Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(किती लौकर आज उजाडलं बाई)............निकोलोडिऑन व्हर्शन

अ — अभ्या.., Sat, 05/21/2016 - 11:27
पाभेअंकलची सॉरी मागून हे लिहित आहे, माफी असावी. वय पाहून दुर्लक्ष्य करावे. ............................. किती लौकर आज उजाडलं बाई स्कूलच्या होमवर्काला काळवेळ नाही काल रात्री बघत बसलो छोटा भीम एवढी नाय भारी त्याची सध्याची थीम कंटाळून शेवटी रिमोट फेकून मारला हाय.... बाबांनी टीव्ही बंद करुन उठवले बेडवर टाकून लाइट बंद केले अंधारातून तो भीम रोखूनी पाही किती लौकर आज उजाडलं बाई चौकडी चौकडी युनिफॉर्म घालून अंगा चप्प तेल लावून आईने पाडले भांगा पाठीशी लावली सॅक, वॉटरबॅग हातात टिफीन गळतोय, रंगीत आयकार्ड गळ्यात कमरी रंगीत पट्टा अन शूज पायी इतके सारे घेऊन कुठे जाउच वाटत नाही किती लौकर आज उजाडलं बाई किती सांडावं किती पुसावं गोड बिस्कीट गुपचूप कसं खावं वाटे स्कूलबसचा आज ड्रायव्हर व्हावे सगळ्यांना मागे टाकून पुढेच राहावे पोलीसमामा मागे येता सायरन वाजवावी कशी वाजते ते मात्र माहीतच न्हाई किती लौकर आज उजाडलं बाई - आभे थड्ड स्ट्न्डर्ड, जास्मिन ग्रुप लिटिल एंजल्स स्कूल. (आमच्या स्कूलमध्ये निंजा हातोडी आणि डोरेमान हायेत)

प्रतिक्रिया द्या
7582 वाचन

💬 प्रतिसाद (32)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/21/2016 - 11:30 नवीन
. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 05/21/2016 - 11:37 नवीन
कुणाला "फार छ्छान करता हो विडंबन तुम्ही, अजून येऊद्या ना" आम्हाला मात्र एक ठिपका देउन नुसते हम्म. . चालायचेच म्हणा. आम्हाला कुठे डार्लिंग म्हणता येतय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/21/2016 - 11:52 नवीन
'' खामोशिया हि बेहतर है लब्जो से लोग रुठते बहुत है '' -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बाबा योगिराज Sat, 05/21/2016 - 12:04 नवीन
म्हणजे, आज मौन व्रत हाय म्हणाच की वो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सतिश गावडे Sat, 05/21/2016 - 12:11 नवीन
'' खामोशिया हि बेहतर है लब्जो से लोग रुठते बहुत है ''
वाह... क्या बात कही डाक्टरसाहब आपने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जव्हेरगंज Sat, 05/21/2016 - 14:54 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रचेतस Sat, 05/21/2016 - 11:32 नवीन
अगागागागा. =)) ठार झालो. कथा कुणाची व्यथा कुणाला. काळजाला भिडलं. ते निकोलोडिऑन म्हणजे काय नै समज्लं.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 05/21/2016 - 12:08 नवीन
ते निकोलोडिऑन म्हणजे काय नै समज्लं.
ते लहान मुलांसाठीचं टीव्ही चॅनल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 05/21/2016 - 12:16 नवीन
ओह्ह =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चलत मुसाफिर Sun, 05/22/2016 - 08:07 नवीन
पहलाज निहालानी व्हर्शन हे नाव जास्त शोभतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
र
रमेश भिडे Sat, 05/21/2016 - 11:51 नवीन
तिसरी च्या मानानं बरं जमलंय. पालकांना घेऊन ये सोमवारी.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Sat, 05/21/2016 - 12:06 नवीन
और ये हय विडम्बन करनेकी निंजा टेक्निक. डिंग डिंग
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 05/21/2016 - 12:11 नवीन
अजून थोडं खालच्या यत्तेतलं पायजेल होतं राव! =)) "आभे" =)) __/\__ Sandy
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/21/2016 - 13:40 नवीन
अग्गाग्गा =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 05/21/2016 - 13:42 नवीन
ह्ही ह्ही ह्ही!
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 05/21/2016 - 13:46 नवीन
खरे तर लवकर किती उजाडले आहे आज हा फिल सकाळची शाळा असणार्या सर्वच लहानग्यांना येत असतोच असतो. त्याअर्थाने धिस इज द मोस्ट रिअ‍ॅलिस्टीक कविता.!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 05/21/2016 - 14:15 नवीन
:) एकदम क्यूट कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 05/21/2016 - 23:41 नवीन
विडंबन जरी नसले असते तरी चालले असते. योगेश म्हणतो तशी रिअलिस्टीक आहे. :-)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 05/22/2016 - 08:14 नवीन
कार्टुन चित्र कुssssठंsssय?
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 05/22/2016 - 20:36 नवीन
इतके सारे घेऊन कुठे जाउच वाटत नाही नेमक्या वर्मावर बोट! चांगली कविता!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/23/2016 - 04:47 नवीन
किती लौकर उजाडलं झाली घाई वावराच्या साइडला कुणी बसलच नाही! ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/23/2016 - 05:04 नवीन
वावर, त्याची साईड आणि बसणे हा आत्मबंध गुर्जींचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/23/2016 - 06:02 नवीन
ह्या बाबतीत सदर प्रति क्रीयक आमच्यापेक्षा कितीतरी अधिक जिव्हाळ्याने कायमच आमचेशी बोलत असतो. यांचे सदर विधान "मी नाही डबड्यातली, अन् जागा राखा वावरातली! ". अश्या स्व-रूपातील आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 05/23/2016 - 06:05 नवीन
हो. कारण मला अशा कविता फार फार आवडतात आणि तुमच्याइतक्या तन्मयतेने अशा प्रत्ययकारी कविता इतर कोणीच लिहू शकत नाही. तेव्हा हे वृथा सामाजिक दबावाचं जोखड धुडकावून तुम्ही अशा चार भिंतींंआडच्या काव्याला असं मोकळं वावरावर आणावं अशी तुम्हाला विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/23/2016 - 06:08 नवीन
स्व-रूपाला दुजोरा दिल्याबड्डल हार्डिक हबिनंदण्ण! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 05/23/2016 - 06:11 नवीन
चालू दया अता निरर्थक अत्मकुंथन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
च
चौकटराजा Mon, 05/23/2016 - 06:25 नवीन
गुर्ज्रीनी अत्यंत दुरलक्षित, उपेक्षित विषयाला काव्य विषय केला ते त्यांचे महत्कार्य विसरून जाता काय हो अभ्यासू ? आँ ? नुसते आम्ही फ्याण आहोत असे म्हणू नका . बुवांचा एखाद्या वावराकाठी सत्कार तरी करा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/23/2016 - 07:40 नवीन
@चालू दया अता निरर्थक अत्मकुंथन ››› तेच केलत नकळत तुम्हीही(ह्ही ह्ही! ) .. . =)) धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
वपाडाव Wed, 06/08/2016 - 13:45 नवीन
हार्डिक गुर्जी लय जोरात सुटलेत...! आवरा त्यांना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ख
खटपट्या Mon, 05/23/2016 - 05:28 नवीन
वा, अत्यंत सामाजिक शिघ्र कविथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सस्नेह Mon, 05/23/2016 - 06:15 नवीन
अच्चं झालं होय !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 06/08/2016 - 09:13 नवीन
हायला ही भारीच कविता होती बे अभ्या ! खुपच सुरेख :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा