Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

..किती लौकरच आज उजाडलं बाई..

क — कानडाऊ योगेशु, Fri, 05/20/2016 - 08:03
..किती लौकरच आज उजाडलं बाई.. सजणाच्या मिठीमध्ये कळालच नाही किती लौकरच आज उजाडलं बाई... सजणाच्या प्रेमाला ह्या नाही वेळ काळ झोपलयं पहा कसं कुक्कुलसं बाळ.. झोपमोड त्याची मला करवत नाही.. चांदण्यात न्हालो दोघे काल पुरी रात्र.. अमृताने तृप्त झाली,हर एक गात्र.. वाटे सकाळच कधी उगवणार नाही..! तसा आहे आज छान रविवार सुस्त.. घ्यावी गडे अजुनिया..झोप थोडी मस्त... लावले मी दूर त्याला पिटाळुन बाई.. सजणाच्या प्रेमालाही काळवेळ नाही... किती लौकरच आज उजाडलं बाई + कानडाऊ योगेशु

प्रतिक्रिया द्या
2791 वाचन

💬 प्रतिसाद (11)
र
रातराणी Fri, 05/20/2016 - 08:15 नवीन
खी खी खी!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 05/20/2016 - 13:33 नवीन
यात खी खी करण्यासारखे काय आहे बाॅ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Sat, 05/21/2016 - 03:13 नवीन
सगळंच कसं इस्क्टुन सांगायच तै. मला लाज वाट्टे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्रचेतस Fri, 05/20/2016 - 09:47 नवीन
=)) पाभेंच्या कवितांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 05/21/2016 - 01:27 नवीन
धन्यवाद प्रचेतस... तुम्ही जागवलेल्या माझ्या आठवणींखातीर माझा काव्यात्मक प्रतिसाद.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चांदणे संदीप Fri, 05/20/2016 - 09:49 नवीन
मेण्टेण्ड ठेवा की हो जरा दर्जा आणि काय ते...! - (रावसाहेब) Sandy
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 05/20/2016 - 13:21 नवीन
गपा अण्णा गपा! ;) रच्याकने : इथे श्रूंगारीक लावणी लिहायचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे विषय कम दर्जाचा निवडला आहे असा (गैर) समज होऊ शकतो.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Fri, 05/20/2016 - 14:10 नवीन
सगळ्या प्रकारचे प्रयत्न झालेच पाहिजेत! येऊद्या अजून! बेस्ट ऑफ लुच्क!! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
न
नाखु Fri, 05/20/2016 - 11:07 नवीन
पाच दिसांचा आठौडा असल्यांची !!! वल्लींची दादही दिलखुलास (का काय म्हणत्तात) तशी आहे. निरिक्षक नाखु
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 05/20/2016 - 13:21 नवीन
धन्यवाद रातराणी,प्रचेत,चांदणे संदीप आणि नादखुळा!
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 05/20/2016 - 13:22 नवीन
अर्र्र ते प्रचेत च्या ऐवजी प्रचेतस असे हवे होते.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा