Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हाती लागलेले मृगजळ - 'लास वेगस'

ह
हृषिकेश पांडकर
गुरुवार, 05/19/2016 - 10:38
💬 69
निसर्गाने ताटात वाढून ठेवलेलया पदार्थांचा उपभोग घेणे ही पर्यायाने सोपी गोष्ट आहे.सोपी असलेली गोष्ट देखील आपण पूर्णपणे करत नाही हा भाग निराळा.बरेचदा या निसर्गाच्या वरदहस्ताची अवहेलनाच दिसून येते.दुर्दैव देणार्याचे कि आपल्यासारख्या स्वीकारणाऱ्याचे हा प्रश्न तितकाच अनुत्तरीत. कदाचित वरच्या वर्णनातून आपण काय वाचत आहोत याचा संदर्भ लागणे अवघड आहे.पण लेखाची सुरुवात जड शब्दांनी केली की पुढे केलेल्या वर्णनाला दाद मिळू शकते हे मला माझ्या पहिली ते दहावीच्या मराठीच्या पुस्तकाने शिकविले. असो…तर पहिल्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे निसर्गाने वाढलेले ताट म्हणजे आपल्या सभोवताली असलेले जंगल,समुद्र,वाळवंट,प्राणी,पक्षी आणि इतर बर्याच गोष्टी,ज्या आपण हक्काने आणि पोटभरून पाहू शकतो.आता या गोष्टी जश्या आहेत तश्या बघणे हि तर इतकी सहज आणि सुंदर गोष्ट आहे की त्याची तुलना इतर कशाशीही होवू शकत नाही.कदाचित याआधी जंगल,समुद्र,बर्फ आणि पाऊस या गोष्टींचे वर्णन तुम्ही वाचले असेलच.आज मी तुम्हाला अशीच गोष्ट वाचायला भाग पाडणार आहे.यावेळी मात्र असा विचार आहे की याच निसर्गाच्या चौथर्यावर मानवनिर्मित उभारलेला दरबार किती अद्भुत आणि अविस्मरणीय असू शकतो याची जाणीव करून द्यावी. समुद्रावर उभारलेले मोठे पूल पाहिले,जंगलात बांधलेली फार्म हाउस पाहिली,बर्फात उभारलेली अलिशान घरे पाहिली,पाण्याखाली बांधलेली भव्य प्रयोगशाळा पाहिली…आता वेळ आली होती ती रुक्ष कोरड्या वाळवंटात,रात्री थंडीने गारठणार्या आणि दुपारी उन्हाने तापणाऱ्या सोनेरी रेतीत मांडलेला जुगार अड्डा बघण्याची.'The Entertainment Capital Of World' ज्याला म्हटले जाते असे 'लास वेगास' पाहण्याची.एखाद्या वाळवंटावरील सात किलोमीटरचा रस्ता जगाच्या मनोरंजनाची राजधानी कशी होवू शकते हे कुतूहल घेवून उडालेले विमान जेव्हा वेगस विमानतळावर विसावते तेव्हा अलीबाबाच्या गुहेत जाणार्या त्या चाळीस चोरांची मानसिकता जशी होती तशीच माझी पण झाली होती.स्वर्गात जेव्हा सारीपाट खेळला जात होता तेव्हा कदाचित मद्य आणि मदिरेच्या प्रभावाखाली आल्यामुळे हातातून पडलेले खेळाचे फासे भूतलावर येवून याच वाळवंटात पडले असा भास मला वेगस विमानतळावरून हॉटेल मध्ये जाताना होत होता.होणारा भास आणि वास्तव यात आता फक्त काही मिनिटांचाच अवधी शिल्लक होता. वेगस म्हणजे तो सात किलोमीटरचा पट्टा आहे ज्याला 'Las vegas Strip' असे म्हटले जाते.त्याच रस्त्यावरून मी बसने हॉटेलवर निघालो होतो.डिसेंबरच्या थंडीत पडलेले दुपारी बाराचे ऊन पावसाळ्यात सिग्नलला एखाद्या ट्रकच्या सायलेन्सर शेजारी उभे राहिल्यावर मिळणारे समाधान देत होते.पण दुतर्फा असलेला नजारा यातील एकही ऋतूचा थांगपत्ता लागू देत नव्हता. प्रवासाचा शीण बोर्डिंग पास बरोबरच कचर्यात टाकल्यामुळे मावळणारा सूर्य उगवणाऱ्या चंद्राच्या साक्षीने काय दाखवणार याची उत्सुकता सोबत घेवूनच मी हॉटेल मध्ये चेकइन केले. स्ट्रीपच्या एका टोकाला हॉटेल असल्यामुळे संपूर्ण रस्ता पालथा घालून हॉटेलच्या दारात येवून ठाकलो.सामान घेवून लॉबी मध्ये गेलो.सुमारे दोन इंचाचे गालिचे संपूर्ण हॉटेलभर अंथरले होते.