Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बायको कोण असते...

न — निओ, Sun, 05/15/2016 - 22:06
एक हलकी फुलकी कविता. बायको कोण असते... कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते कधी समजून घेणारी मित्र असते कधी त्रास देणारी डोकेदुखी असते कधी मस्का लावणारी असते कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते आणि कधी नको असताना जवळ असते कधी न सांगता समजून घेते कधी गैरसमज करून घेते कधी मुलांची काळजी करते कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते कधी नवर्याला नावे ठेवते कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते कधी फिरायला नेलं कि नखरे करते कधी हट्टउन हौस पुरवून घेते कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते कधी शॉपिंगने बेजार करते कधी नवर्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते कधी कोणाची गुपितं सांगते कधी कोणाला कळू न देता गुपचूप कारभार उरकते कधी तंबी देऊनच घराबाहेर सोडते कधी घरी यायची वाट बघत बसते कधी सरळ सूत तर कधी संशयाचं भूत असते कधी नवर्याला लगाम घालू पाहते कधी नवर्यावर प्रेमाचा वर्षाव करते कधी शेळी तर कधी वाघ असते कधी आंबट तर कधी गोड असते कधी न म्हणते - आज मी दमले, दोन पेग मारते कधी न संपणारी घराची उर्जा असते कितीही भांडली तरी मुकाट्याने जेवायला घालते बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून 'Best Match' म्हणून आपल्याशीच जोडी लावून दिलेली असते. ©Nitin More

प्रतिक्रिया द्या
3387 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चांदणे संदीप Mon, 05/16/2016 - 02:47 नवीन
कवितेचा पण कॉपीराईट आहे का??
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 05/16/2016 - 06:41 नवीन
कधी न म्हणते - आज मी दमले, दोन पेग मारते याच्याशी असहमत.
  • Log in or register to post comments
प
पक्षी Mon, 05/16/2016 - 14:09 नवीन
अत्तिशय अप्रतिम....जबराट...एक नंबर...इत्यादी...इत्यादी...
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 05/16/2016 - 14:36 नवीन
हॅहॅहॅ आम्हीही ह्या विषयावर पूर्वी काही लेखन केले होते त्याची आठव्ण आली. बायको ही सायको असते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा