Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दारू पिऊन गाडी चालवल्यास दंड...

स
संजय पाटिल
Mon, 05/16/2016 - 16:06
🗣 20 प्रतिसाद
आज टीव्हीवर एक बातमी दाखवत होते... दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रूपये दंड आणि तीन महिने लायसंन्स रद्द . ठिक आहे . चांगलच आहे. पण चालक दारू प्यायलाय किंवा नाही हे तपासण्यासाठी वाहतूक पोलिस एक यंत्र चालकाच्या तोंडात घालुन त्यात फुंकर मारायला लावत होते. आता एकाच्या तोंडातुन हे यंत्र काढून तेच दुसर्‍याच्या तोंडात घालताना त्यातून संसर्गजन्य रोगांचा प्रसार होणार नाही का? त्यासाठी काय काळजी घेतली जाते? जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...

प्रतिक्रिया द्या
3382 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ज
जेपी Mon, 05/16/2016 - 16:30 नवीन
जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत<>>>... ही ही ही.. मिपाकर लै हुशार हैत.. आणी मि पयला
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Mon, 05/16/2016 - 16:43 नवीन
अहो जाणकार म्हणजे अंगठेबहद्दर नव्हे.. डाक्टर्लोक म्हण्तोय मी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
उ
उगा काहितरीच Mon, 05/16/2016 - 16:39 नवीन
उपाय क्रमांक १) स्वतःचे यंत्र विकत घ्या. बाकी उपाय नंतर
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 05/16/2016 - 16:47 नवीन
अल्कोहोल हे एक चांगले जंतूनाशक असते असे म्हणतात. ;) :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/16/2016 - 17:02 नवीन
अश्या यंत्रांना डिसपोजेबल माऊथपीस असतो... कधी नवीन वापर करणार्‍यांना ते माहीत नसते किंवा भोंगळ कारभार अथवा अनास्थेमुळे त्यांचा उपयोग केला जात नाही :( अश्या परिस्थितीत तुम्ही कायद्याच्या योग्य बाजूला असल्याशिवाय (किंवा असलात तरी) पोलिसांबरोबर बाचाबाची करण्यात फायदा नाही, हे पकडलेल्या माणसाइतकेच पोलिसही जाणून असतात. त्यामुळे बर्‍याच काही गोष्टी घडत असतात :(
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Mon, 05/16/2016 - 18:30 नवीन
हेच म्हणायचं होतं मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Mon, 05/16/2016 - 17:22 नवीन
आपल्या आधी एखाद्या मदनिकेने ती टेस्ट त्याच यंत्राने दिली असेल तर अश्यावेळी तुम्ही काय कराल?
  • Log in or register to post comments
झ
झेन Mon, 05/16/2016 - 18:12 नवीन
कुणाचं यंत्राचं की मदनीकेचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 05/16/2016 - 18:22 नवीन
असा प्रश्नच कसा पडतो???? समोर फोलिस असताना पहिले स्वतः लांब जावे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
प
प्रणवजोशी Tue, 05/17/2016 - 04:06 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
आ
आनन्दा Mon, 05/16/2016 - 21:30 नवीन
ती मदनिका टंच असेल तर ठीक आहे. चंट असेल तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
झ
झेन Mon, 05/16/2016 - 18:49 नवीन
पोलीसांपासून लांब गेल्यास ते मागे लागतात, ऊर्मट तूच्छ भाव चेहर्यावर ठेवल्यास आपूलकी दाखतात :-)
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे Tue, 05/17/2016 - 05:16 नवीन
चला... पाटिलसाहेबांनी एकदाचा धागा काढला तर!! जाणकारांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 05/17/2016 - 05:51 नवीन
दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रूपये दंड आणि तीन महिने लायसंन्स रद्द .
