रातांब्याचं (कोकम) पन्हं
Primary tabs
साहित्यःरातांब्याचा गर एक वाटी, गूळ चिरलेला दोन वाटया, मीठ चवीनुसार, एक टीस्पून जीरे पावडर, दोन ओल्या मिरच्या वाटून, पाणी.

कृती:रातांबे स्वच्छ करून घ्या. दोन भाग करून आतला गर बियांसह काढून घ्या.( सालींचे कोकमसरबत करता येते.) गर मोजून त्याच्या दुप्पट गूळ आणि चवीनुसार मीठ मिसळून गर अर्धा तास झाकून ठेवा,

गूळ पूर्ण विरघळला की त्यात जीरेपूड आणि वाटलेली मिरची घालून मिश्रण गाळून घ्या. मिश्रणाच्या चौपट पाणी लागते.
चव बघून लागल्यास मीठ घाला. तयार पन्हं थंडगार करून सर्व्ह करा.
माझ्या माहेरी पाडव्याला गावच्या देवळात सर्व गावकरी एकत्र जमून वसंत पूजा करतात. गणपतीची पूजा करून नवीन पंचांगाचे वाचन करतात. त्यावेळी नैवेद्याला आंबेडाळ आणि रातांब्याचं पन्हं असा नैवेद्य असतो. नंतर आलेल्या सर्वाना डाळ आणि पन्हं वाटलं जातं.

या पन्ह्याला कोकम सरबतासारखा रंग येत नाही, पण जीरं, मिरची आणि गूळ याने अप्रतिम चव येते. आमच्याकडे थोड्या फुगीर अशा ओल्या मिरच्या येतात या सिझनला, त्याचा वास मस्त असतो. मिरची तिखटपणासाठी नसून फक्त स्वादासाठी आहे. हे पन्हं टिकावू नाही.
एकदम भारी.
+ १
अहाहाहा!!!! गाsssssर वाटलं अगदी!!!!!!
आहा...मस्तं!!!
करून पहा.
किती दिवस झाले रातांब्याचे पन्हे पिऊन!
मस्त! हे रातांबे खायलाही मस्त असतात चवीला.
अहाहा झालं बघून वाचून!
भारी फोटू व कृती.
मिरची स्वादासाठी घालणे आवडले.
वाह ! मिरची ची अॅडिशन फार आवडली. रातांबे म्हणजेच कोकमं का?
रातांबा हा मराठी शब्द आणि कोकम हा इंग्लिश! सुरवातीलाच दोन्ही लिहिलेत बघ.
आज ह्ये असलच कै तरी चिपलूऩात प्यायलं
लै भारी
सुपर्ब.. कसले भारी दिसयेत.
अशी अनेक सरबतं बनवली जातात, उन्हाळा सुसह्य करण्यासाठी!
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
रातांबे पूर्वी सरबतासाठी घरी मुरवून ठेवलेले असत, त्याचं सरबत कधीही आवडलं नाही. पन्हं दिसतंय छान!!
सुंदर.
पण पन्ह्याची चव वेगळी असते सरबतापेक्षा!
साखरेत मुरलं की त्याला किंचित आंबूस वास येतो तो आवडत नसे. पन्हं ताबडतोब बनवून संपवायचा प्रकार असल्याने बनवून बघायला हरकत नाही.