..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
हातात हात आले,ह्रदयात नाम झाले
ती सोबतीस आली,कामात काम झाले
शिकवण समान होती,त्यांची जरी तरी ती..
कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
ऐटीत कार गेली,मंत्रीमहोदयांची..
शिस्तीत चालणारे,ट्राफिक जाम झाले..
सारेच चोर होते,पण एकला पळाला
त्याच्या फरार नावे,नंतर इनाम झाले
रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले
ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले
त्यांचीच सर्व दु:खे,त्यांनाच छान विकली
पाहुनि खूश तेव्हा,पब्लिक तमाम झाले
शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी
खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले
रस्ते अरूंद झाले,शेतात फ्लॅट आले,
गुत्तेहि बार झाले,विकसित ग्राम झाले
+ कानडाऊ योगेशु
💬 प्रतिसाद
(15)
आ
आदूबाळ
Wed, 05/18/2016 - 17:23
नवीन
वा ये बात!
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 05/18/2016 - 17:56
नवीन
रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले
ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले
____/\____
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 05/18/2016 - 19:57
नवीन
हे मस्तच!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Wed, 05/18/2016 - 19:59
नवीन
सुटे सुटे केले तर भारीच झालेत शेर.
Sandy
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 05/19/2016 - 03:25
नवीन
मस्त.
भाऊसाहेब पाट्णकरांची आठवण झाली.
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 05/19/2016 - 03:38
नवीन
+1111
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 05/19/2016 - 04:03
नवीन
आयुष्य मानवांचे त्या बेलगाम झाले
कोणी कसाब झाले कोणी कलाम झाले
छायेत रामयांच्या रावणही निपजला
वस्तीत रावणांच्या ऐसेही राम झाले
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/19/2016 - 06:17
नवीन
मतला बेस्टच.
हे ही सुंदरच पण रामयांच्या ऐवजी राघवांच्या जास्त गेय वाटते आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/19/2016 - 04:09
नवीन
आवडली गझल.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/19/2016 - 04:17
नवीन
भारी लिहीले आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 05/19/2016 - 05:09
नवीन
लिहिले आहे
- Log in or register to post comments
आ
आतिवास
गुरुवार, 05/19/2016 - 05:33
नवीन
मस्त लिहिलंय.
कसाब - कलाम अगदी पटलं.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 05/19/2016 - 06:04
नवीन
मस्तच!
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 05/19/2016 - 06:06
नवीन
लय भारी
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/19/2016 - 06:15
नवीन
प्रतिसाद देणार्या सर्वांन्ना धन्यवाद!
- Log in or register to post comments