माय
माही माय माही माय नाई शिकली लेयनं
रातं दिसं मेहनतं
जीवं मातीले जायनं
चुरुक भुरुक अशी
लावे झाकटीतं रई
देते पाह्यटीचं मले
खायाले सायी चं दई
ठूनं हातावरं डोक्सं
तिचं वगारु पाजनं
शाळेतल्या पोराईचं
यकं दोनं आईकनं
चुनं भाकरं थापूनं
घाई घाई वावरातं
कापूस येचता येचता
जोळे नख्ख्याईशी नातं
सोसून सासरवासं
तरी राये समाधानी
पोरं शिकतीलं लयं
सदा राये ह्याचं ध्यानी
दुध तपवूनं राती
टाके त्यातं इरजनं
व्हते दई,लोनी चं ते
नाई नासलं आजुनं
💬 प्रतिसाद
(8)
ज
जव्हेरगंज
Sun, 05/08/2016 - 12:32
नवीन
एक दोन ठिकाणी 'लय' फिस्काटलीय!
शेवटपण जमला नाय!
बाकी उत्तम !!!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 05/08/2016 - 13:56
नवीन
आईसाठी आलेली सुंदर कविता!
अवांतर: जव्हेरभौंच्या प्रतिसादावरून सुचलेली गंमत : कविता सुरूवातीला गडबडलीये... थोडी मध्ये मध्ये भरकटलीये आणि शेवटाकडे जाताना संपूर्ण गंडलीये. बाकी कविता उत्तमच!!!
टीप : ही फक्त गम्मत आहे! ;)
Sandy
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 05/08/2016 - 15:05
नवीन
हाहाहा!!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 05/08/2016 - 14:58
नवीन
सुरेख. आवडली हो कविता उध्दवभौ.
- Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे
Mon, 05/09/2016 - 20:38
नवीन
धन्यवाद! जव्हेरगंज जी. अजुन सविस्तर समजले तर आपला आभारी राहीन. जेणे करुन मला सुधारणा करणे सोयीचे होईल. प्रतिक्रिया व्यक्त केल्या बद्दल धन्यवाद. तसेच चांदणे संदिप व अभ्या(अभ्या असं संबोधण्यात संकोच वाटतो) यांचा सुद्धा आभारी आहे. आपणां सर्वांच्या सविस्तर सुचनांचे प्रतिक्षेत!
- Log in or register to post comments
र
रातराणी
Mon, 05/09/2016 - 20:47
नवीन
अप्रतिम! काय गोडवा आहे या भाषेत!
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 05/10/2016 - 07:51
नवीन
कविता अप्रतिम .. पुन्हा पुन्हा वाचली..
बरेच शब्द माझ्या साठी नविन आहेत ..
पण वाचताना छान वाटले एकदम ..
लिहित रहा... वाचत आहे
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Tue, 05/10/2016 - 07:56
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments