रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा ??
पोलिसांच्या राजेबद्द्ल ची हि बातमी वाचून एक सलत असलेला विषय मांडावासा वाटतोय.
आपल्या कडे एकूणच रजा घेणे हे काहीतरी चूक, पाप, अनैतिक किंबहुना अनावश्यक आहे ...नाईलाज म्हणून रजा हा प्रकार अस्तित्वात आहे अशी काहीशी मानसिकता आहे. रजा देणारा, स्वत:च्या खिशातून काहीतरी मेहेरबानी म्हणून दिल्यासारखी रजा देतो आणि घेणारा रजा मिळाली कि 'हुश्श' करतो असे सर्वसाधारणपणे दिसते. पुलंनी म्हटल्याप्रमाने (विनोदाने का होईना) "कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची १२०० सुलभ कारणे" वगैरे हे ह्याच मानसिकतेची अपरिहार्य परिणती आहे. आपल्याकडे आपण जनरली १ २ दिवस रजा घेतो पण ती घेतांना काहीशी चोरटे पणाची भावना असते... रजेवर गेलास तरी फोनवर उपलब्ध राहा अशी मूक आज्ञा बॉसच्या चेहेऱ्यावर स्वच्छ लिहिलेली असते ...आणि क्वचित वेळीप्रसंगी रजा रद्द करून परत यावे लागण्याची उदाहरणे पाहिलेली आहेत.
पाश्चात्य जगात लोक २ -२/ ३- ३ आठवडे रजा वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा अगदी सहज घेतांना दिसतात .. ...कामाची काही का आग लागेना रजा रद्द करून परत आलाय किंवा रजेवर गेलाच नाही ...असे मी कधीही पहिले नाही ...
जे हक्काच्या रजेचे तेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्ट्यांचे, आपल्याकडे कुणीही कधीही कुणालाही फोन करून कामाचे बोलू शकतो, पाश्चात्य जगात सुट्टी सोडा कामाचे तास सोडून कुणी फोनवर एरवी प्रतिसाद सुद्धा देणार नाहीत (ह्याला अपवाद म्हणजे खरोखरीचे काहीतरी जबरदस्त कारण असते).
ह्याच्यावर कडी म्हणजे रजा किती साठवता येते ह्यावर दिवसेंदिवस येणारी बंधने ...म्हणजे वरच्या रजांचे नं पैसे मिळणार नं त्या पुढे घेण्याची सुविधा मिळणार ...आणि त्या फक्त वाया जाणार म्हणजे पर्यायाने कर्मचार्याचे नुकसान ...
माझा अनुभव खाजगी क्षेत्रातला आहे पण सार्वजनिक क्षेत्रात फार बरी परिस्थिती असेल असे वाटत नाही ..
हे असे का ? बदलायला नको का ?काय करता येईल ?
जाता जाता : माझ्यापुरते बोलायचे तर मी माझ्या टीम्स मध्ये रजेला कधीही नाही म्हणत नाही, कारणांची उलटतपासणी नाही किंबहुना रजा घेण्यासाठी उद्युक्त करतो ... जेणेकरून टीम मध्ये एक तणावरहित वातावरण निर्माण होते .. लोक एकमेकांची जास्त काळजी घेतात आणि एकमेकांच्या रजांमध्ये कामाची खोटी होऊ देत नाहीत ...आणि त्यातून काही खोटी झालीच तर मी जबाबदारी घेऊन कुणाला झळ बसू देत नाही आणि ह्यामुळे खरे तर उरला सुरला तणाव सुद्धा नाहीसा होतो ...
होमात टाकुन द्यायचा आधी फोन आणि मग जीवन मरणाच्या शपथा घ्यायच्या गोल गोल फिरुन.हा केवळ पिरा प्रतिसाद !! इतर सर्व परखड सत्य ! बादवे, ते बोका-ए-आझम, मृत्यंजय नाहीत... की तुम्ही त्यांचे गुपित उघडे केले आहे ;) =))अशा पध्दतीने मर्जी राखुन बाकीच्यावर अरेरावी करणार्यांचा सुळसुळाट झाला आहे.स्वबळावर सन्मानाने जगणर्यांची अशा वेळी खुप परवड होते.याबाबत असे म्हणता येईल की... जशी कंपनी आपल्याला हव्या त्या चांगल्या कर्मचार्यांच्या शोधात असते, तसेच चांगले (पक्षी : आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास असणारे आणि सन्मानाने राहण्याची इच्छा व धमक असणारे) कर्मचारी आपल्याला हव्या त्या चांगल्या कंपनीच्या शोधात असतात. कमी जास्त वेळाने दोघे एकमेकाला सापडले तरच तोच संबंध "प्रेमाचा" होतो... अन्यथा किंवा तशी संधी मिळेपर्यंत "तडजोडीचा मामला" चालू ठेवणे ही खर्या जीवनातली तडजोड करावीच लागते :) मात्र, वरच्या चांगल्या कर्मचार्यांच्या व्याख्येत न बसणार्यांना ती तडजोड बहुदा जीवनभर करावी लागते. :(एखादी कंपनी एका विशिष्ट माणसावर इअतकी वलंबून राहत असेल तर ते त्या कंपनीचे व्यावसायिक अपयश आहे.१००% खरे. म्हणूनच वर म्ह्टले आहे की...नोकरी असो वा व्यवसाय, सेवा देणारा (कर्मचारी / व्यावसायिक) आणि सेवा घेणारा (कंपनी / ग्राहक) यांच्या संबंधामधे कोणाला गमावण्याची कोणाला जास्त भिती वाटते हा कळीचा मुद्दा असतो (Who is afraid of losing whom, is the key.) दुसर्याला गमावणे ज्या बाजूला गैरफायद्याचे वाटते ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते.दोन्ही बाजूंना आपले स्थान उंचावण्याची समज, गरज आणि संधी असली तरच स्पर्धा निरोगी राहते आणि मगच एकमेकाला एकमेकाची किंमत "नीट" समजणे आणि राखणे शक्य होते.