भूतांचे प्रकार
मध्येच मी जपानी भाषा शिकायला सुरुवात केली होती. त्याला जोड म्हणून anime व चत्रपट बघणे सुरु केले,त्यातील मला नुरारीह्योन नो मागो, गेगेगे नो कितारो वगैरे मालिका व त्यातील कल्पना फार आवडल्या. त्यात जपानी लोकांनी केलेल्या भुतांच्या व अतिमानवी शक्तींच्या प्राचीन कल्पनांना आधुनिकतेची जोड देऊन विश्वास बसण्याइतपत कथालेखन केलेले आहे. त्यातले कप्पा हे त्यातल्या त्यात मला आवडलेले भूत.
जपानी भूतांचे प्रकार.
योकाई
काप्पा
ओनी
भारतीय लोकजीवनात भुते, राक्षस, हडळी यांचे उल्लेख फार काळापासून आहेत. तसे महाराष्ट्रातील भूतांचे प्रकार तुम्हाला माहित आहेत का? पुराणे, भागवत, इतर ग्रंथ यांत काही उल्लेख आहे का ? जुन्या मराठी पुस्तकांमध्ये ग्रह, आसरा, यांची नावे वाचली होती, पण त्यांच्याबद्दल काही माहित नाही किंवा चित्रे उपलब्ध नाहीत.
मला माहित असलेली भुते मी सांगतो.
कौलफोड्या = हा लोकांच्या घरांवरून रात्री धावत जातो आणि कौले फोडतो. एकाच रात्री १५, २० घरांची कौले फुटलेली दिसल्यावर याचेच नाव घेत.
पर्ह्या = हा पाण्यात असतो आणि पोहानार्याचा पाय ओढतो.
चकवा= हा जंगलात, किंवा रस्त्याने भुलवतो आणि विहिरीत , कड्यावरून खाली उडी मारायला लावतो, हा अत्तर, किंवा मांसाहारी पदार्थ यांनी आकर्षित होतो.
काप्पा
ओनी
भारतीय लोकजीवनात भुते, राक्षस, हडळी यांचे उल्लेख फार काळापासून आहेत. तसे महाराष्ट्रातील भूतांचे प्रकार तुम्हाला माहित आहेत का? पुराणे, भागवत, इतर ग्रंथ यांत काही उल्लेख आहे का ? जुन्या मराठी पुस्तकांमध्ये ग्रह, आसरा, यांची नावे वाचली होती, पण त्यांच्याबद्दल काही माहित नाही किंवा चित्रे उपलब्ध नाहीत.
मला माहित असलेली भुते मी सांगतो.
कौलफोड्या = हा लोकांच्या घरांवरून रात्री धावत जातो आणि कौले फोडतो. एकाच रात्री १५, २० घरांची कौले फुटलेली दिसल्यावर याचेच नाव घेत.
पर्ह्या = हा पाण्यात असतो आणि पोहानार्याचा पाय ओढतो.
चकवा= हा जंगलात, किंवा रस्त्याने भुलवतो आणि विहिरीत , कड्यावरून खाली उडी मारायला लावतो, हा अत्तर, किंवा मांसाहारी पदार्थ यांनी आकर्षित होतो.
💬 प्रतिसाद
(9)
आ
आनन्दा
Mon, 05/23/2016 - 15:48
नवीन
यावर मिपावरच एक धागा आला होता. कोणी शोधू शकेल का?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 05/23/2016 - 15:50
नवीन
www.misalpav.com/node/31225
www.misalpav.com/node/5654
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 05/23/2016 - 15:53
नवीन
जुना धागा
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 05/23/2016 - 15:54
नवीन
संशय पिशाच्च असे ही म्हणतात याला.
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 05/23/2016 - 16:02
नवीन
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Mon, 05/23/2016 - 16:50
नवीन
कौल फोड्या - काळ्या तोंडाची माकडे, एकाच वेळी कित्येक घरांचे कौल फोडू शकतात. लहान असताना भंडार्या नावाच्या गावात आपल्या डोळ्यांनी बघितले होत.
चकवा. या वर्षी दिल्लीत भयंकर उन्हाळा आहे. (आज संध्याकाळी प्रथमच कित्येक महिन्यानंतर पाऊस पडला १०-१५ मिनिटे). गेल्या शुक्रवारी सकाळी मेट्रोत ac चालत नव्हता. राजीव चौक वरून दुसरी मेट्रो घेताना गडबड झाली. उन्हाळा, घाम आणि गरमी. यालाच चकवा म्हणतात.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Mon, 05/23/2016 - 16:55
नवीन
मिपावर बरीच भुत आहेत..येतील एक एक धाग्यावर..
(त्रस्त समंध)जेपी
- Log in or register to post comments
स
सांरा
Mon, 05/23/2016 - 19:25
नवीन
प्रेत :- जेव्हा एखादी व्यक्तीचा हिंसात्मक मृत्यू होतो आणि त्याचा अंत्यविधी केला जात नाही तेव्हा तो जीव प्रेत बनतो . प्रेत हे खूप स्वार्थी आणि शक्तिशाली असत .
हडळ :- दिसायलाच या भयानक असतात .हिच्या अंगातून एकप्रकारचा घाणेरडा वास येतो , सडलेल्या अंड्या सारखा . अनेक वेळा ह्या कबरीतून प्रेत काढून ते मांत्रिकाला देण्याच काम करतात . मांत्रिकाला लागणारी कवटी , हाडे सुध्धा ह्या पुरवतात . हडळी ह्या माणसांचा ताबा घेतात आणि नंतर त्यांना मारतात.
शाकिन- लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मरण पावण्यार्या तसेच अपघातात मृत्युमुखी पाडणाऱ्या स्रीया शाकीन बनतात.
डाकिन- डाकिन हे हडळ व शाकीन चे मिळतेजुळते रूप आहे.ज्या स्रीयाचा हिंसात्मक मृत्यु होतो त्या स्रीया डाकिन बनतात.डाकिन या दिसायला खुप कुरूप व शक्तिशाली असतात. त्या नेहमी आपल्या हत्या बदल्यचा फिराक मध्ये असतात.
जी हिंदू स्त्री बाळंतपणात मरते व भूत होते तिला ' अलवंतीण 'असे म्हणतात ! हॉस्पिटल सारख्या ठिकाणी अलवंतीण हमखास दिसते .
' अस्रा ' सात असून त्या ब्राम्हण स्त्रियांप्रमाणे दिसतात . प्रत्येक अस्रेचा पोशाख वेगवेगळा असतो . या अस्रा ज्यांना पछाडतात ती माणसे नेहमी पाण्याकडे वळतात . मुसलमानातील ' परिस ' व हिंदूंमधील ' अस्रा ' एकच होत .
ब्रम्ह राक्षस ब्राम्हणाचा जर खून झाला तर तो ब्रम्हराक्षस होतो . गिऱ्हा पाण्यात बुडून मरणाऱ्याच्या भुताला गिऱ्हा म्हणतात. गिऱ्हा नेहमी ज्या ठिकाणी मारतो तेथेच घुटमळत असतो .
विद्वान ब्राम्हण मारून जर पिशाच्च योनीत गेला तर “ब्रम्ह्समन्ध” होतो .ब्रम्ह्समन्ध सहसा कोणाला त्रास देत नाहीत उलट लोकांची मदत करतात . ब्रम्ह्समन्ध माणसांप्रमाणेच दिसतो . त्यांना स्पर्श केला तर ते ' केळीच्या खुंट्या ' प्रमाणे थंड स्पर्श जाणवतो.
"वेताळ” हा भूत - पिशाच्चांचा राजा असून त्याचे शरीर व अवयव मनुष्याप्रमाणेच असतात . डोळे हिरव्या रंगाचे असून डोक्यावरील केस ताठ उभे असतात . तो आपल्या उजव्या हातात चाबूक व डाव्या हातात शंख धारण करतो . तो फेरीस जातो त्या वेळी संपूर्ण हिरवा पोशाख करून पालखीतून किंवा घोड्या वरून फिरतो . त्याच्या आगेमागे बरीच भूते असतात . त्यांच्या हातात जळत्या मशाली असतात व ती मोठ्या मोठ्याने आरोळी मारीत असतात
खवीस- खवीस पठाण लोकांचे भुत आहे, अफगाणिस्तान, गल्फ ई देशांत जास्त प्रमाणात असतें काही ठिकाणी यांना राक्षस म्हणून ओळखल जात . खविस नेहमी त्यांच्या कुटुंब बरोबर राहतात . खविस लग्न सुध्धा करतात आणि त्यांना मुल देखील होतात. अस म्हणतात की खाविस लोखंडाहून जास्त बळकट असतो. जो पण त्याला कुस्तीत हरवतो, खवीस त्याला आशीर्वाद देतो व ती व्यक्ती श्रीमंत बनते.
चकवा :- हा भूताचा प्रकार नसून ही एकप्रकारची भूतांची भूल देण्याची पद्धत आहे. हा जास्त करून रात्री दिला जातो . यात त्या व्यक्तीला एकप्रकारचा आभास होतो . आणि तो व्यक्ती त्या आभासाच्या पाठीपाठी जातो . आणि ती व्यक्ती इच्छित स्थळी आली की भूत त्याचा जीव घेत . अनेक वेळा चकवा बसलेली व्यक्ती रात्रभर एकाच जागेवर भटकत असते पण तिला त्याच भान राहत नाही .
मानकाप्या :- याला स्वताला मुंडक नसत . हा कधी घोड्यावर तर कधी चालत फिरत असतो . अस म्हणतात कि मानकाप्या हा लोकांची मुंडकी उडवतो . हाकाट्या .
जे लोक अपघातात मारतात ते हाकाट्या होतात . हाकाट्या हाका मारत रस्त्यावरून फिरतो, याला जर चुकून ओ दिलीत की काम तमाम. हाकाट्या निर्जन स्थळी जास्त आढळतो .
कर्णपिशाच्च भविष्यकालीन घटना सांगणाऱ्या भुताला कर्णपिशाच्च म्हणतात. कर्णपिशाच्च हा साधनेद्वारे प्राप्त करता येतो . पण एकदा का त्याला वश केल का तो आयुष्यभर मानगुटीवर बसून राहतो . साधकाचा शेवटी अत्यंत दुर्दैवी मृत्यू होतो.
हे मी मंगेश पडवळे यांच्या चेपु पोस्ट वरून उचलले आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 05/24/2016 - 05:22
नवीन
अश्या वर्णन असलेले काही आय्डी माहीत आहेत अता ते भूत आहेत का ते विचारायचे राहिले त्याकरिता "विजय पुरोहितांना" मध्यस्थी करून विचारायला सांगतो.
भितरा नाखु
- Log in or register to post comments