Holiday मेंबरशिप कंपन्यांबद्दल माहिती हवी आहे
मंडळी नमस्कार __/\__
मला व सौ ला भटकायची आवड आहे.
आता थोडी सवड आणि पैस्याची जुळणी झालीये, त्याचवेळी एका कंपनीच्या २५ वर्षांच्या membership बद्दल ऐकल.
आपल्या मिसळ्पाव नग्रीत कुणी अशी membership घेतली आहे का?
मार्गदर्शनाच्या व भल्या बुर्या अनुभवान्च्या प्रतिक्षेत...
शिवाय, दुसरी कुठली संस्था चांगली-वाईट असेल तर कृपया कळवा...
-सुखी
(काही भाग संपादित)
💬 प्रतिसाद
(54)
न
नितिन थत्ते
Wed, 05/11/2016 - 04:48
नवीन
या कंपन्यांचे प्रतिनिधी ज्या 'कॉस्ट सेव्हिंगची' माहिती तुम्हाला सांगतात त्याचा पाया फोर स्टार हॉटेल हा असतो. म्हणजे फोर स्टार हॉटेलात तुम्हाला दिवसाला दहा हजार रुपये लागतात त्या ऐवजी सात हजारात काम होईल वगैरे.
तुमच्या लाइफस्टाइलमध्ये तुम्ही "डोक्यावरून पाणी" म्हणून पाच हजार रुपये दिवसाला अश्या हॉटेलात रहात असाल तर सात हजार सुद्धा महागच असतात. पण हे टायवाले तुम्हाला भलतीच तुलना करून दाखवतात.
यांच सर्वात कमी पॅकेज हे ऑफ सीझन आणि नॉन प्रीमियम ठिकाणांसाठी असते.
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 05/11/2016 - 05:28
नवीन
मुदलात आपला फिरायला जाण्याचा हेतू काय असतो ते ध्यानात घेणे जरूरीचे आहे.
आपण ८ दिवस सुटी घेतो आणि त्यात ४ टिकाणे पाहण्याचा बेत आखतो. साहजिकच कुठल्याही एका ठिकाणी आपण सहसा दोन दिवसांपेक्षा जास्त राहात नाही. लगेच पुढच्या मुक्कामाला जातो. अशांसाठी एकाच रेसॉर्टात आठवडा हे जमण्यासारखे नाही.
ज्यांचा फिरायला जाण्याचा हेतू विविध ठिकाणे पाहण्यापेक्षा निव्वळ आराम हाच असतो त्यांना हे ठीकच.
तेव्हा हे टाईम-शेअरिंग मॉडेल सरसकट वाईटच असे नाही. तुमची गरज काय हे पाहणे जास्त जरूरीचे.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Wed, 05/11/2016 - 07:36
नवीन
आधी फोन करायचा की तुम्हाला बक्षीस लागलेय. ते घ्यायला या. गेल्यानंतर झॅक्पाक सेल्स एक्झीक्युटीव (तरुण्/तरुणी) आकर्षक व्हीडीयो दाखवून दाखवून गोड गोड भाषेत कंपनीच्या स्कीम सांगतात. नंतर पॅकेजचे आकडे बघून आपण नाही म्हणालो आणि लागलेले बक्षीस द्या म्हणालो की नाही सर तुम्ही एखादी स्किम घेतली तरच तुम्हाला गिफ्ट मिळेल असे सांगणे अशी सगळी बनवाबनवी चालते. या कंपन्या सरळ सरळ धंदा का करत नाहीत ? त्या अंगठेवाल्या कंपनीने तर मधे त्यांचे पॅकेज घेतले तर तामिळ्नाडूच्या कुठल्या तरी खोपच्यात एक गुंठा प्लॉट मिळेल असे असे सुद्धा आमिष दाखवले होते.
- Log in or register to post comments
म
मर्द मराठा
Tue, 05/17/2016 - 19:07
नवीन
मला आणि माझ्या सौ ला हे हॉलिडेक्लबचे प्रकार चक्क आवडतात... आम्ही भारतात आणि अमेरिकेतही चकट्फू 'प्याकेज' उपटले आहेत. मला त्या दोन तासात त्यांच्या मार्केटिंग करायच्या एकेक स्टेप्स परीक्षण करायला आवडते... मी काहीसे असे करतो...
सुरवातीला भाबडेपणाने त्यांना हवी तशी उत्तरे द्यायची.. म्हणजे आम्हाला फिरायला चिक्कार आवडते.. २ महिन्यातून एकदा हमखास लांबच्या लांब जातोच जातो वगैरे वगैरे... मग त्यांची 'जाळे' पसरायची पद्धत पाहायची... ३०-३५ मिनिटांनी त्यांची 'प्याकेजची' किंमत निघते.. मग खरी मज्जा येते आपले पत्ते बाहेर काढायला... मग बोलायचे... आमची फिरायाची पद्धत जरा वेगळी आहे... आम्हाला ठरवून जायला आवडत नाही... आम्ही कधीच हॉटेल आगावू बुक करीत नाही... गाडी पोचेल.. वाट फुटेल तिथे पोचतो आणि मग हॉटेल शोधतो... अगदी पंचताराकीत ही (हे शेवटचे वाक्य जरा ठसक्यात ठेवायचे).. शिवाय ठरवूनच जायचे तर 'टूर' कंपन्या बक्कळ आहेत की... त्यात काही मजा नाही वाटत... अशी वाक्य वापरलीकी 'त्यांच्या' चेहरा वरचे रंग उडालेले दिसतात.. मग सावरून घेऊन नवीन काहीतरी कल्पना सुचवितात.. शेवटी अगदी जेरीस येऊन अडीच लाखाचे 'प्याकेज' पंचवीस हजारावर येते...
'श्येम टू श्येम' अनुभव अमेरिकेतही आला.. तिकडे 'वेस्टिंग हाउस' ची स्कीम होती 'मर्टल बीच' ला.. चाळीस हजारावरून पाच हजाराच्या स्कीम वर आला बिचारा... पण आम्ही खमके निघालो.. वरचीच कारणे सांगितली आणि चकटफू गिफ्ट व्हाउचर्स शिवाय मिनी क्रुस तिकिटे मिळाली.. दुसरा अनुभव फ्लोरिडाला... डिज़्नी ची तिकिटे ४०-५० टक्क्यानी कमी किमतीत मिळाली.. १-१.३० तास सहन करण्याची तयारी पाहिजे मात्र..
सर्वात ब्येष्ट होता 'स्टर्लिन्ग हॉलिडे' ठाण्याचा 'विक्रेता'... त्याने तर शेवटी 'सामोपचार' वगैरे सोडायचे साईन्स दाखवले आणि आम्ही महाबळेश्वरचे २ रात्री आणि ३ दिवसांचे प्याकेज एन्वेलप रुपी 'पदरात' पाडले आणि पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलोही..
असो... माझे वैयक्तीक मत असे की.. प्रत्येकाची फिरायाची इष्टाईल असावी आणि ती कोणत्याही 'प्याकेजला' बांधलेली नसावी..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2