तुम्ही कोण आहात आणि तुमची गाडी कुठली आहे यावर ही तपासणी अवलंबून आहे. गाडीची किंमत जशी जशी जास्त आणि तुम्ची ऐपत्+इभ्र्त वजा ओळख जितकी मोठी तितकी दंडपावती लहान होत जाते,काही वेळा पावती न होता तुम्हाला घरापर्यंत सोडतीलही. रस्त्यावरील (नियमीत)तोडपाणी प्रत्यक्ष बघणारा नाखु दुचाकीवाला
  • Log in or register to post comments
झ
झेन Tue, 05/17/2016 - 06:06 नवीन
गाडीवरचे स्टीर्कस झेंडे वगैरें नी पण अँसेसमेंट मधे लक्षणीय फरक पडतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
संजय पाटिल Tue, 05/17/2016 - 07:54 नवीन
सहमत.. पण मुद्दा हा आहे कि ते यंत्र वापरणे कितपत सुरक्षीत आहे? आणि त्यामुळे जर काहि आजाराची लागण झाली तर त्याला कोण जबाबदार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सुबोध खरे Tue, 05/17/2016 - 06:23 नवीन
एकच काळजी ती म्हणजे वर्षा अखेरीस आपल्याला "दुध" पिउन पकडले तर त्यांचे "टार्गेट" पूर्ण करण्यासाठी पोलिस आपल्याला पण दारू पिउन गाडी चालवली म्हणून दाखवू शकतील. तसे झाले तर तेथे ताबडतोब सरकारी रुग्णालयात रक्तातील अल्कोहोलची पातळी तपासणी करण्याची मागणी करा आणि त्याचे मोबाइल वर रेकोर्डिंग करा. हा पुरावा तुम्हाला निर्दोष जाहीर करण्यास फार महत्त्वाचा ठरेल. अशा केसेस दिल्ली आणि उत्तर प्रदेशात माझ्या मित्रांनी पाहिल्या आहेत
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 05/18/2016 - 07:18 नवीन
दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रूपये दंड
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवल्यास खालील प्रमाणे दंड व शिक्षा होऊ शकते. Alcohol Level Fines penalties and Jail 150 mg or above per 100 ml blood First time offence charged Rs.5000 and 2 years imprisonment. Repeated offence within 3 years Rs.10000 fine plus 4 years jail. 60 to 150 mg per 100 ml blood 1 year imprisonment and/or Rs.4000 fine. Second and repeated offence attracts 3 years jail and/or Rs.8000 fine. 30 to 60 mg alcohol per 100 ml blood Rs.2000 or/and 6 months jail. 30 mg or lower per 100 ml Offence is not considered at this level of alcohol in blood.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 05/18/2016 - 07:55 नवीन
कवा तरी वाचलत की शरीरात ५ लिटर रक्त असते म्हणे. मग त्या हिशोबानी २ लार्ज म्हणजे १२० मिलि घेतली तर २.४ मिलि (म्हणजे किती येम्जी?) पर १०० मिलि येतंय. हा सरधोपट हिशोब बरोबरे अस म्हणता येइल का? ते पोलिसांकडे असणारे यंत्र श्वासाहुन मोजते अन त्याचे आकडे वेगळे असतात. त्याची काय स्केल आहे हे बघायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 05/18/2016 - 08:47 नवीन
कवा तरी वाचलत की शरीरात ५ लिटर रक्त असते म्हणे. मग त्या हिशोबानी २ लार्ज म्हणजे १२० मिलि घेतली तर २.४ मिलि (म्हणजे किती येम्जी?) पर १०० मिलि येतंय. हा सरधोपट हिशोब बरोबरे अस म्हणता येइल का?
नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हिशोब येण्यासाठी मद्यात १००% अल्कोहोल असायला पाहीजे. प्रत्येक मद्यात अल्कोहोलचे प्रमाण कमीजास्त असू शकते. मद्यातील अल्कोहोल रक्तात उतरण्याचे प्रमाण हे तुमचे वय,लिंग,वजन, व मद्य पिण्याचा वेग ह्यावर अवलंबून असतो. प्रत्येक व्यक्तीची चयापचय व उत्सर्जन क्रिया सारखी नसते त्यामूळे अल्कोहोलचे रक्तातील प्रमाणही सारखे असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा