Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"मी न मोजलेले आनंदी क्षण"

म
मुक्त विहारि
Sat, 05/21/2016 - 07:04
🗣 26 प्रतिसाद
मी न मोजलेले कितीतरी आनंदी क्षण कितीतरी आले. साले मोजायचेच कशाला? ते त्यावेळी तर उपभोगायचे असतात. रामदासांच्या आणि सर्वसाक्षांच्या बरोबर, पारशी बेकरीत खाल्लेल्या गार्लिक ब्रेडची चव विसरीनही कदाचित, पण.... त्यांच्या बरोबरची मैफिल विसरणे कसे शक्य आहे? त्याच्याच जराशा अलिकडे-पलिकडे, राणीच्या बागेतले ते नुलकरांच्या बरोबर वृक्षांची ओळख विसरीनही कदाचित, पण.... त्या कट्ट्याच्या निमित्ताने झालेली विमेंची ओळख आणि विमें बरोबर झालेली सात जन्माची दोस्ती कशी विसरेन. असेच कधीतरी वल्लींच्या बरोबर, लेणी बघण्याचा, की लेण्यांच्या संगतीत रमलेल्या वल्लींना, बघण्याचा बेत ठरतो. कुणी तरी लगेच धागा काढतो. घारापुरी किंवा असेच कुठलेतरी स्थळ ठरते. वल्ली आणि वल्लींचे शिष्यगण जमायला जास्त वेळ पण लागत नाही. बरेच सुंदर क्षण आपोआपच पोतडीत जमा होतात. कोण कुठला गारूडी (जॅक डॅनियल) आणि पनीरवाले बाबा (दीपक कुवैत) येतात. परत एकदा मदनबाण अत्तरांच्या कुप्या घेवून येतो. त्या अत्तरांचा वास विसरीनही कदाचित....पण..... तलावपाळीच्या साक्षीने झालेला तो कट्टा विसरणे कसे शक्य आहे? असे बरेच क्षण आयुष्यात आले आणि ते क्षण सतत लक्षांतही राहिले. आयूष्य हे असेच असते. उत्तम मित्रांच्या साथीने घालवलेले क्षण आठवत, दिवस सार्थकी लावायचा...की.... उगाच, दू:खाचे उमाळे सोडत, एकलकोंडेपणे, आपलेच आयुष्य काळवंडून घ्यायचे आयुष्य ! ही तर एकोप्याने राहण्यातली मज्जा आहे... तो उपभोगायला खरेच वेळ कमी पडतो.
वर्गीकरण
मी न मोजलेले आनंदी क्षण

प्रतिक्रिया द्या
3719 वाचन

💬 प्रतिसाद (26)
व
विवेकपटाईत Sat, 05/21/2016 - 07:29 नवीन
मजा आहे, तुम्हाला मित्र तरी आहे. गेल्या २० वर्षांत सर्व मित्रांना मुकलेला.,,,
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 05/21/2016 - 08:10 नवीन
ओ दादा, दिल्ली सोडून या की चार दिस हिकड, करुया मैतरी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 08:31 नवीन
+ १ सध्यातरी आमच्यासाठी दिल्ली खूपच दूर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
ट
टवाळ कार्टा Sat, 05/21/2016 - 08:24 नवीन
आयला...तुम्ही पण कवीतेच्या पाठी लाग्लात =)) *नंदी पॅलेस कट्टेकर्यांना अनुल्लेखाने मारल्याबद्दल कच्कून निशेढ....वचपा पुढल्या कट्ट्यात काढ्ला जैल
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 08:30 नवीन
हे तर मुक्तक असल्याने, "काथ्याकुटात" टाकले आहे. नंदी पॅलेसच न्हवे तर असे बरेच कट्टे, नुकताच झालेला पुण्याच्या कट्ट्याचा उल्लेख पण केलेला नाही आहे. बाद्वे, परत एकदा एखादा घरगूती कट्टा करायचा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 05/21/2016 - 08:39 नवीन
चला करु की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 08:41 नवीन
पुढचा शनिवार-रविवार मी फ्रीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 05/21/2016 - 08:51 नवीन
खिक्क...मी इतक्या लवकर फ्री नाहीये....पनीर येतोय जून मध्ये तेव्हा जमवू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 08:54 नवीन
आता एखादे घर आठवड्यासाठी शोधणे आले..... बादवे, पनीर बाबाला हायजॅक करायला कोण कोण येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 05/22/2016 - 09:11 नवीन
पनीरबाबाला ठिकाण सांगितले तर तो स्वतःच येईल तिथे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रचेतस Sat, 05/21/2016 - 08:38 नवीन
छान लिहिलंय. मुविंकाकांसारखा डायहार्ड मिपाप्रेमी मित्र म्हणून मिळायला देखील भाग्य लागतं. मिपामुळेच केवळ हे शक्य होतं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 08:48 नवीन
ह्याला अनुमोदन.... आमची बायको म्हणते, "मिपा ही रत्नांची खाण आहे, पण इथे "रत्नपारखी" व्हायला लागते.इथे "गाजरपारख्यांचे" काम नाही."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु Sat, 05/21/2016 - 09:30 नवीन
आणि वरील दोघांचा स्नेहही मिपा मुळेच मिळाला हेही सुर्य प्रकाशाइतके साफ सत्य आहे. मिपा सौर उर्जेतला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
द
देशपांडे विनायक Sat, 05/21/2016 - 08:42 नवीन
माझे ही आनंदाचेच क्षण खालील प्रतिसाद वाचला आणि अरुण देशपांडे यांचे एक स्नेही यांना दोन दिवसापूर्वी फोन केला mobile वर नीट ऐकू येईना म्हणून landline वर बोलत बसलो विषय अर्थातच तुम्हाला केलेली मनाई हा होता फक्त एक तास सदोतीस मिनिटे बोलत होतो असे फोन ठेवल्यावर लक्षात आले . हे क्षण मला मिळण्यास तुम्ही निमित्य झालात आणि कळवण्यासाठी कारणही झालात श्री.अरूण देशपांडे ह्यांच्या सौर शेतीला भेट दिली. मुक्त विहारि - Thu, 12/05/2016 - 17:42 त्यांच्या उपक्रमाबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल, मला कुठल्याही प्रकारे लेखी माहिती द्यायला, त्यांनी मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल इथे माहिती देता येत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 08:52 नवीन
हे एक वेगळेच व्यक्तीमत्व आहे आणि त्यांचे विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही. शिवाय त्यांच्याबद्दल माहिती देतांना, माझ्याकडून काही गैर-समजूत होईल, अशी शब्द रचना पण होवू शकते, केवळ ह्याच कारणासाठी, त्यांनी नकार दिला. मला पण त्यांचा हा विचार पटला, म्हणून मी पण तो विषय जास्त लांबवला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे विनायक
द
देशपांडे विनायक Sat, 05/21/2016 - 13:47 नवीन
आम्ही ही त्यांच्या विचारावर आणि इतर काही विचारावरच बोलत होतो म्हणूनच ते क्षण आनंददायी होते अरुण देशपांडे यांचे हे स्नेही हौस म्हणून शेती करत असून त्यांच्याशी तुम्हाला बोलावयास आवडेल असे वाटते म्हणून तुम्ही माझा उपयोग करू शकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 13:56 नवीन
अरूण देशपांडे ह्यांच्या स्नेह्यांचा मोबाईल नंबर व्यनि केलात तर उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे विनायक
द
देशपांडे विनायक Sun, 05/22/2016 - 04:18 नवीन
व्यनि केला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ब
बोका-ए-आझम Sun, 05/22/2016 - 07:45 नवीन
रुलाओगे क्या? बाकी हा लेख निरवानिरवीचा का वाटतोय मला?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/22/2016 - 14:23 नवीन
निवृत्ती अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
महामाया Sun, 05/22/2016 - 17:57 नवीन
आयुष्य ! तो उपभोगायला खरेच वेळ कमी पडतो. खरंय... याची प्रचीति वेळ निघून गेल्यावर कळते...
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 05/22/2016 - 22:18 नवीन
अरे! सगळेजण भावुक वगैरे झाले की काय?
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 05/23/2016 - 10:46 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 05/23/2016 - 10:51 नवीन
कचकून दवणीय सात जन्माची दोस्ती वेग्रे =))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/23/2016 - 15:01 नवीन
कधीतरी, कुठल्या तरी क्षणाला... एखाद्या व्यक्तीशी ओळख होते आणि एक प्रगाढ मैत्री होवून पण जाते. असो, बाकी, जून मध्ये पनीरवाल्या बाबांना भेटायला येणार ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
मारवा Mon, 05/23/2016 - 15:59 नवीन
माणस जोडणे त्यांच्या संगतीत आनंद घेणे हा मुविंचा सहज स्वभाव वाटतो. दवणीय नाही वाटत त्यांची ती प्रसन्न शैली आहे मांडण्याची जगण्याची. दवणीय हा वेगळा आजार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा