Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदत हवी आहे, Attestation करणे

अ
अनिकेत वैद्य
गुरुवार, 05/12/2016 - 12:14
🗣 25 प्रतिसाद
काही महत्वाच्या कागदपत्रान्चे Attestation(साक्षान्कीत प्रत) करुन हवे आहे. पुण्यात कोठे मिळू शकेल? Attestation हे राज्य/केन्द्र शासनाच्या वर्ग १ अधिकार्याकडून करुन हवे आहे. नगरसेवक/नोटरी नको. आमदार्/खासदार चालतील. सद्ध्या बर्याच शाळाना सुट्ट्या असल्याने मुख्याध्यापक पदावरील व्यक्ती भेटू शकत नाहियेत. नवीन नियमानुसार self attestation चालते हे सान्गु नये, ministry ला वर्ग १ अधिकार्याने केलेले attestation हवे आहे.

प्रतिक्रिया द्या
3524 वाचन

💬 प्रतिसाद (25)
स
स्थितप्रज्ञ Fri, 05/13/2016 - 11:38 नवीन
कुमठेकर रस्त्यावर D G Copiers म्हणून एक Xerox चे दुकान आहे. तिथे ते attest करून देतात असा बोर्ड बघितल्याचा आठवतो मला. फक्त तो नवीन admissionच्या काळातच असतो का ते माहित नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 06:15 नवीन
धन्यवाद. xerox च्या दुकानात attestation हे विशेष कार्यकारी अधिकारी ह्यान्च्या नावाने केले जाते. ते चालणार नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ
म
मोदक Fri, 05/13/2016 - 12:07 नवीन
पोलीस कमीशनर किंवा IAS समकक्ष अधिकार्‍याला गाठा. त्यांना अधिकार असतात. पालिकेचे आयुक्त / कलेक्टर प्रभृती पण चालतील. वरील सर्व लोक्स कुठे सापडतील हे चौकात थांबलेल्या पांढर्‍या वेषातील पोलीसाला (चालत जावून) विचारा.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 06:18 नवीन
IAS, IPS किन्वा समकक्ष अधिकारी हे असली छोटी कामे करीत नाहीत. त्यान्चे PA असल्या कामान्साठी साहेबान्ना भेटूच देत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
न
नाईकांचा बहिर्जी Mon, 05/16/2016 - 06:25 नवीन
गॅजेटेड अधिकार्यात राज्य सरकार चे अधिकारी चालत नाहीत का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत वैद्य
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 06:33 नवीन
राज्य सरकार चे अधिकारी चालतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
आ
आदूबाळ Fri, 05/13/2016 - 18:13 नवीन
इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जा. पाहिजे तितके ग्रेड १ ऑफिसर्स मिळतील. - स्वारगेट (पीएमटी वर्कशॉपच्या शेजारी) - बीओ भवन (सिटीप्राईड सातारा रोडच्या समोर) - प्रभात रोड (इन्कम टॅक्स गल्ली) - साधू वासवानी चौक केबिनबाहेर बसणार्‍या इसमाला चिठ्ठी / कार्ड द्या, आणि "साहेबांना भेटायचं आहे" असं सांगा. शक्यतो तुम्हाला अ‍ॅटेस्टेशन पाहिजे आहे हे सांगू नका. थेट ऑफिसरशी बोला. आधी फोन केलात तर फार उत्तम. (माझ्या माहितीप्रमाणे अपडेटेड) डिरेक्टरी इथे आहे: http://office.incometaxindia.gov.in/pune/Documents/Directory%20of%20Officers.pdf पूर्ण डिरेक्टरी वाचा. कदाचित कोणी ओळखीचं निघेल, आणि काम अगदीच सोपं होईल.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 06:25 नवीन
इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये गेल्यावर साहेबाना कोणत्या केस सन्दर्भात भेटायचय हे आधी विचारतात. पण वैयक्तिक काम आहे, साहेबान्ना फोन करून आलोय सान्गितल्यावर भेटून काम करून घेतले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
M
mugdhagode Fri, 05/13/2016 - 13:46 नवीन
मोठ्या सरकारी हस्पिटलातील डीन, सुपरिंडेंंट , सिविल सर्जन इ इ
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 06:26 नवीन
धन्यवाद. ह्या पदावरील व्यक्ती बरेचदा उपलब्ध होत नाहीत. कामाचा ताण प्रचन्ड असतो त्यान्ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
प
प्रसाद१९७१ Fri, 05/13/2016 - 13:46 नवीन
त्यापेक्षा नोटरी कडुन अ‍ॅटेस्टेशन करुन घ्या ना. लगेच देतात, थोडी फी घेतात पण एकदम कायदेशीर.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 06:22 नवीन
नोटरी चालणार नाही असे स्पष्ट लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
च
चंद्रनील मुल्हेरकर Fri, 05/13/2016 - 14:02 नवीन
नगरसेवक वा नोटरी गाठा
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 06:22 नवीन
नगरसेवक वा नोटरी चालणार नाही असे स्पष्ट लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
व
विवेकपटाईत Fri, 05/13/2016 - 14:10 नवीन
क्लास १ अधिकाऱ्या कडून सत्यापित केल्या नंतर काम पूर्ण होणार नाही. इमानदार माणसाकडून हि सत्यापित करून घ्या. भविष्यात अडचण येऊ शकते.
  • Log in or register to post comments
प
पक्षी Fri, 05/13/2016 - 14:48 नवीन
घराच्या आसपास चौकशी करा (पानपट्टी, किरणा दुकान इत्यादी), जवळच कुठेतरी सापडेल attested वाला . किंवा जवळच्या सेना/मनसे/खान्ग्रेस शाखेत विचारा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 05/13/2016 - 18:04 नवीन
नोटरी चालणार नाही हे सांगण्याचा अधिकार कोणी दिला?.अफिडेविट करा.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 06:28 नवीन
नोटरी चालणार नाही हे स्पष्ट लिहील आहे. attestation कोणाकोणाच चालू शकेल ह्याची यादी दिली आहे, त्यात नोटरी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 06:32 नवीन
सर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रासोबत जावून एका शाळेतून मुख्याध्यापकाच्या सहीने attestaion करून घेतले. ह्या शाळेत (पुण्यातल्या बहुतेक सर्व शाळात) केवळ आजी/माजी विद्यार्थानाच attestaion करून दिले जाते. मित्राच्या ओळखिने काम झाले.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 05/16/2016 - 11:42 नवीन
अटेस्टेशन करायला क्लास एकचे अधिकारी लागतात.... ओळखीच्या माणसाकडून करून घ्या असे कुठेही सांगितले नाहीये.... मात्र बरेच लोक खूप भाव खातात...... याच कारणावरून एकदा मित्रासाठी विश्वास नांगरे पाटलांशी भांडून आलो आहे.....न का ओळखेनास बाबा... ओरिजिनल पाहून सही तर कर !! नाही म्हणाला मनुष्य......
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 12:32 नवीन
ओळख नसताना बरेच अधिकारी सही करत नाहीत. अनेक अधिकार्यान्ना हे काम दुय्यम दर्जाचे वाटते. त्यामुळे ते सही करत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
ब
बबन ताम्बे Tue, 05/17/2016 - 09:37 नवीन
मीही एकदा प्राधीकरणातील ऑफीसमधे गेलो होतो. तिथल्या साहेबाने ओळखत नाही म्हणून अटेस्ट करायला नकार दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत वैद्य
अ
अनिकेत वैद्य Mon, 05/16/2016 - 12:31 नवीन
ओळख नसताना बरेच अधिकारी सही करत नाहीत. अनेक अधिकार्यान्ना हे काम दुय्यम दर्जाचे वाटते. त्यामुळे ते सही करत नाहीत.
  • Log in or register to post comments
क
कानडा Tue, 05/17/2016 - 13:14 नवीन
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व (पुर्णवेळ) प्राध्यापक हे वर्ग १ चे गॅझेटेड ऑफिसर असतात. त्यांच्याकडुन attestation करुन घेता येते. --- कानडा
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 05/17/2016 - 15:52 नवीन
सही न देण्याचं कारण म्हणजे जर समजा डॉक्युमेंट फेक असेल (ओरीजनल दाखवून दहा -विस बरोबर डॉक्युमेंटमधे १-२ फेक डॉक्युमेंट सहज टाकता येतात. ) तर सही करणारा अधिकारी अडचणीत येऊ शकतो. शिवाय हे अधिकचे काम आहे. त्यामुळे करण्यास सहसा अधिकारी तयार होत नाहीत. मित्राच्या, नातेवाईकाच्या ओळखीचा अधिकारी असेल तर सहसा टाळटाळ करीत नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा