Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चान्गल्या इन्टरनॅशनल स्कूल सुचवा

च
चिंटु
Wed, 05/25/2016 - 14:06
🗣 80 प्रतिसाद
नमस्कार मिपाकरान्नो. मदत हवी आहे शाळा शोधायला. आधी दोन चार वाक्यात बॅक्ग्राउण्ड सान्गतो आणि मग पुढच बोलतो. माझा मित्र आता कायमचा राहण्यासाठी पुण्यात येतो आहे.मित्र म्हणजे तसा माझ्याहून वयाने बराच मोठा आहे. तो त्याच्या कंपनीत बर्‍याच वरिष्ठपदावर आहे. प्रेसिडेण्ट वगैरे आहे. वहिनीही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बारावीनन्तर माझा मित्र पुण्याबाहेरच होता. नंतर बाहेरच इन्जिनिअरिन्ग केलं. एम बी ए अत्यन्त नामान्कित ठिकाणाहून.बाहेरच लग्नही केलं नि तिकडेच त्याला पुत्ररत्नही प्राप्त झालं.आता त्याला पुण्यात हवी तशी ऑफर मिळालेली आहे. तो येणार आहे. त्याचे चिरन्जीव तिसरीत आहेत. पोरासाठी चान्गल्या शाळान्च्या शोधात तो आहे. सी बी एस इ बोर्डाच्या शाळा तो शोधतो आहे. त्याच्या अपेक्षान्च्या बर्‍याच जवळ नान्देड सिटीजवळील पवार इन्टरनॅशनल स्कूल जाते, चान्दणी चौकाजवळची सन्स्क्रुती इन्टरनॅशनल स्कूलही जाते. पण तो अजूनही पर्याय बघून काय ते नक्की करु इच्छितो. माझा अनुभव आणि आवाका अभिनव, ज्ञानप्रबोधिनी, सेवा सदन , नूमवि इतपतच मर्यादित आहे. पण त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून म्हटलं मिपाकरान्ना विचारावं काय ते. तुम्ही काही सुचवू शकाल तर फार बर होइल मित्रान्नो.वरील शाळांच्या लायनीतल्या इतर शाळा सुचवल्यात तर बर होइल. फीस ही तशी त्याला फार मोठी अडचण वाटत नाही. तुम्ही इथे जे सुचवाल त्याबद्दल जर एखाद दोन ओळी , का चान्गला वाटतोय तो पर्याय ह्याबद्दलही लिहाव अशी विनन्ती करतो. अर्थात का चान्गली वाटते शाळा ह्याबद्दल नाही लिहिलत तरीपण चालेल. समजा इतर कुणी काही सुचवलेल्या पर्यायविषयी तुमचं मत चान्गल नाही आहे , किंवा काही तत्सम सांगायच आहे, तर व्यनिचा पर्याय निवडलेला उत्तम. नाव घेउन सान्गायचे असल्याने जाहिर सान्गताना चान्गल्या बाबी सान्गाव्यात.
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
19499 वाचन

💬 प्रतिसाद (80)
य
यशोधरा Wed, 05/25/2016 - 14:22 नवीन
इंटरनॅशनल का?
  • Log in or register to post comments
च
चिंटु Wed, 05/25/2016 - 14:36 नवीन
हो. इंटरनॅशनल. कोपी पेस्ट केल इंटरनॅशनल शब्द. मला टायपिन्ग येत एकदम चान्गल पण वेळ लागतो. म्हणून लवकर लिहिले चौकशीचे जसे येइल तसे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चांदणे संदीप Wed, 05/25/2016 - 14:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
च
चिंटु Wed, 05/25/2016 - 14:41 नवीन
आनि तुम्ही हसत का आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Wed, 05/25/2016 - 14:42 नवीन
आंतरराष्ट्रीय शाळाच का हवी आहे असा प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
य
यशोधरा Wed, 05/25/2016 - 14:39 नवीन
आंतरराष्ट्रीय शाळाच का हवी आहे असा प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
च
चिंटु Wed, 05/25/2016 - 14:41 नवीन
आहो ते नक्की मी नाही सान्गू शकनार. तुम्हाला चान्गल्या ठाउक असतील तर सुचवा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 05/25/2016 - 14:44 नवीन
नाही हो, मी तर साध्या शाळेत शिकले, मराठी माध्यमातून. तुम्ही वाट बघा कोणीतरी सांगेल इथे म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
च
चिंटु Wed, 05/25/2016 - 14:46 नवीन
आहो मी पण मराठी शाळावाला आहे. म्हणून तर विचाराव लागत अहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चिंटु Wed, 05/25/2016 - 14:45 नवीन
अरे गम्मत नन्तर करा ना.पुरेशी माहिती मिळाल्यानन्तर गम्मत-ओन्ली धागा केला तरी चालेल. सध्या मदत करा ना जमत असेल तर.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/25/2016 - 14:48 नवीन
चिंटुभाऊ, आंतरराष्ट्रीय शाळा खरेच नाही ठाऊक. चांगल्या शाळा म्हणून हल्ली मुक्तांगण, प्रबोधिनी वगैरे हीच नावे ऐकली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
च
चिंटु Wed, 05/25/2016 - 14:50 नवीन
प्रबोधिनी वगैरे तर पहिल्यापासूनच चांगल्या आहे. थेंक्यू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
आ
आदूबाळ Wed, 05/25/2016 - 15:00 नवीन
walnutschool.org/
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 05/25/2016 - 15:03 नवीन
वाबळेवाडीची झेडपी शाळा बेस्ट आहे आणि तिथे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेल्या शैक्षणिक संकल्पना राबवल्या जातात. आंतरराष्ट्रीय शाळा नुसत्या नावाला असतात.
  • Log in or register to post comments
च
चिंटु Wed, 05/25/2016 - 15:15 नवीन
पण मित्राने स्पेसिफिकली सान्गितले आहे इन्टरनॅशनल स्कूल हवे म्हणून. झेड पी शाळा उतम असू शकते हे मला पटते.आपल्या राज्यातच वेगवेगळ्या ठिकाणी ह्या शाळा आहेत. मी तर त्याला अक्षर नन्दन वगैरे सारख्या किंवा परयायी शाळा असतात ना थोड्या वेगळ्या त्यापण सुचवल्यात पण सध्या त्याने कॅटेगरी पक्की केली आहे सी बी एस इ शाळा जॉइन करायची म्हणून.तर त्याच्या ठरवलेल्या कॅटेगरी नुसार काही शोधता येत आहे का ते बघतो आहे. आपण त्याला कस म्हणणार पुन्हा की एकूणातच तुझी कॅटेगरी बदल म्हणून. त्याचीही काही कारणे असतील ना. तो स्वतः गावातल्या शाळेतून शिकलेला आहे लहान असताना. झेड पी भारी असू शकतेपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
य
यशोधरा Wed, 05/25/2016 - 15:17 नवीन
तुमच्या मित्राला इंनॅ शाळांमधूनच सीबीएससी अभ्यासक्रम असतो हे कोणी सांगितले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
च
चिगो गुरुवार, 05/26/2016 - 12:18 नवीन
खर्‍या अर्थाने 'इंटरनॅशनल' असलेल्या शाळांमधे 'सीबीएसई'चा अभ्यासक्रम नसतो.. 'आयबी'चा असतो. काही शाळा 'आयसीएसई;चा अभ्यासक्रम शिकवून स्वतःच्या नावामागे 'इंटरनॅशनल' लावतात. तेव्हा तुमच्या मित्राला नेमका सीबीएसई, आयसीएसई की आयबीचा अभ्यासक्रम हवाय, ते विचारा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 05/25/2016 - 15:19 नवीन
पुण्यातील सीबीएससी शाळा. ह्या दुव्यावर सीबीएससी शाळा मिळतील.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 05/25/2016 - 15:30 नवीन
मर्सिडीज बेन्झ इंटरन्याशनल स्कूल, हिंजवडी. आमच्या हापिसच्या समोरच आहे अगदी. मुले खेळताना दिसतात बरेचदा. दाबून फी आहे. वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये. हॉस्टेलवर ठेवलं तिथेच तर अजून तीनेक लाख वाढतील. अभ्यासक्रमही सीबीएसई नै तर फ़ुल्टू इंटरन्याशनल. तुमच्या मित्राला नक्की आवडेल बघा. एकदम नामांकित.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/25/2016 - 15:49 नवीन
म्हणजे १० वर्षांत किमान दीड कोटी रुपये झाले. मग तेच बँकेत ठेवले तर १० वर्षांनी घरबसल्या दरमहा १ लाख रुपये मिळतील... असो, देवाच्या, देहाच्या, मद्याच्या बाजारा नंतर शिक्षणाचा बाजारच म्हणा की हो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
र
रेवती Wed, 05/25/2016 - 20:58 नवीन
बापरे! काय फी म्हणायची का सोंग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु गुरुवार, 05/26/2016 - 06:01 नवीन
आलाना न शिकल्याचा (आर्थीक)फायदा!!! मुवी फेम बाबांच्या आंतर्राष्ट्रीय प्रवचनांचा नितवाचक नाखु (जिल्हा परिषदवाला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/26/2016 - 06:43 नवीन
ज्याला शिकायची (ज्ञान मिळवायची) इच्छा आहे, तो शिकतोच. असो, आडातच नसेल तर पोहर्‍यात येत नाही आणि बापाच्या न्यूनगंडांचा मुलांना त्रासच जास्त होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
संदीप डांगे Mon, 06/13/2016 - 17:45 नवीन
बापाच्या न्यूनगंडांचा मुलांना त्रासच जास्त होतो जबरदस्त वाक्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
शंतनु _०३१ Mon, 06/13/2016 - 14:52 नवीन
शाळेची फी किती वर्षांची फी आहे ही
वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये. हॉस्टेलवर ठेवलं तिथेच तर अजून तीनेक लाख वाढतील.
कैच्या काही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Wed, 05/25/2016 - 16:06 नवीन
symbiosis international school,Mercedes Benz international school,d y patil international school हे इंटरनॅशनल स्कूल आहेत आहेत त्यांचा विचार करावा ,पैसे असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Wed, 05/25/2016 - 20:57 नवीन
इंटरनॅशनल शाळा = सीबीएसी हे समीकरण काही कळाले नाही बुवा. प्रबोधिनीची प्रवेश परीक्षा जानेवारीत असते तेव्हा ते ध्यानात ठेवा - शाळेच्या वेबसाईटवर माहिती मिळेलच. बाकी, शाळा सिलेक्षन क्रायटेरीया ज्याचा त्याचा वेगळा असू शकतो.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 05/26/2016 - 06:58 नवीन
ईट स्कुल आणी साधी स्कुल ह्यात काय फरक अस्तो? कुणी सान्गेल का?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 05/26/2016 - 09:02 नवीन
ईट स्कुल म्हणजे विटा वापरुन बांधलेले स्कुल (कोबा किंवा शहाबादी फरशी), साधी स्कुल म्हन्जे मातीच्या भिंती असलेले स्कुल त्यात खाली शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसावे लागते( पावसाळ्यात गोणपाट टाकुन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
र
रघुनाथ.केरकर Fri, 05/27/2016 - 08:21 नवीन
स्कुल ह्यात नेमका काय फ़रक असतो.. माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलासाठी बदलापुर ला मी गुरुकुल ईन्टरन्याशनल मध्ये प्रवेश घेतलाय. त्याना देखील विचारलय, पण नेमका उत्तर मीळत नाही. दगड वीटा आणी बांधकामाशीवाय काही वेगळा फ़रक असल्यास शेअर करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
र
रघुनाथ.केरकर Fri, 05/27/2016 - 08:22 नवीन
ईंटरन्याशनल स्कुल आणी बीगर ईंटरन्याशनल स्कुल ह्यात नेमका काय फ़रक असतो.. माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलासाठी बदलापुर ला मी गुरुकुल ईन्टरन्याशनल मध्ये प्रवेश घेतलाय. त्याना देखील विचारलय, पण नेमका उत्तर मीळत नाही. दगड वीटा आणी बांधकामाशीवाय काही वेगळा फ़रक असल्यास शेअर करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
इ
इरसाल Fri, 05/27/2016 - 10:13 नवीन
एक लिंक देत आहे त्यावर जवळपास सगळ्या शाळांमधला फरक काय आहे त्याचे फायदे तोटे यावर नीट भाष्य केलय. (लिंकमधला मजकुर इंग्रजीत आहे). http://blog.schoolfinder.co.in/2014/02/difference-between-cbse-icse-igcse-ib.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/26/2016 - 07:24 नवीन
थोडक्यात ह्या पण धाग्याचं तर्राट जोकराच्या १२०० स्क्वायर फुट झोपडी सारखं होणार तर! असो!
  • Log in or register to post comments
स
सुचिकांत गुरुवार, 05/26/2016 - 07:51 नवीन
आंतरराष्ट्रीय शाळा हवी असेल तर आयबी बोर्ड बघा. सीबीएसई कशाला? बाकी मराठी माध्यमात पण दाबून फी घेणाऱ्या शाळा आहेत, पण इंग्रजी शाळांची बरोबरी फीच्या बाबतीत नाही. कधी मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे जाणून घ्यायची इच्छा झाली तुमच्या मित्राला तर, majhishala.majhibhasha@gmail.com ला मेल पाठवायला सांगा. चर्चा करता येईल. - सुचिकांत ९०५२३४४४७६
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/26/2016 - 08:13 नवीन
माझा मुलगा नर्सरीला ट्री हाऊस मध्ये गेला होता. आता आम्हीच शिफ्ट होत आहोत म्हणुन शाळा सोडली ती. पण शाळा बर्‍यापैकी आहे. तरीही चार गोष्टी सांगुन ठेवते. १. माझी अशी अपेक्षा होती की ICSE म्हणजे "घोका आणि ओका" न करता कन्सेप्ट समजावुन सांगण्यावर भर असेल. तसे काही नसते, सगळ्याच शाळा शेवटी सिलॅबस संपवायच्या मागे असतात. २. सिलॅबस जरी भारी असला तरी शिकवणारे हे सर्वसाधारण लोकच असतात. खाजगी शाळांमध्ये शिक्षक काय निकषांवर घेतले जातात हे ठाऊक नाही. पण सरकारी शाळांप्रमाणे ते खुप अनुभवी असत नाहीत असे माझे निरीक्षण आहे. ३. जे लोक स्वतःच साधारण अभ्यासक्रम शिकले ते लोक आपल्या मुलाला काही तरी भन्नाट पद्धतीने शिकवतील हे शक्य नाही. तेव्हा शेवटी परत गाडी परीक्षेसाठी अभ्यास ह्याच रुळावर येते. ४. जवळपास सर्वच शाळांमध्ये अमुक एक ब्रॅण्डचेच खडू द्या, तमुक माणसाकडुनच गणवेष घ्या, आम्हीच वह्या-पुस्तके देणार, प्लास्टिक कव्हरच हवे असे असते. तिथुनच त्यांना पुष्कळ पैसा मिळतो. मला ह्या गोष्टीची मनस्वी चीड आहे. त्यामुळे मी परत येऊन अशा शाळेत मुलाला घालणार नाही. पण कुणाकुणाला त्यात फार मोठा इश्यु वाटत नाही. ट्री हाऊसचा टोटल खर्च आमच्या आवाक्यात होता. (नर्सरी/.केजी:- ट्युशन फीस - ३७०००/-, त्यात पुस्तके आणि शुज मिळाले, गणवेश्+बारिक सारिक स्टेशनरी - ५-७ हजार असेल, बस - ११ हजार ) ५. बस सेवा उत्तम दर्जाची आहे. आत कॅमेरे असल्याने मी ऑफिसातुन मुलाला पाहु शकत होते. ६. इतर उपक्रमही चांगले होतात. त्यातुन थोडे फार पैसे मागतात जसे की फोटो इ चे. पण ते किरकोळ आहेत. ७. पुढे जाउन स्पर्धा परीक्षा कंपल्सरी करतात म्हणे. मला ते आवडले नाही. ज्याला ज्याची आवड आहे ते करु द्यावे. ८. कँटिनची सोय आहे. त्यांनी ती सुद्धा कंपल्सरी करायचा प्रयत्न केला (प्रिस्कुलला). मी तरी जुमानलं नाही. "दमडीही भरणार नाही. मी माझ्या मुलाला डबाच देणार." असं सांगुन आले. ओके म्हणाले. ९. ओव्हरऑल फार चिकित्सक स्वभाव नसेल तर ही शाळा चांगली आहे. वेबसाईट्वर अभ्यासक्रमा विषयी माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/26/2016 - 08:17 नवीन
माझा भाचा गोखले नगरच्या साईडला जी परांजपे शाळा (भारती विद्याभवन) आहे, तिथे आहे. वहिनीचा अनुभव उत्तम आहे. पण ती शाळा एस.एस.सी बोर्ड आहे. एक शाखा शिवाजी पुतळ्यापाशी सुद्धा आहे. चौकशी करु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
के.के. गुरुवार, 05/26/2016 - 11:47 नवीन
अवांतर: ट्री हाऊस BSE आणि NSE वर लिस्टेड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/26/2016 - 12:01 नवीन
हो.. आणि तॉ आशियातली दुसर्‍या क्रमांकाची स्कुल चेन आहे असं ते १०० वेळा सांगतात. पण साध्या अ‍ॅडमिशन आणि फिस च्या पोलीसिज क्लिअर नाहित की कुठे डॉक्युमेन्टेड नाहीत. आधी संगीता रावजी होत्या मुख्यध्यापक तेव्हा चांगलं होतं जरा. आता ज्या आहेत त्यांच्यात फार निर्णयक्षमता नाही असे माझे मत आहे. मला माझ्या कामासाठी अखेर रावजींकडेच जावे लागले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: के.के.
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/26/2016 - 08:24 नवीन
दिल्लीत गल्लोगल्ली इंटर नेशनल शाळा आहेतच. शाळेत ac बस ac भरपूर पैसा घेणार्या. बाकी पैसा खर्च करायचा असेल तर देहरादून येथे बर्याच शाळा आहेत. आपल्या मुलाला शाळेंत घाला. काळा आंग्ल माणूस तैयार होऊन बाहेर पडेल. बाकी खरोखरच चांगले शिक्षण आणि स्वस्थ माणूस तैयार पाहिजे असेल तर पतंजलीचे हरिद्वारला आचार्यकुलं आहे. पण तिथे अडमिशन घेणे दुष्कर कार्य आहे.
  • Log in or register to post comments
च
चिंटु गुरुवार, 05/26/2016 - 09:33 नवीन
सगळ्यान्ना थेन्क्यू. ती हिंजवडीमधली प्रचेतस रावान्ची मर्सिडिज शाळा सप्त तारान्कित का काहीतरी म्हणता यावी अशी आहे. माझ्या मित्राला त्रितारान्कित पुरेशी आहे म्हणाला. त्यावरुन बजेटचा अन्दाज यावा. मिसळपाववरती चवकशी करण्याचे एक मुख्य कारण म्हणजे प्रत्यक्ष कुणाचा कोणकोणत्या शाळेचा अनुभव कसा आहे हे समजून घ्यावयाचा आहे. म्हणजे साधारणतः पिलियन रायडर काकूंनी जसा नेमका फीडबॅक दिला तशा पद्धतीची माहिती, अनुभव ऐकण्यास आवडेल. इथे दिलेल्या वेबसाइट्स खरोखर कामाच्या आहेतच. त्याहीबद्दल थँक्यू. आणि अजून एक म्हणजे त्याला रेन्टवरती फ्लॅटही हवा आहे. त्यासाठी चान्गल्या सोसायटी तो शोधत आहे. त्याचे ओफिस कर्वेनगर कर्वे रोड वगैरे परिसरात असणार आहे म्हणाला. त्याचे प्राधान्य असे आहे -- १.सोसायटी गेटेड हवी. स्टेन्ड अलोन बिल्डिन्ग नको. २.लहान मोठ्या अ‍ॅमेनिटीज असलेल्या चान्गल्या. म्हणजे स्विमिन्ग पूल जिम्नेशियम वगैरे. २.पब्लिक ट्रान्सपोर्ट जवळपास असावा असा आग्रह नाही. स्वतःची गाडी आहे. ३.फ्लॅटचा,सोसायटीचा प्लान चांगला हवा.हवेशीर , प्रशस्त,पुरेसा सूर्य प्रकाश असणारे हवे. ४.आसपास थोडी शांतता असलेले जास्त चांगले. गोंगाट नको. म्हणजे अगदिच रस्त्यावरचे नको. ५.ऑफिसपासून दहा पंधरा किलोमीटर पर्यंत अंतर असलेले चालेल म्हणाला. ६.पाण्याचा प्रोब्लेम नसायला हवा. फार मागे कोथ्रुड डेपो परिसरात होता म्हणतात किनारा होटेलच्या पलिकडच्या बाजूला.झालच तर खराडी विमाननगर परिसरात पण काही चान्गल्या सोसायटीत पण पाण्याचा प्रोब्लेम होता सुरुवातीला.तर तसे होयला नको आहे. त्याच्या अपेक्षा ऐकून डोळ्यासमोर वारजे नाक्याजवलच्या आदित्य गार्डन सिटीचेच नाव आले.तर अशा सोसायटी सुचवू शकाल का. कोथरुड कर्वेनगर पौड रोड वनाज ते वारजे नाका किन्वा अगदि एस बी रोड , मॉडेल कॉलोनी,आयडीयल कॉलोनी ह्या दरम्यानच्या पट्ट्यात त्याला मिळाल्यास उत्तम, असे मला वाटत आहे. पण तिकडे अशा सोसायटी आहेत का. माझे जे थोडेफार फिरणे झाले आहे त्याप्रमाणे अशा सोसायटी वाकड पिम्पळे सवदागर भागात जास्ती दिसल्या आहेत.पण वाकड पिम्पळे सवदागर शक्यतो नको आहे. बाणेर त्यातल्या त्यात चालेल. मॅजिक ब्रिक्स डोट कोम वगैरेवरती जाउन पाहणे होणारच आहे. पण इथे तुम्ही लोक स्वतःच्या अनुभवातून आणि पाहण्यातून सान्गू शकताल तर ते जास्ती कामाचे वाटते. तुम्ही स्वतः रहात असलेली जागा किन्वा जिथे तुमचे येणे जाणे झाले आहे होत असते अशा जागा हव्या आहे. सिन्हगड रोडवरती सन सिटी आहे म्हणतात. ती कशी आहे कुणी सान्गेल का.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/26/2016 - 09:57 नवीन
मित्राला म्हणावे, शहर बदला नाहीतर स्वतःला बदला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
स
स्मिता श्रीपाद गुरुवार, 05/26/2016 - 10:16 नवीन
मित्राला म्हणावे, शहर बदला नाहीतर स्वतःला बदला. >>> हा सल्ला सगळ्यात भारी होता.... पिलियन रायडर काकूं >> कॉलींग पिरा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/26/2016 - 10:26 नवीन
अगं मी पन्नाशीला आले आता.. कधी तरी काकू म्हणणं चालवुन घ्यावं लागणारच की गं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता श्रीपाद
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/26/2016 - 10:07 नवीन
लोकांच्या लग्न करतानाही एवढ्या अपेक्षा नसतात हो!! बाकी मित्रासाठी बराच वेळ आहे तुमच्याकडे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
र
रमेश भिडे गुरुवार, 05/26/2016 - 10:35 नवीन
मीच माझा मित्र असं काही असावं साहेबांचं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/26/2016 - 10:36 नवीन
प्रतिसादांचं डिटेलिंग पाहुन वाटतय तरी तसं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे
अ
अभ्या.. गुरुवार, 05/26/2016 - 10:10 नवीन
कामवाली, धुणेभांडी, कुक, डरायव्हर पण हवा असेल तर सांगा की. ऐरपोर्ट वरून आणायला माणूस वगैरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
न
नाखु गुरुवार, 05/26/2016 - 12:21 नवीन
त्ये त्यांच्या कुटुंबासकट पेईंग गेष्ट म्हणून ठेवणारे यजमान शोधणार आहेत तोवर थोडी कळ काढा. त्या बद्दलच्या (यजमानांनीच पाळायच्या) अटी आणि शर्तींवरून शेवटचा हात फिरवायचे काम चालू आहे. "सल्ला आहे का उधारी , संपतच नाही" या लेखातून साभार :पुस्तक मिपा संपादीत :"मिपाची मानगुट आणि वेताळ" संदर्भी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आदूबाळ गुरुवार, 05/26/2016 - 14:58 नवीन
अ‍ॅक्च्युअली यांनी सर्व्हिस अपार्टमेंटमध्येच राहायची आयड्या वाईट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
श
शंतनु _०३१ Mon, 06/13/2016 - 14:59 नवीन
हेहेहेहेहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
  • 1
  • 2
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा