आस
बांधावरचा पिंपळ सांगे
सोनसावळी दुःखे ओली
फांदी-फांदी जीर्ण पर्णिका
बांडगुळांची गर्दी सगळी
अस्ताईचे सूर अनोळखी
शुष्क पान्हा हळवी देवकी
कशी रुचावी जगण्यालाही
अस्थाईविन बंदिश पोरकी
सुकली पाने सुकली माती
खिन्न विरहिणी होय पालवी
पाणी सुकले बुंध्यापाशी
त्राही त्राही अंकुर डोकावी
कधी अकस्मित ओल मुळांना
कधी मेघांचे हळवे चुंबन
लागे जलदांना ओढ भूमीची
कधी अचानक अधीरे मिलन
नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे
नश्वरतेचा शाप सुखाला
शाश्वत ऐसे इथे न काही
श्वासांचा का ध्यास जीवाला ?
सोनसावळा पिंपळ वेडा
शुष्क डहाळ्या तरीही जपतो
आस लाजऱ्या मृगथेंबाची
मनी बाळगून जगत राहतो
विशाल १०-०५-२०१६
💬 प्रतिसाद
(17)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/10/2016 - 07:36
नवीन
अजुन एक सुंदर रचना.. विशालभौ.. जियो...
हे खासचं....
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 05/10/2016 - 07:44
नवीन
कविता मस्त ..
ग्रेस आठवले एकदम
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 05/10/2016 - 07:57
नवीन
अहाहा, सार्थक झालं. आज ग्रेससरांच्या जयंतीदिवशी कवितेला हि दाद मिळणं यासारखं दुसरं सुख नाही. धन्यवाद.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Tue, 05/10/2016 - 07:49
नवीन
मस्त कविता. आवडली.
आस लाजऱ्या मृगथेंबाची
मनी बाळगून जगत राहतो
आपल्या सर्वांचे असेच आहे.
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Tue, 05/10/2016 - 08:15
नवीन
वाह . क्या बात है. आवडली कविता विशालदा
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/10/2016 - 08:57
नवीन
विलक्षण चित्रदर्शी कविता....
आवडली अतिशय आवडली
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Wed, 05/11/2016 - 12:03
नवीन
धन्यवाद देवानू !
इतरांचेही मनःपूर्वक आभार _/\_
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 05/10/2016 - 09:01
नवीन
रूपक कविता म्हणून लिहिलीय का विशालभौ?
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 05/10/2016 - 09:29
नवीन
रुपकच आहे बोकाभाऊ, ज्याला जे दिसेल तो अर्थ. धन्यवाद मंडळी _/!\_
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Tue, 05/10/2016 - 14:16
नवीन
वाह विशाल दा
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 05/11/2016 - 08:02
नवीन
कवीराजांनी म्हटलय आम्ही काय आणखी म्हणणार रे !!!
पिंपळा खालचा मुंजा नाखु
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 05/11/2016 - 13:06
नवीन
एक नंबर रे!!! तुमच्या रचना सूदिंग असतात विकु!
तलम एकदम! जियो पठ्ठे!
- Log in or register to post comments
न
निनाव
Fri, 09/16/2016 - 19:43
नवीन
विकु दा -.. अस्थाईविन बंदिश पोरकी .. जब्बर्दस्त
- Log in or register to post comments
र
रातराणी
Fri, 09/16/2016 - 19:48
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
र
राघव
Sat, 09/17/2016 - 21:23
नवीन
सुंदर. आवडेश! :)
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 09/18/2016 - 06:00
नवीन
सोनसावळा पिंपळ वेडा
शुष्क डहाळ्या तरीही जपतो
आस लाजऱ्या मृगथेंबाची
मनी बाळगून जगत राहतो
वाह! काय म्हणावे.... आजकाल चुकून बायको लाजली कि मृगथेंबाची आस मनी जागतेच....
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 09/18/2016 - 06:36
नवीन
अप्रतिम कविता! हल्ली कुठे गायब आहेस रे विशल्या?
- Log in or register to post comments