आयेश्वराच्या अंगणी
तशी बहुत वरुषांची गोष्ट. ८००/ १००० वर्षांपूर्वीची. तेव्हा इये देशी देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. सेऊणदेशचे यादव. देवगिरी ही राजधानी म्हणून स्थापित व्हायची होती. यादव तेव्हा इथे राज्य करत होते ते राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणूनच. यादवांचीच एक शाखा अंजनेरीला होती. सेऊणचंद्र तिसरा ह्याचा शिलालेखच अंजनेरीच्या एका जैन मंदिरात आहे. अंजनेरीचे यादव हे बहुधा जैन धर्मीय होते. यादवांची दुसरी शाखा होती सिंदिनेरात, सिंदीनेर अथवा सिंदनगर म्हणजेच आजचं सिन्नर, नाशिकजवळचं.
ह्या सिन्नरातच यादवकालीन स्थापत्यशैलीचे काही अवशेष आहेत. त्यातलं प्रमुख म्हणजे गोंदेश्वर अथवा गोविंंदेश्वर मंदिर. हे मंदिर यादवराजा गोविंद ह्याने बांधले असावे असे मानले जाते. भूमिज शैलीतले हे महाराष्ट्रातले तुलनेने उशिरा निर्माण झालेले मंदिर. १३ व्या शतकातले. हे मंदिर बांधले गेले तेव्हा देवगिरी ही राजधानी होती. मात्र त्याहीआधीचे म्हणजे यादव हे मांडलिक असतानाचे आणि देवगिरी हे यादवांची राजधानी नसतानाहीच्या कालखंडात एक मंदिर सिन्नरात बांधले गेले होते. ते दुर्लक्षित मंदिर म्हणजे ऐश्वर्येश्वराचे. ह्यालाच आयेश्वर मंदिर असेही म्हणतात. यादव आईरमदेव ह्याने हे बांधले असावे असे मानले जाते. हा आईरमदेव म्हणजे सेऊणचंद्र द्वितिय ह्याच्या नंतरचा. आईरमदेवाचा कालखंड फारसा ज्ञात नाही. बहुधा हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत ह्याचा उल्लेख आहे.
तर हे आयेश्वराचं मंदिर दिसायला अगदी लहानसं. अगदीच १०/१५ मिनिटात पाहून होईल असं. किंचित वेगळ्या शैलीच. द्रविड आणि वेस्सर अशा मिश्र शैलीचं. मूळचं शिखर आज गायब आहे त्यामुळे शैली नीटशी ओळखता येत नाही. ऩक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप, पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी त्याची रचना.
आयेश्वराचं प्रथम दर्शन
सभामंडपातले स्तंभ बहुत नक्षीदार. मधूनच सुरसुंदरींची शिल्पे स्तंभांवर कोरलेली दिसतात.
ही शालभंजिका
मी चुकत नसेन तर ही गंगाच आहे.
ही कर्पुरसुंदरी का कोण
हा देव नक्की कोणता ते ओळखता आलं नाही
हा मात्र विष्णूच
सर्वच स्तंभ फार नजाकतीने कोरलेले आहेत.
स्तंभावर मंदिराचा डोलारा आपल्या हातांनी पेलणारे भारवाहक यक्ष आहेत. ह्यांनाच किचक असेही म्हणतात. यक्षांची संकल्पना पश्चिमेकडून आली, म्हणजे ग्रीकांकडून.
-
गर्भगृहाच्या द्वारावर जे एक शिल्प आहे ते इथलं खरं वैभव. नटराज शिव. सिंपली फॅण्टास्टिक
मकरांच्या मुखातून निघालेली अर्धगोलाकार नक्षीदार शिल्पपट्टिका. दोन्ही बाजूंना शिवाचा एकेक अनुयायी मकरांचे सारथ्य करतोय. शिल्पपट्टीकेवर वादक वाद्य वाजवताहेत, भारवाहक यक्ष पट्टीका तोलत आहेत, मधेच शरभादिल प्राणी आहेत तर त्याच्या वरच्या पट्टीकेवरील मोरांची रांगच आहे. तर संपूर्ण पटाच्या मध्यभागी शिव तांडवनृत्य करतोय. त्याच्या एका बाजूला पार्वती आहे तर दोन्ही बाजूला अनुयायी आहेत. पखवाजसदृश वाद्य वाजवताना एकजण तर अगदी स्पष्ट दिसतोय.
ह्याच्यापुढे अंतराळ आणि त्यापलीकडे गर्भगृह आहे. अंतराळावरही कहई शिल्पे कोरलेली आहेत पण अंधारामुळे छायाचित्रे घेता आली नाहीत.
तसाच मंदिराच्या बाहेर येऊन फेरी मारायला बाहेर पडलो
मंदिराच्या बाह्यभिंतीच्या चौथर्यावर बाणासारखे सरळ वर जाणारे स्तंभ अशी बाह्यभागाची रचना. मधेमध्ये काही देखणी शिल्पेही कोरलेली आहेत.
मंदिराचा बाह्यभाग
मंदिराचा पार्श्वभाग
अर्धस्तंभाचे नक्षीदार शिखर
स्तंभांवरही भारोत्तोलन करता करता शरभ आदि प्राण्यांवर स्वार होणारे यक्ष आहेतच.
हा यक्ष मला फार आवडला. एका हाताने तो भिंत तोलून धरतोय त्याचे वेळी तो आपल्या वाहनावर चाबूकही उगारतोय.
तर हे यक्ष चक्क कसरती करताहेत
मधूनच काही भग्न शिल्पं आहेत. बरीचशी अनाकलनीय आहेत. एकंदरीत इथे संशोधनाला बराच वाव आहे.
हे राम, लक्ष्मण, सीता का कृष्ण बलभद्र सुभद्रा काहीच कळत नाही.
हे माझ्या अंदाजाप्रमाणे इंद्रजिताचे लक्ष्मणासोबतचे द्वंद्व असावे. अगदी अशाच प्रकारचा रामायणातील पट जवळच्याच गोंदेश्वर मंदिरात आहे.
सुरसुंदरींच्या विविध प्रकारांची शिल्पे मात्र येथे फार आढळत नाहीत. जितकी आहेत ती सभामंडपाच्या स्तंभांवरच.
इतके सारे अवघे बघून होता होईता संध्याकाळ दाटून आलेली असते. मन मात्र अजूनही आयेश्वरातच गुंतलेले असते. असं वाटतं की येथेच काही काळ तसंच बसून राहावं अशाच काही आठवणी काढत.
💬 प्रतिसाद
(84)
च
चांदणे संदीप
Wed, 05/18/2016 - 14:42
नवीन
\o/ \o/ \o/
आता वाचून परत सविस्तर प्रतिसाद लिहितो! ;)
Sandy
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Wed, 05/18/2016 - 15:45
नवीन
हे विण्टरेस्टिंग आहे. असल्या जर्नल नॉलेजचा धागा काढावा ही अखिल दर्पणसुंदरी मित्रमंडळाकडून आपणास सविनय विनंती! आणखी एक गोड शप्पथ घातली असती पण असू दे! ;)
जरा जालावर शोधले असता, श्री संदीप दहिसरकर यांनी काढलेला इथे आणि इथे दोन्हीकडे एकच फ़ोटो पाहायला मिळाला, या ठिकाणाचा. लिन्केवर टिचकी मारायच्या आधी ऐका, तिथे त्यांचा स्वत:चाच क्लोजअप फ़ोटो आहे फक्त पार्श्वभागी या मंदिराची भिंत जराशी दिसते.
कधी जायचं बोला?
Sandy
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 16:41
नवीन
माय मिस्टेक. ग्रीक किंवा पर्शियामधून. काही जण यक्षांचा उगम भारतातलाच मानतात पण मला पटत नाही. यक्षदेवता कुबेर बाहेरून आलाय. सातवाहनकाळच्या शिल्पांत यक्ष मोठ्या प्रमाणावर दिसतात. बटबटीत डोळे,विद्रूप स्वरुप, बाहेर आलेल्या दाढा असे.
पुढे मागे दिक्पालांवर लिहिन तेव्हा त्यात यक्षांवरही थोडेसे लिहिन.
तसं पुण्यावरुन एका दिवसात जाउन येता येईल. गोंदेश्वर आणि आयेश्वर एकत्र करायचं.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 05/18/2016 - 14:43
नवीन
अप्रतिम
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 05/19/2016 - 14:20
नवीन
+१११
भारी..!!!
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 05/18/2016 - 14:53
नवीन
आम्हाला पण सांगत जा, नवनवीण शिल्पे बघायला आवडतात.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 16:43
नवीन
तीन चार वर्षांपूर्वी येथे आलो होतो रे. नाशिक आजोळ त्यामुळे अशी ठिकाणं मधूनमधून पाहून होतात.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 05/18/2016 - 14:56
नवीन
सुरेख फोटो.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 05/18/2016 - 14:57
नवीन
मन म्त्र अजून आयरेश्वरातच गुंतून राहिलेले.
शेवटी परत एकदा तो चाबूकवाला भारवाहक बघीतला...
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 05/18/2016 - 15:11
नवीन
ती गंगाच की रे वल्ल्या. अगदी असेच शिल्प वेरूळला कैलासात जाताना प्रवेशद्वारावर डावीकडे आहे, अगदी असेच!
बाकी हा लेख कुणासाठी समर्पित आहे का? नाही, उगा आपली एक शंका!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 16:46
नवीन
गंगाच रे. पण वाहन मकर हे कोरले नसल्याने लॉजिकली यमुना किंवा सरस्वतीही असू शकते. किंबहुना तसे अजून एक शिल्पही येथे आहेच. पण सरिताशिल्पच हे निश्चित.
बाकी लेख कुणाला समर्पित म्हणशील तर त्या ज्ञात अज्ञात शिल्पकारांना ज्यांनी हे अद्भूत घडवलं.
(झालं ना आता शंका निरसन)
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 05/18/2016 - 16:51
नवीन
पोपट रे तू बोलायला एकदम...शब्द काय खाली पडून देशील.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 16:54
नवीन
:)
- Log in or register to post comments
व
वपाडाव
गुरुवार, 05/19/2016 - 05:34
नवीन
मिरचि हविये का पोपटाला??
- Log in or register to post comments
प
प्रशांत
Wed, 05/18/2016 - 15:16
नवीन
लेख वाचुण भुलेश्वर, पेड्गाव भटकंतीची आठवण झाली
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 05/18/2016 - 15:25
नवीन
अहाहाहाहाहा,
पैल्या फोटोसाठीसाठी तू मागशील ते बक्षीस. अप्रतिम एकदम.
तो अपरिचित देव बलराम है का नांगरधारी? का दशावतारकथात बलरामाचा उल्लेख येत नाही?
एनीवे, सुंदर लेख, नजर लागण्यासारखे फोटो, अभ्यासू माहीती साठी धन्यवाद प्रचु डार्लिंग.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Wed, 05/18/2016 - 16:09
नवीन
मला पण तेच वाटल पण आकार नांगरासारखा वाटेना, मग छत्रीधारी वामन वाटतोय! पण नक्की नाही सांगता येत.
Sandy
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 16:50
नवीन
वामन नक्की नाही. कारण मुकुट आणि चार हात आहेत. बलरामदेखील असायची शक्यता कमी आहे कारण चार हात. ह्या अवतारमूर्ती मानवी असल्यामुळे द्विहस्त असतात. तशी बलरामाची वेरुळला चार हातांची मूर्ती आहे पण ती कृष्ण आणि सुभद्रा यांसह आहे आणि ही तिन्ही भावंडे त्यांच्या पूर्णावतारात दाखवलेली आहेत.
मला तरी ही मूर्ती प्रतिहारीची वाटते.
- Log in or register to post comments
प
पामर
गुरुवार, 05/19/2016 - 10:41
नवीन
त्रिविक्रम वामन मुर्तीला चार हात असतात आणि उंच किरिट सुद्धा असतो. ह्या मुर्तीचा उजवा पाय उचललेला आहे इथे तो नेमका भंगलेला आहे. बाकी पुढे ज्याला तुम्ही विष्णु मुर्ती म्हणले आहे,तो प्रतीहारी-व्दारपालच आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 10:45
नवीन
हो. त्रिविक्रम चतुर्हस्त असतो पण छत्री नसते.
- Log in or register to post comments
प
पामर
गुरुवार, 05/19/2016 - 11:09
नवीन
त्रिविक्रम मुर्तीत छत्री नसते हे मात्र खरय.अग्नी पुरणाच्या शिल्प शस्त्राच्या अनुसार संकर्षण-बलराम हा विष्णुचा नववा अवतार आहे. त्याची मुर्ती चतुर्भुज असुन त्याने- हल,चक्र,शंख आदी आयुधे धारण केली आहेत. अता नक्की काय हे तेच समजेना झालय.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 10:49
नवीन
ती विष्णूमूर्ती मलाही द्वारपाल वाटत होती पण हाती शंख चक्रासारखे अस्पष्टसे असे काहीसे दिसते. त्या मूर्तीचा पाय मात्र अगदी द्वारपालासारखाच उंचावलाय हे खरेच.
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 05/18/2016 - 15:31
नवीन
भारीच रे
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 05/18/2016 - 16:06
नवीन
डोळ्यांचे पारणे फिटले.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 16:51
नवीन
खवचट धन्या. :)
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 05/18/2016 - 16:54
नवीन
आत यात काय खवचटपणा केला ब्वाॅ धन्याने?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 16:57
नवीन
बघ की तूच.
डोळ्यांचे पारणे वगैरे.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 05/18/2016 - 17:41
नवीन
खवचटपणा नाही रे. खरंच आवडली शिल्पे.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 05/19/2016 - 05:50
नवीन
धन्याला खो मिळाल्याने चांगले म्हटले तर काय होईल या भीतीने फक्त...
वल्लींचा "अल्पोपहार" आवडला असे म्हणतो.
४-५ बघायला लागतील ती शिल्पे त्यांच्या दृष्टीने भोजन असते हा संदर्भ लक्ष्यात ठेवणे.
धागा हजेरीवाला नाखु
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 05/18/2016 - 17:06
नवीन
उत्तम लेख. छान लेख असे सारखे लिहायचा कंटाळा आला आहे.
पण वल्लीसाहेबांमुळे महाराष्ट्रात एवढी मोठ्या प्रमाणावर शिल्पे आहेत हे तरी समजले.
अन्यथा आम्ही फक्त अशी शिल्पे हळेबिड बेलूर येथेच आहेत हे समजत होतो.
हे लेख वाचले नसते तर माझ्यासारख्या असंख्य लोकांना महाराष्ट्राचा हा अनभिद्न्य असलेला अनमोल वारसा "अस्तित्वात आहे" हेच कळले नसते.
याबद्दल वल्लीसाहेबांचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 05/18/2016 - 21:30
नवीन
अगदी असेच म्हणतो, वल्लीमुळे महाराष्ट्राची ओळख नव्याने झाली असे म्हटले तरी चालेल.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 05/18/2016 - 17:35
नवीन
नेहमीप्रमाणेच अत्यंत वाचनीय अभ्यासपूर्ण लेख.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Wed, 05/18/2016 - 17:39
नवीन
अप्रतिम, लेख आणि फोटो दोन्ही!
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 05/18/2016 - 19:09
नवीन
पंचायतन आहे त्यापैकी हे कोणतं?
एका फोटोत तुम्ही असायला हरकत नाही चौकडीच्या निळ्या अर्ध्या शर्टात.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 05/18/2016 - 20:19
नवीन
चूकताय तुम्ही कंजूष काका..चेक्सचा हाफ शर्ट नाही, जोकरचा काळा टीशर्ट म्हणा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 02:26
नवीन
पंचायतन जवळच्या गोंदेश्वरात आहे. इथे हे एकटंच आणि भिन्न शैलीचं मंदिर आहे.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/18/2016 - 20:40
नवीन
नेहमीप्रमाणेच नेत्रसुखद चित्रांनी भरलेला ओघवत्या भाषेतला माहितीपूर्ण लेख.
सुरुवात खास आवडली !
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 21:29
नवीन
असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
गुरुवार, 05/19/2016 - 06:32
नवीन
फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणे छानच !या मंदिराची नेमकी शैली मात्र कळत नाहिये.नेमक शिखरच गायब.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 06:55
नवीन
शिखर गायब असलं तरी जो काही भाग अस्तित्वात आहे त्यावरुन द्रविड-वेस्सर अशा मिश्र शैलीचं वाटतं.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 05/19/2016 - 07:38
नवीन
वासर हिच नागर आणी द्रविड अशी मिश्र शैली आहे ना?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 08:23
नवीन
तसे काहीसे म्हणता यावे. पण वेस्सर शैलीत शिखरभागात आडव्या पट्ट्या ठेवून ती उभारली जातात त्यामुळे मंदिरांची उभारणी झटपट होते पण शिखरभाग तसा कमकुवतही बनतो.
अंजनेरीचं हे वेस्सर शिखर बघ

- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 05/19/2016 - 08:29
नवीन
हम्म बरोबरे.
नागर शिखराचा डौलदारपणा वेगळाच. आह्ह्ह. कंदारीय म्हादेव, लिंगराज ही सारी नागर ना?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 08:33
नवीन
हो.
नागरचं.
जायचं का खजुराहोला?
- Log in or register to post comments
व
वपाडाव
गुरुवार, 05/19/2016 - 11:38
नवीन
इथे हळेबिड-बदामी-ऐहोळे-हंपीला जाउन या...
बाकी नंतर..
- Log in or register to post comments
व
वपाडाव
गुरुवार, 05/19/2016 - 11:47
नवीन
:: मनीच्या बाता ::
औरंगाबादेतुन पाय सुटत नाही या महामानवाचा, म्हणे येता का खजुराहोला ??
-चिंचवडचा बाजीराव
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 11:55
नवीन
=))
ते पहिलं प्रेम आहे रे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 05/19/2016 - 13:38
नवीन
हे तर एक कौतुकच हाय.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 05/20/2016 - 06:26
नवीन
ते पयलं पिरेम ठेवा आता गुंडाळून... हम्पी बदामीला जावा.. सप्टेम्बर म्हयना मस्त होईल बेल्लारीचा चा किल्ला ही पहाता येईल.
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
गुरुवार, 05/19/2016 - 06:32
नवीन
फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणे छानच !या मंदिराची नेमकी शैली मात्र कळत नाहिये.नेमक शिखरच गायब.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »