Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ब्रेडमुळे कॅन्सर होऊ शकतो

प
प्रणित
Tue, 05/24/2016 - 18:45
🗣 13 प्रतिसाद
ब्रेडमुळे कॅन्सर होऊ शकतो भारताच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या चौकशीनुसार ब्रेड व इतर बेकरी उत्पादनामध्ये कर्करोगकरक रसायने वापरली जात असल्याचे दिसून आले आहे. पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेटचा सढळ हस्ते वापर केला जातो या रसायनावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली या पुढे मिसळ-पाव न खाता फक्त मि़सळ खावी लागणार http://www.bbc.com/news/world-asia-india-36366141
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
4124 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ज
जेपी Tue, 05/24/2016 - 18:57 नवीन
नोबेल साठी शिफारस करावा असा लेख! (नो बल ) जेपी
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे Tue, 05/24/2016 - 19:10 नवीन
संकेत स्थळाचे नाव झुणकाभाकर/ वडाश्याम्पल/ बैदाचपाती वगैरे काही ठेवायचा प्रस्ताव ठेवताय काय? नुसती मिसळ ठेवून उपयोगाची नाही. 'ती' मिसळ च्या जोडीला 'तो' पाव हवा च!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Wed, 05/25/2016 - 04:54 नवीन
चपाती, भाकरी, आंबोळी, पुरी, घावन इ. पर्यायांचाही विचार व्हावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे
फ
फुंटी Tue, 05/24/2016 - 19:53 नवीन
पातांजली चा ब्रेड येतोय बहुतेक...
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 05/24/2016 - 20:13 नवीन
हानिकारक रसायने असली किंवा नसली तरी मुळात ब्रेडच अत्यंत हानिकारक असतो. अगदी कॅन्सर होत असेल तरच एकादा पदार्थ हानिकारक, असे नसून मलावरोध, आतड्यांमधे घाण साठत जाणे, असे अनेक रोगांचे मूळ असणारे त्रास ब्रेड (व मैद्याचे अन्य पदार्थ-)मुळे होत असतात.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 05/24/2016 - 20:44 नवीन
आपल्या रोजच्या वापरातले बरेचसे पदार्थ कार्सिओजेनिक आहेत ,फक्त ब्रेडलाच का दोष द्यायचा ,पण तरीही बेकरी प्रॉडक्ट्स टाळावेत.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 05/24/2016 - 20:46 नवीन
जॉन्सन अँड जॉन्सन ची पावडर वापरल्यामुळे ओवरीज चा कॅन्सर होतो हे ऐकले होते. खालील लिंकवर अधिक माहीती.. https://www.drugwatch.com/talcum-powder/lawsuits/ बाकी ब्रेड खाल्ल्यामुळे कॅन्सर होत असता तर मी आतापर्यंत मरायला पाहीजे होतो...
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 05/25/2016 - 03:13 नवीन
सिगारेट मुळे कर्करोग होतो पण प्रत्येक सिगारेट पिणार्याला कर्करोग होतोच असे नाही. बाकी ब्रेड/पाव नसेल तर ब्याचलर लोकांचे किती हाल होतील ? पहिले मॕगी आता ब्रेड स्वयंपाक शिकावा लागेल बहुतेक :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
न
नाईकांचा बहिर्जी Wed, 05/25/2016 - 04:05 नवीन
पोटैशियम ब्रोमेट बॅन करण्याबद्दल सरकार ने पावले उचलली आहेत आता पुढे बघायचे काय काय होते. त्वरीत एक्शनचा विचार केल्या बद्दल FSSAI अन केंद्र सरकारचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 05/25/2016 - 06:33 नवीन
एका वार्ताहराने काल, आयोडेट स्पेलिंग मधल्या 'I' "L" समजून पोटॅशियम लोडेट असं लिहिलं होतं! पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेटचा सढळ हस्ते वापर केला जातो हे वाक्य गैरसमज वाढवणारे आहे. ही रसायने प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरली जातात आणि ती % मधे न वापरता पार्टस पर मिलियन इतक्या कमी मात्रेत वापरतात. जास्त वापरली तर बेकरीवाल्यांनाच परवडणार नाही. माझी स्वतःची बेकरी नाही.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 05/25/2016 - 07:00 नवीन
ही रसायने प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरली जातात
प्रिझर्व्हेटिव्ह नव्हे, पावाला अधिक फुगिरता व एकसमानता येण्यासाठी वापरले जाते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 05/25/2016 - 07:32 नवीन
हि रसायने प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरली जात नाहीत तर ऑक्सिडायझिंग एजंटस म्हणून वापरली जातात. ब्रोमेट किंवा आयोडेट जेंव्हा तापवले जातात तेंव्हा त्यातून ऑक्सिजन वायुरूपात बाहेर पडतो आणि त्यामुळे पाव फुगून येतो. हि रसायने पाव पूर्ण भाजला गेला तर विघटन पावून ब्रोमाईड किंवा आयोडाइड या स्वरुपात राहतात याचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही पण पाव नीट भाजला गेला नाही तर हीच रसायने ब्रोमेट/ आयोडेट स्वरुपात पावात शिल्लक राहतात आणि ती आपल्या सेवनात आल्यामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. हि रसायने भारतात आणि अमेरिकेत वापरणे अजून हि कायदेशीर आहे. युरोपात किंवा इतर काही देशात यांच्या वापरावर बंदी आहे. आता सरकार या रसायनांच्या वापरावर बंदी आणण्याच्या विचारात आहे.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 05/25/2016 - 08:08 नवीन
अचूक माहितीबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा