तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
💬 प्रतिसाद
(19)
म
मुक्त विहारि
Fri, 05/13/2016 - 09:31
नवीन
हे सांगणारा मी पहिला....
आहाहाहाहा!!!!!!!!!!!!!
किती दिवसांनी पहिला प्रतिसाद दिला...
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Fri, 05/13/2016 - 10:16
नवीन
मराठी माध्यम
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 05/13/2016 - 10:36
नवीन
नक्की हायपोथिसिस काय आहे?
"इंग्रजी माध्यमात शिकलेल्या लोकांची मराठी शब्दसंपत्ती कमी असते"
हे आहे, की
"इंग्रजी माध्यमात शिकलेले लोक नीट मराठी लिहू शकत नाहीत"
हे आहे?
असो.
मी बालवाडीपासून पुढे पूर्ण इंग्रजी माध्यमात शिकलो आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 10:41
नवीन
हे सांगू इच्छितो.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 05/13/2016 - 10:51
नवीन
इच्छायचं काय त्यात बोकेशा. बिनधास्त सांगायचं. ;)
मी पण मी पण....
पन माझं इन्ग्लिश वाचन न के बराबर है.
मराठी वाचन होते थोड्डेसे पण सध्याच्या खरडफळ्यावर्च्या चर्चा पाहता मी कैच वाचलेले नाही.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 05/14/2016 - 16:18
नवीन
चर्चा पाहू नयेत, कराव्यात.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 05/14/2016 - 17:30
नवीन
हेहेहे
आपल्यापाशी भांडवल ईल्ला.
चारदोन पुस्तकाच्या वाचनावर काय चर्चा करणार.
आम्ही सॉरी त्याबाबतीत.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 05/14/2016 - 17:51
नवीन
त्याच चारदोन पुस्तकांवर करायच्या :)
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Fri, 05/13/2016 - 10:39
नवीन
मी मराठी,
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 05/13/2016 - 10:54
नवीन
आठवीपर्यंत मराठीमध्ये शिकूनपण जर मराठी कच्चे असेल तर सगळे शीकश्यान म्राटीत ओउनपण म्राटी कच्चंच र्हानार
- Log in or register to post comments
स
स्थितप्रज्ञ
Fri, 05/13/2016 - 11:16
नवीन
भाषाशैली आणि माध्यमाचा तसा संबंध नाही. मी इंग्रजी माध्यमात शिकून सुद्धा घरी मराठीच बोलत असल्यामुळे मराठीत जास्त प्रभावीपणे विचार व्यक्त करू शकतो (लिहून सुद्धा).
तुम्ही विचार कुठल्या भाषेत करता त्यावर तुम्ही कुठल्या भाषेत जास्त परिणामकारकरित्या संवाद साधू शकता हे ठरते. त्याला माध्यमाची अट नाही.
उदा. लहानपणापासून मी मराठीत विचार करायला शिकलो (मातृभाषेमुळे), नंतर इंग्रजी माध्यमातून शिकूनही तितकेसे फाड फाड इंग्रजी बोलता येत नसल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावला तेव्हा तेथील गुरुजीन्ने इंग्रजीत विचार करण्याचा सल्ला दिला (आणि तो खूप उपयोगी पडला) तेव्हा माझे इंग्रजी बोलणे आणि लिखाण सुधारले आणि नंतर काही वर्षे आंध्रात (आताचे तेलंगाणा) असताना बरोबरचे लोक तेलुगु शिकवायचे तेव्हा आपसूक तेलुगूत विचार करू लागलो होतो (आता टच पूर्णपणे गेलाय) त्यामुळे थोडे थोडे तेलुगु बोलू लागलो होतो.
माझ्या एका मित्राचा भाऊ (मूळचा नगरचा आणि मराठी माध्यमात शिकलेला) अस्खलीत आणि वान्ग्माय्पूर्ण तेलुगु बोलतो. त्यालाही स्वतःशी कधी कधी तेलुगुमध्ये बोलताना/पुटपुटताना पकडायचो आम्ही :P
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 05/13/2016 - 11:23
नवीन
मी दहावीपर्यंत मराठी माध्यमात आणि अकरावी पासून इंग्लिश माध्यमात शिकले. आता मी कोणते माध्यम माझे म्हणून सांगू? मराठी, कोंकणी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत पाच भाषा वाचते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 12:39
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 05/13/2016 - 14:17
नवीन
देवनागरी आणि रोमी कोंकणी. कन्नड जिलब्या समजत नैत. बँकेत कन्नडिगांचा भरणा असल्याने थोडेफार कामचलाऊ कन्नड बोललेले समजते इतकेच.
- Log in or register to post comments
D
dhananjay gadkari
Fri, 05/13/2016 - 11:44
नवीन
सेमि ईन्ग्लिश.
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Fri, 05/13/2016 - 12:57
नवीन
आठवी पासून इंग्लिश माध्यमात शिकलो.
मला वाटते, की लहानपणी किंवा कोलेज पर्यंत तुम्ही काय अन किती साहित्यिक वाचले ह्याचा भाषा प्रभूत्वावर खूप परिणाम होतो.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 05/13/2016 - 13:00
नवीन
ऊल्टीपालटी कॉवेनंट चेंबुर ११ वी
नंतर केम ब्रि़ज ग्रॅजुएशन
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sat, 05/14/2016 - 16:12
नवीन
zp
- Log in or register to post comments
श
शेखर काळे
Sun, 05/15/2016 - 07:08
नवीन
अगदी बालवाड़ी पासून.
पण त्याचा आणि इंग्रजीतून किंवा मराठीतून लिखाणाचा काय संबंध आहे ते समज़ले नाही.
माझे मराठी पुस्तकांचे भरपूर वाचन लहानपणापासूनच आहे, इंग्रजी पुस्तके वाचनाचीही आवड आहे.
माझ्या मताप्रमाणे तुम्ही आत्ता काय वाचत आहात त्याचा लिहिण्यावर प्रभाव पडतो - पूर्वीच्या वाचनाचा कमी प्रभाव असतो.
- Log in or register to post comments