विवाह जुळवताना पत्रिकेला किती महत्व देता?
कुणाच्याही आयुष्यात विवाह ही मोठी घटना असते. एखादे स्थळ आल्यावर हा निर्णय घेताना ती व्यक्ती व कुटुंब अनेक बाबी विचारात घेते. त्यापैकी पत्रिका जुळणे हा एक मुद्दा असतो. आपण स्वत:च्या किंवा मुलामुलीच्या नातेवाईकांच्या लग्नात पत्रिकेला किती महत्व देतो हे जाणुन घेणे हा उद्देश या कौलाचा आहे.पोल ची सुविधा इथे आता अस्तित्वात नाही. पण खालील पर्याय निवडू शकता
१) पत्रिका पहायचीच आहे
२) आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही
३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे.
४) आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे.
💬 प्रतिसाद
(51)
श
शाम भागवत
Tue, 05/31/2016 - 06:46
नवीन
@mandarbsnl
अशी माणस भेटण दुर्मीळ झालेय. बर ती माणसे स्वतःची जाहिरातही करत नाहीत. त्यांचे नाव त्यांना न विचारता कोणाला सुचवले तर त्यांना ते आवडतही नाही. शिवाय अशा माणसांमुळे आपल्याला जे अनुभव येतात त्यामुळे आपला जरी ज्योतिष शास्त्रावर विश्वास बसला तरी ते चारचौघात बोलूनही दाखवता येत नाही. अन्यथा आपली टिंगल ठरलेलीच. असो.
पण जर असा माणूस भेटला व फलज्योतिषा बरोबरच त्याचा ज्योतिषशास्त्रातील अध्यात्मिक संकल्पनाचाही अभ्यास असेल तर मात्र येणार्या अडचणींसाठी सातत्याने मार्गदर्शन घेण्याऐवजी त्याच्याकडून कायमस्वरूपाची उपासना घेणे ईष्ट असे आपले मला वाटते. अशी अधिकारी माणसे ज्योतिषशास्त्राच्या द्वारे मार्गदर्शन करताना ज्योतिषशास्त्रातील एक महत्वाचा नियम पाळतात. तो म्हणजे
"काय करायचे ते सांगायचे. का ते सांगायचे नाही."
हे मात्र पटलेले नाही. अजिबात नाही म्हणणारे मी पाहिलेले आहेत. इतकेच काय इतरांकडचे जेवण किंवा पेढे बर्फी कोणी आणले तर लागलीच तिथल्या तिथे वाटून टाकतात पण स्वतः काही घेत नाहीत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2