नवीन
मान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
ए
एक एकटा एकटाच Wed, 05/04/2016 - 16:07 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 05/04/2016 - 17:57 नवीन
भन्नाट. आवडली!
मंतरले मन एका विदेही स्पर्शाने
एकटा आहे आणि हा दुसरा देह स्पर्श कुठुन आला?
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 05/04/2016 - 17:59 नवीन
अहो विदेही म्हटलंय की त्यांनी... म्हणजे कल्पनेत प्रेमालाप चालू आहे. समजून घ्या की राव! तुम्हाला नं सगळं physicalच लागतं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
व
विजय पुरोहित Wed, 05/04/2016 - 18:00 नवीन
विदेही = non physical!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
क
कविता१९७८ Wed, 05/04/2016 - 18:14 नवीन
रात्री झोपेची गोळी घेउन टाकायची, रात्र कशी सरेल पत्ताच लागणार नाही.
  • Log in or register to post comments
प
पथिक गुरुवार, 05/05/2016 - 06:15 नवीन
चांदण्याची बरसात मिस करायची नाही ना पण ! प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
न
नीलमोहर गुरुवार, 05/05/2016 - 06:34 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव गुरुवार, 05/05/2016 - 06:47 नवीन
>>>>दूर दूर कुठेतरी सखयाचा गाव कविता कोण म्हणतंय नक्की? एकटा की एकटी की एकट्या चे इंटरेस्ट वेगळे आहेत? सखयाचा गाव म्हणजे सखीचा गाव नाही????? काय चाललंय काय नक्की?
  • Log in or register to post comments
प
पथिक गुरुवार, 05/05/2016 - 07:31 नवीन
कविता सूफी आहे. 'तो' जो सर्वांचा सखा आहे त्याच्याबद्दल आहे…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
प
पथिक गुरुवार, 05/05/2016 - 07:32 नवीन
सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा