रोड रेज
गुडगाव, नोयडा ला वस्तीला असलेला हा राक्षस आता पुण्यात ही अवतरला आहे. संदर्भासाठी ही बातमी वाचा http://epaper5.esakal.com/7May2016/Normal/PuneCity/page5.htm . पुण्यातील कर्वे रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्यावर एका कुटुंबाला मारहाण कर्ण्यात आली. कुटुंबा मध्ये नवरा, बायको आणि मुलाच समावेश आहे. ह्या कुटुंबा सोबत असलेल्या दांपत्याला पण मारहाण करण्यात आली. मारहाणीच कारण 'रोड रेज'. 'गाडी रस्त्याच्या बाजूला घ्या' अशा क्षुल्लक कारणामुळे सुरू झालेला हा वाद पुढे कुटुंबाला काठ्या-बांबूंनी गंभीर मारहाण करून जखमी करण्या पर्यंत गेला. मारहाण झालेल्यांमध्ये महिलांचा पण समावेश आहे. बातमी मध्ये लिहिले आहे की ते कुटुंब प्रचंड भयभीत झाले आहे. अर्थातच आपल्या समोर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना मारहाण झाली तर कोणीही भयभीत होणारच. मारहाण करणाऱ्याचे वडील आणि भाऊ पोलीस कर्मचारी आहेत.
दररोज वर्तमान पत्रात येत नसले तरी पुण्यात रस्त्यांवर रोड रेज च्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे . दररोज कामकाजांसाठी पुण्यातील रस्त्यांवर परवास करणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल की कुठेना कुठे रोज वाद, हाणामाऱ्या, 'चल तुला दाखवतो', 'बापाचा रस्ता आहे का', 'तुला माहीत आहे का मी कोण आहे' सारख्या घटना चलूच असतात. आजकाल ओवरटेक करून पुढे गेला तरी लोकांना राग येतो आणि लोक भांडायला तयार होतात. मला तर असे वाटते की लोक रस्त्यावर आले की आपला इगो कसा दुखावला जाईल याचीच वाट पाहत असतात.
एका ओळखीच्या पोलीस कॉन्स्टेबलने सांगितले की हिंजवडी सारख्या ठिकाणी होणाऱ्या प्रचंड वाहनांच्या गर्दी मुळे बरेच लोक फ़स्त्रेट(मराठी शब्द? ) होतात आणि किरकोळ कारणां वरून भांडण सुरू करतात आणि यात शिकलेले आयटी इंजिनियर पण मागे नाहीत. कार्यालयातल्या कामकाजामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे येणाऱ्या ताणाचा परिणाम रस्त्यांवरच्या वाहतुकीवर नक्कीच नाही काढता येणार.
त्यामुळे माझ्या पुणे आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या बंधू आणि भगिनींनो: रस्त्यावर वाहन चालवतानी डोकं शांत ठेवा. आपला थोडासाही आततायीपणा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या अंगाशी येऊ शकतो . वाद झाला तरी थोडीशी माघार घेण्यातच शहाणपण आहे.
तुम्हाला असा काही रोड रेजचा अनुभव आहे का? पुढच्यास ठेच मागचा शहाणाच्या चालीवर मिपाकर सुरशित राहण्यासाठी काय करू शकतात ह्या साठी ही चर्चा.
💬 प्रतिसाद
(9)
त
तर्राट जोकर
Sat, 05/07/2016 - 12:01
नवीन
पुढच्यास ठेच मागचा शहाणाच्या चालीवर मिपाकर सुरशित राहण्यासाठी काय करू शकतात ह्या साठी ही चर्चा.
>> त्याच्यासाठीच तर मिपा आहे ना?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 05/07/2016 - 12:03
नवीन
मारहाण करण्यात आलेले कुटुंब बांधकाम व्यवसायात आहे. या व्यवसायात काळा पैसा, गुंडगिरी, घरे/जागा बळकावणे, पैसे घेऊन घराचा ताबा न देणे व यामुळे आलेले शत्रुत्व इ. घटक असू शकतात. यातील काही घटक या मारहाणीमागे असू शकतात. निव्वळ गाडी बाजूला घेणे या साध्या कारणावरून इतकी मोठी मारामारी होण्याची शक्यता कमी वाटते. इतर कारणेही त्यामागे असू शकतात.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sat, 05/07/2016 - 13:14
नवीन
(त्यांची तशी बरीच ख्याती ही आहे). शिवाय प्रकरणात ५१ लाख रुपयांच्या दरोड्याची तक्रार आहे. मारहाण करणार्याच्या बायकोनी, बिल्डरच्या मुलानी तीचे २ लाखाचे दागीने पळवल्याची उपतक्रार केली आहे. थोडक्यात, सदर प्रकरण हे आपापसातल्या भानगडीचे आहे. ते लेखकाच्या कल्पनेतले आणि कोणत्या तरी पोलीसानी उगीच डोक्यात भरवून दिलेले रोड रेज प्रकरण वगैरे काही नाही. पुण्यात कायदा आणि व्यवस्था चोख आहे. सामान्य लोकांना आणि लेखकाला, वाहन चालवतांना उगीच दहशत वगैरे वाटून घ्यायचं कारण नाही. सर्वांनी बिनधास्त राहून वाहनं चालवावी अशासाठी प्रतिसाद.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sat, 05/07/2016 - 13:22
नवीन
रोड रेज वगैरे होत नाही.
गाववाले अधेमधे एखाद्याला प्रेमळ विचारपूस करतात, काही महिन्यापूर्वी पोलीसांची सुद्धा विचारपूस केली होती.
- Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर
Sat, 05/07/2016 - 13:49
नवीन
ashi vicharpus saglikadech kartat. maage malshej road var ST driver chi vicharpus tithale gaavkari karit hote. Driver chi chuk navhati.
aamhi madhye padlyavar, phone karun aankhi mandali vichapus karnyasaathi aali. Ammachya nashibane tyachveles police tithe pohochale, anyatha aamachihi vicharpus keli asati.
Pratyek rastyachya kadela ji Gaave astat, tya gavatil mandali kayamach vicharpus karnyachya mud astat.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 05/07/2016 - 15:55
नवीन
त्यांच्याकडे मिसळपाव.कॉम अॅक्सेस होत नसेल. त्यामुळे फ्रस्ट्रेशन काढायला टपूनच बसलेले असतात.
- Log in or register to post comments
M
mahesh d
Tue, 05/10/2016 - 09:59
नवीन
hi news vachali hoti, ya madhye kahitari gadbad asanar aahe, otherwise money theft kashi hoil tyach veli.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Tue, 05/10/2016 - 10:22
नवीन
.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 05/10/2016 - 10:23
नवीन
फ्रस्ट्रेशन = वैफल्य
फ्रस्ट्रेटेड = वैफल्यग्रस्त
बाकी तुम्ही म्हणता त्याच्याशी सहमत आहे. शक्य तिथे शक्य ते करून थांबवायचा प्रयत्न करतो. कधीकधी माझ्याकडूनही हे होतं, हे नाकारत नाही. तरीही याबाबत काहीतरी करायचं मनात आहे; लघुपट सदृश.
- Log in or register to post comments