काचेचा दरवाजा उघडला आणि बाहेर थंडी आहे की ऊन याचे गणित चुकविणारा सुखद वार्याचा झोत अंगावर आला.हॉटेलचा संपूर्ण तळमजला दिव्यांनी न्हावून निघाला होता.'लक्ष्मी लॉटरी सेंटर' अशा पडदा लावलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर जायची वेळ कधी आली नाही पण तो काचेचा उघडलेला दरवाजा आणि त्या अड्ड्यावरचा तो मळलेला पडदा पलिकडची दुनिया तांत्रिकदृष्ट्या सारखीच पण तितक्याच कमालीची विसंगती मी न्याहाळत होतो.हॉटेलचा संपूर्ण तळमजला नजर जाईल तिथपर्यंत कसिनो ने व्यापला होता.मी आवंढा गिळला आणि खोलीचे दर लावले. 1 सूर्याने दिवसभर काम चोख बजावले होते.सुर्य अस्ताला टेकला आणि रस्त्यावरच्या दिव्यांनी शहराचा ताबा घेतला.'Gambling City' या नावाखाली वावरणाऱ्या रस्त्यावर मी पहिले पाऊल ठेवले.आणि या नावाला न्याय देण्यासाठी समोरचा रस्ता सज्ज होता.थंडी असूनही फार जाणवत नव्हती.आता आपल्यापेक्षा कमी कपडे घालणाऱ्या सुंदर मुली जर थंडीची फिकीर करत नसतील तर माझ्यासारख्याने थंडी थंडी म्हणून त्याचा बाऊ करणे बरोबरही दिसत नाही.रस्त्यावर असलेल्या गर्दीतील प्रत्येक चेहेरा पाहण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ जात होता.कारण सवयीच्या गोष्टी दुर्लक्षित होतात कदाचित, पण ज्या गोष्टींची सवय नसते त्या गोष्टी निरखुनच पाहणे योग्य.त्यामुळे गर्दी असली तरी त्याचा त्रास होत नव्हता. दुतर्फा रोषणाईने न्हावून निघालेली ती हॉटेल्स,त्यांच्या तळमजल्यावर असलेले अलिशान कसिनो,कुठल्याही हॉटेलमध्ये फुकट मिळणारा प्रवेश,कुठेही आणि कितीही वेळ थांबण्याची असलेली मुभा,कंटाळा येईपर्यंत फोटो काढण्याची परवानगी आणि नजर जाईपर्यंत पसरलेले सौंदर्य घड्याळ आणि पर्यायाने वेळेशी असलेली नाळ तोडून टाकत होते.इथे 'Time is Money' हे समीकरणच नाहीये.इथे Time + Money = Vegas हे एकाच सूत्र सगळ्या गणितांसाठी वापरले जाते. असच फिरता फिरता एका हॉटेलच्या कसिनोमध्ये 'High Stakes Poker' लिहिलेल्या दालनात आलो.दालन हा शब्द मुद्दामच वापरला कारण शंभर एक लोक शांतपणे खुर्चीवर बसून पोकर खेळत होती.किमान १०० अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे ६००० रुपये हि प्राथमिक किंमत लावून तुम्ही खेळू शकता.लोक आनंदाने खेळत होते.हातात दारूचा ग्लास,तो पुढ्यात आणून देणाऱ्या सुंदर तरुणी,पत्ते पिसून वाटणार्या देखण्या अप्सरा,जिंकलो तर आनंदच आणि हरलो तरी आनंदच होता.'वय वर्ष अठरा' एवढी एक अट सोडली तर बाकी कुठलीही अट या रस्त्याला नाही.८० वर्षाच्या म्हातारी पासून २५ वर्षाच्या तरुणीपर्यंत सगळ्या वयातील लोक जुगारी आनंद उपभोगत होते.कुठेही घाई किव्वा गोंधळ दिसत नव्हता.प्रत्येक खेळणारे,तिथे काम करणारे सगळेच कायम हसतमुख आणि आनंदी दिसत होते.आणि कदाचित हीच या शहराची किमया आहे. जगातील विविध शहरांची प्रतीकात्मक उभारणी करून हॉटेल्स बांधलेली आहेत.पॅरिस,अमेरिका,इजिप्त,वेनिस इत्यादी प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या वास्तु त्या त्या ठिकाणी गेल्याची जाणीव करून देतात.त्या ठिकाणचे वैशिष्ट्य इतक्या कल्पकतेने रचले आहे की वेनिसची प्रतिकृती असलेल्या हॉटेल मधून फिरत असताना त्यांनी रंगवलेले आकाश,सभोवताली नदीतून फिरणार्या त्या होड्या,त्यावर वल्हवत असताना गाणी म्हणणारे नावाडी आणि त्यात बसलेली सुंदर जोडपी.अक्षरशः हजारो मैलावर असलेले इटली मधील वेनिस साक्षात डोळ्यासमोर येते.इजिप्तचे हॉटेलच मुळात पिरॅमिडमधे बांधलेले आहे त्यामुळे त्या भव्य त्रिकोणी वास्तूत असलेल्या हजारो खोल्या डोळ्याचे पारणे फेडतात.पॅरिस कसीनोच्याबाहेर असलेल्या कॅफे मधे बसलेले वाइन पिणारे लोक पाहिले की अमेरिकेतून फिरताना देखील उगीचच 'Champ De Mars' मधून फिरल्याचा भास व्हावा. 2 या रस्त्यावर करमणूक सोडून काहीही नाही.पण हा रस्ता ज्याप्रकारे जपला आहे ते पाहून अचंबा वाटतो.जगभरातील विविध देशाचे लोक चालताना दिसत होते.एकतर भरजरी कपडे किव्वा कपडेच नाहीत या दोनच अवस्था येथे पहायला मिळतात.विलक्षण सौंदर्य आणि पोशाखाची पद्धत यांचा मिलाप म्हणजे दुधात साखर होती. 3 फोटो काढावे की डोळ्यात साठवावे अशी दुहेरी मानसिकता अनुभवायला मिळत होती.अर्थात दोन्ही गोष्टी मनसोक्त करून झाल्याखेरीज तिथून निघणे शक्य नव्हते.'Ballegio' नावाच्या हॉटेल समोर असलेल्या कारन्ज्याचा तो 'शो' थक्क करणारा होता.म्हैसुरच्या वृंदावन गार्डन मधील कारंजी पहिली होती पण शेकडो स्क्वेअर फूटांच्या जागेत पसरलेला तो नयनरम्य कारन्ज्याचा जादुई देखावा तोंडात बोटे घालायला लावणारा होता.अर्थात रस्त्यावर उभे राहून हे पहाणे आणि ते ही एकही पैसा खर्च न करता हे माझ्यासारख्या पुण्यातल्या माणसाला अजुनच आनंददाई वाटत होते.रात्रभर ठराविक अंतराने होणारा तो शो पाहणारे लोक तल्लीन होऊन ते बघत होते.काही प्रेमी युगुल गळ्यात गळे घालून त्याचा आनंद घेत होते तर काही नुसतेच शेजारी उभे राहून.लग्न झालेल असाव कदाचित.काही फोटो काढण्यात मग्न.थोडक्यात काय तर रस्त्यावर फिरणारा एकही व्यक्ती समाधानाखेरीज परतत नव्हता. . खर्या अर्थाने वाइन,वेल्थ आणि वुमन या ३ 'Ws' वर संपूर्ण शहराचा उभा राहिलेला मनोरा पाहताना आश्चर्य आणि कुतुहल याची जाणीव पदोपदी होत होती.या स्ट्रिपच्या एका बाजूला सर्वात शेवटी 'Welcome To Vegas' अशी मोठी पाटी लावलेली आहे.या पाटीसमोर उभे राहून फोटो काढण्यासाठी असलेली गर्दी या शहराच्या प्रसिद्धीची प्रचीती करून देते. या संपूर्ण स्ट्रिपवर तीन ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी बांधलेले पूल आहेत.या पुलाला दोन्ही बाजून जाळी लावलेली आहे,पूल ओलांडत असताना दोन्ही बाजूला दिसणारी रोषणाई निमिशार्धासाठीसुद्धा डोळे बंद करण्याची मुंभा देत नाही.वाहनांनी वाहणारा रस्ता आणि पर्यटकांनी ओथंबणारा फुटपाथ लोकप्रियतेची पावती फाडत असतो. या शहराच्या maintenance चा खर्च कुठून निघतो,फक्त पर्यटन हाच जर इथल्या आर्थिक व्यवस्थेचा स्त्रोत असेल तर हा पुरेसा आहे का ? जुगार खेळणार्या लोकांचा पराभव हे इथल्या लोकांचे उपजीविकेचे साधन आहे का ? या अनुत्तरीत प्रश्नांनी माझ्या विचारशक्तीला ताण दिला. या दोन रात्री आणि तीन दिवसाच्या माझ्या मुक्कामात अनंत आठवणी आणि अनुभव गोळा करून मी या अलीबाबाच्या गुहेचा निरोप घेत होतो.सकाळी उठून पुन्हा त्याच रस्त्यावरून विमानतळावर वर येणे थोडे जड जात होते.पण उस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा नसतो...त्यामुळे या ग्लाससभर उसाच्या रसानी मी तृप्त होऊन परतत होतो. शारीरिक तारुण्य जपणे एका मर्यादेनंतर शक्य नसते पण मानसिक तारुण्य खरच चिरतरुण राहू शकते.त्यामुळे या पन्नास राज्यांच्या महासत्तेला भेट देण्याची संधी मिळाली तर हे पश्चिमेचे वाळवंट नक्की बघा.कारण अमेरिका म्हणल्यावर बाकीची पर्यटनस्थळे एका बाजूला आणि 'लास वेगस' एका बाजूला. आज पु.ल पाहिजे होते..त्यांच्या लेखणीतील वेगस अनुभवायची खूप इच्छा होती.पु.ल.नी वेगस पाहिले नाही हे कोणाचे दुर्दैव माहित नाही पण या अद्भुत शहराची सफर त्यांच्या लेखणीतून निसटली हे आपले दुर्दैव नक्की..! विमानतळावर असलेली 'What happens here stays here' ची पाटी खूप काही सांगून जाणारी होती.या तीन दिवसांचा सारांश केबिन लगेज बरोबर बांधून मी विमानात बसलो.. 5 विमानाने वेगस सोडले आणि अचानक 'मृगजळ' म्हणजे काय याची व्याख्या डोळ्यासमोरून तरळली.वाळवंटातील उन्हात लांबवर होणारा पाण्याचा भास म्हणजे 'मृगजळ'.ज्याचे अस्तित्व मात्र कधीच नसते.फक्त एक फसवे असे उन्हातील पाणी.आज मात्र मी या 'मृगजळाला' अनुभवले होते.अशाच एका वाळवंटात असलेले 'लास वेगस' नावाचे मृगजळ. हृषिकेश पांडकर

प्रतिक्रिया द्या
21749 वाचन

💬 प्रतिसाद (69)
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/19/2016 - 10:51 नवीन
सुंदर लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:37 नवीन
धन्यवाद मृत्युंजय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रचेतस गुरुवार, 05/19/2016 - 10:52 नवीन
छान लिहिलंय. वेगासला जायलाच हवं एकदा.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:38 नवीन
धन्यवाद प्रचेतस ...नक्कीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
इ
इशा१२३ गुरुवार, 05/19/2016 - 10:59 नवीन
सुरेख फोटो.लेखही आवडला.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:39 नवीन
धन्यवाद इशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३
इ
इशा१२३ गुरुवार, 05/19/2016 - 10:59 नवीन
सुरेख फोटो.लेखही आवडला.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 05/19/2016 - 11:28 नवीन
कडक आहे यार... कधी जाता येईल....वाट बघतोय कॅलिफोर्नियाला जाऊनही, शक्य असूनही वेगास मिस झालं; अ‍ॅक्चुअली करायला हवं होतं असं वाटतंय आता. असो.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:40 नवीन
पुढील वेळी संधी मिळाल्यास नक्की अनुभव घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
सतिश गावडे गुरुवार, 05/19/2016 - 11:33 नवीन
छान लिहिलंय. वेगासला जायलाच हवं एकदा.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:41 नवीन
धन्यवाद ..नक्कीच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वपाडाव गुरुवार, 05/19/2016 - 11:51 नवीन
छान लिहिलंय. वेगासला जायलाच हवं एकदा.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:42 नवीन
नक्की वपाडाव ..मस्ट विजीट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
अ
अजया गुरुवार, 05/19/2016 - 11:55 नवीन
छान लिहिलंय. वेगासला जायलाच हवं एकदा.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:43 नवीन
धन्यवाद अजया !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
श
शान्तिप्रिय गुरुवार, 05/19/2016 - 11:58 नवीन
ह्रुषिकेशजी , मस्त वर्णन. वेगस ला एकदा भेट द्यायलाच हवी. किती जणांना मनोरंजन दिले असेल या नगरीने. त्याचप्रमाणे अनेक जणांना आयुष्यातुन उठवलेहि असेल परंतु ही नगरी पाहायची मनोकामना न ठेवणारा विरळाच!
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:45 नवीन
धन्यवाद शांतीप्रिय ... तुमचे म्हणणे अगदी खरे आहे ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय
स
संजय पाटिल गुरुवार, 05/19/2016 - 13:51 नवीन
छान लिहिलंय. वेगासला जायलाच हवं एकदा.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:46 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/19/2016 - 14:01 नवीन
आवडले....
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:46 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रचेतस गुरुवार, 05/19/2016 - 14:26 नवीन
अरं काय चाललंय. सगळे मी दिलेलाच प्रतिसाद का कॉपी पेस्ट करायलेत?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 05/19/2016 - 14:51 नवीन
तुस्सी मिपा दी तोप हो, एकुलती एक होप हो. चलो लास वेगास !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. गुरुवार, 05/19/2016 - 15:11 नवीन
तुस्सी मिपा दी तोप हो, एकुलती एक होप हो. अजिंठा वेरुळ के पोप हो, दुपारची मस्त झोप हो पान मे बडीशोप हो, सभी भांडे मे पित्तलका टोप हो. बाथरुम का डव्ह सोप हो, एकता की डेली सोप हो. सच्ची मे प्रचु डार्लिंग तुम किसीके मनके आंगनका नया नया लगाया रोप हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अभ्या.. गुरुवार, 05/19/2016 - 15:13 नवीन
चलो लास वेगास राह्यलेच की. काठी न घोंगडं घेउद्या की रं. मला बी जत्रेला येऊ द्या की रं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रचेतस गुरुवार, 05/19/2016 - 15:52 नवीन
अरे बास बे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चतुरंग गुरुवार, 05/19/2016 - 19:26 नवीन
"रोप" हा इंग्लिश नसून मराठी आहे हे समजायला अंमळ काही क्षण लागले तेवढ्यात नजरेसमोर भलतेच काही तरळले.... (डेरेदार्)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:47 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
इ
इरसाल Mon, 05/23/2016 - 14:56 नवीन
रोपच म्हटला, जरा काना इकडचा तिकडे झाला असता तर लैच लफरे झाले अस्ते बोल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
रमेश भिडे गुरुवार, 05/19/2016 - 14:47 नवीन
लिहिलंय छान. एकदा वेगासला जायलाच हवं. (प्रतिसाद वेगळा आहे)
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:47 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे
प
पद्मावति गुरुवार, 05/19/2016 - 14:53 नवीन
छान लिहिलंय. लेखाचं शीर्षक सुद्धा अगदी पर्फेक्ट आहे.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:48 नवीन
धन्यवाद पद्मावती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ज
जुइ गुरुवार, 05/19/2016 - 15:43 नवीन
फोटो मात्र अजून हवे होते वेगासचे.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:49 नवीन
धन्यवाद..फोटोसचे नक्की लक्षात ठेवीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ
प
पैसा गुरुवार, 05/19/2016 - 16:31 नवीन
सुरेख लिहिलंय
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:49 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बाबा योगिराज गुरुवार, 05/19/2016 - 17:09 नवीन
आमीबी चिट्टी लिवली, आन आमच्या बकिटीत टाकून ठूली हाय.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 05/19/2016 - 19:38 नवीन
छान वर्णन आहे. फोटोही आवडले. माझी या ठिकाणाची आठवण वेगळी आहे पण तुम्ही जसे वर्णन केले आहे तसे माझ्या मामेबहिणीने केले होते.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:50 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ख
खटपट्या गुरुवार, 05/19/2016 - 22:57 नवीन
आत्तापर्यंत १६/१७ वेळा गेलोय वेगास ला. प्रत्येकवेळी वेगळा वाटला. आता परत मोठ्या विकांताला जातोय.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:51 नवीन
मस्तच ..मजा करा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अर्धवटराव Fri, 05/20/2016 - 00:13 नवीन
दोन रात्री थांबलात ना ?? तिथे नेमकं काय केलं/झालं ते सांगा कि ;)
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:53 नवीन
'What happens here stays हेरे' ...असं तिथे लिहिला होतं म्हणून ...अन्यथा नक्की सांगितलं असतं.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सुयोग पुणे Fri, 05/20/2016 - 01:15 नवीन
पुलं नी वेगस पाहिलं नाही हे कोणाचे दुर्दैव माहित नाही..
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:55 नवीन
धन्यवाद सुयोग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुयोग पुणे
न
नेत्रेश Fri, 05/20/2016 - 02:17 नवीन
Mandalay Bay, Venetian, Paris casino आणी कारंज्याचे फोटो चांगले आलेत.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:54 नवीन
धन्यवाद नेत्रेश !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
र
रातराणी Fri, 05/20/2016 - 08:26 नवीन
छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Fri, 05/20/2016 - 08:53 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा