Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चान्गल्या इन्टरनॅशनल स्कूल सुचवा

च
चिंटु
Wed, 05/25/2016 - 14:06
🗣 80 प्रतिसाद
नमस्कार मिपाकरान्नो. मदत हवी आहे शाळा शोधायला. आधी दोन चार वाक्यात बॅक्ग्राउण्ड सान्गतो आणि मग पुढच बोलतो. माझा मित्र आता कायमचा राहण्यासाठी पुण्यात येतो आहे.मित्र म्हणजे तसा माझ्याहून वयाने बराच मोठा आहे. तो त्याच्या कंपनीत बर्‍याच वरिष्ठपदावर आहे. प्रेसिडेण्ट वगैरे आहे. वहिनीही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बारावीनन्तर माझा मित्र पुण्याबाहेरच होता. नंतर बाहेरच इन्जिनिअरिन्ग केलं. एम बी ए अत्यन्त नामान्कित ठिकाणाहून.बाहेरच लग्नही केलं नि तिकडेच त्याला पुत्ररत्नही प्राप्त झालं.आता त्याला पुण्यात हवी तशी ऑफर मिळालेली आहे. तो येणार आहे. त्याचे चिरन्जीव तिसरीत आहेत. पोरासाठी चान्गल्या शाळान्च्या शोधात तो आहे. सी बी एस इ बोर्डाच्या शाळा तो शोधतो आहे. त्याच्या अपेक्षान्च्या बर्‍याच जवळ नान्देड सिटीजवळील पवार इन्टरनॅशनल स्कूल जाते, चान्दणी चौकाजवळची सन्स्क्रुती इन्टरनॅशनल स्कूलही जाते. पण तो अजूनही पर्याय बघून काय ते नक्की करु इच्छितो. माझा अनुभव आणि आवाका अभिनव, ज्ञानप्रबोधिनी, सेवा सदन , नूमवि इतपतच मर्यादित आहे. पण त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून म्हटलं मिपाकरान्ना विचारावं काय ते. तुम्ही काही सुचवू शकाल तर फार बर होइल मित्रान्नो.वरील शाळांच्या लायनीतल्या इतर शाळा सुचवल्यात तर बर होइल. फीस ही तशी त्याला फार मोठी अडचण वाटत नाही. तुम्ही इथे जे सुचवाल त्याबद्दल जर एखाद दोन ओळी , का चान्गला वाटतोय तो पर्याय ह्याबद्दलही लिहाव अशी विनन्ती करतो. अर्थात का चान्गली वाटते शाळा ह्याबद्दल नाही लिहिलत तरीपण चालेल. समजा इतर कुणी काही सुचवलेल्या पर्यायविषयी तुमचं मत चान्गल नाही आहे , किंवा काही तत्सम सांगायच आहे, तर व्यनिचा पर्याय निवडलेला उत्तम. नाव घेउन सान्गायचे असल्याने जाहिर सान्गताना चान्गल्या बाबी सान्गाव्यात.
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
19499 वाचन

💬 प्रतिसाद (80)
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/26/2016 - 18:36 नवीन
@ चिंटू पिलियन रायडर काकूंनी... "तुमचं नाव 'चिंटू' आहे इकडे लक्ष देऊन पिरांनी तुम्हाला माफी करावी" अशी देवाची प्रार्थना करा ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
इ
इरसाल गुरुवार, 05/26/2016 - 09:49 नवीन
या धाग्यावर चिंटुने पहिली ठिणगी टाकली आहे.....पिलीयन रायडर काकु म्हणुन.......भोआकफ ;)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/26/2016 - 10:06 नवीन
काकु तर काकु.. आजी म्हणा.. काय फरक पडतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
इ
इरसाल गुरुवार, 05/26/2016 - 11:33 नवीन
असं कसं असं कसं, आम्ही पिराच म्हणणार नं ?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सतिश पाटील गुरुवार, 05/26/2016 - 10:44 नवीन
आणखीन काय काय पाहिजे तुमच्या मित्राला? चांगला भाजीवाला, चांगला इस्त्रीवाला,??घराजवळ पेट्रोलपंप,न झोपणारा वाचमान, चांगले शेजारी,
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 05/26/2016 - 14:26 नवीन
घराजवळ पेट्रोलपंप ???
वाचुन वारल्या गेले आहे...???
चांगले शेजारी
ऐवजी चंगली शेजारीण चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
च
चिंटु गुरुवार, 05/26/2016 - 11:02 नवीन
आहो मी काही पैशेवाला नाहीये. माझा मित्र त्याच्या मुलाची दर महिना जितकी फी भरतो तितका अजून इ एम आय पण भरु शकलो नाही आहे मी. आणि स्वतासाठी विचारायला आवडल असत मला. तुमचे इथले प्रतिसाद मी शुभेच्छा म्हणून स्वीकारतो की आज नसलो तरी उद्या पैशेवाला होइन म्हणून. आमचा जुना परिचय आहे; आणि विशेष कौटुन्बिक समन्ध आहे म्हणून त्याच्यासाठी विचारतो आहे. फार दिवसात भेट नसली तरी आमची दोस्ती चांगली आहे. आणि आता त्याचा इथे गावाशी टच राहिला नाही तर मदत करणे माझे काम आहे. त्याने पण आम्हला गरज असताना मदत केलेली आहे. इथे कोणी पण मधूनच प्रश्न करत राहतात. आणि प्रश्न पण सरळ अर्थाचे नसतात. किंवा "शहर बदला" वगैरे सल्ले देतात. मी ह्याआसाइटवरती नेहमी येत जात राहिलो असतो तरी असच केल असत का. मला कोणी काही विचारल आणि मला जमत असेल तर मी मदत करतो ; आणि करता येत नसेल तर निदान टवाळी करायला जात नाही. कोणता माणूस कोणत्या परिस्थितीत आहे आपल्याला माहित आसते का. आसे करणे मग बरोबर आहे का. आणि पिलियन रायडरजी मी तुम्हाला मुदाम नाही म्हणालो काकू वगैरे. आता लक्षात ठेवतो की काकू पेक्षा सगळ्यन्ना "जी" लावायचे. माफी करा. मला काही इथल्या लोकान्सारख छान छान लिहिता येत नाही. तर माझे दोस्त पण बनत नाहीत. पण मी ही साइट वाचतो. मला तुम्ही लोक चान्गले वाटले म्हणून अलो. मला वाटले की खुप सारे लोक आहेत तर ह्यान्ची मुले शाळेत जात असतील. ह्यान्च्याकडून काही सल्ला मिळेल. आदुबाळने तर किती चान्गली लिन्क दिली आहे. तर असे काही सान्गा ना.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/26/2016 - 11:54 नवीन
अहो दादा, तुमच्या मित्राला एकूणच सगळे आखुडशिंगी बहुदुधी हवे आहे असे दिसतेय, जे मिळणे तसे कठीणच आहे. आदुबाळ ह्यांनी दिलेली लिंक पाहिलीत का? सीबीएससी शाळांची लिंक पाहिलीत का? जे हवे आहे त्यासाठी तुम्ही/ तुमचा मित्र स्वतः काही हातपाय हलवताय का? पब्लिक फोरमवर सल्ला मागितल्यावर प्रश्न विचारले जाणार आणि सल्ले पण देणारच की. हे हनकोप,, ते ही नको मग नक्की हवेय तरी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/26/2016 - 18:44 नवीन
"सारे मिपाकर एकमेकाचे मित्र आहेत" हा मिपावरचा एक अलिखित नियम आहे. तेव्हा इतके संवेदनाशील (पक्षी : बोली मराठीतला 'टची') होऊ नका. मित्रामित्रांत थोडिशी थट्टामस्करी आणि थोडेशी पायओढी होणारच. ते तर जीवनातले मीठ आहे, नाही का ? किंबहुना, ही विनेदाची झालरच मिपाचे खास वेगळेपण आहे. तेव्हा... दुरावा सोडा आणि मदत आणि चेष्टामस्करी दोन्हीही मित्रत्वाच्या भावनेने मजेत स्विकारा... बघा किती मजा येईल ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
क
कपिलमुनी गुरुवार, 05/26/2016 - 20:35 नवीन
तुम्ही त्याला सल्ला द्यायचे पैसे चार्ज करत चला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
M
Maharani गुरुवार, 05/26/2016 - 11:56 नवीन
Mazya maitrinichi mulagi victorius kids educare ya International shalet jate.Ti shala IB abhyaskram follow karat.Shala chan aahe asa ticha abhipray aahe. http://www.victoriouskidsseducares.org/ Hi link bagha.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/26/2016 - 12:47 नवीन
मगरपट्टा अन् एमायटी गुरूकूल: हे कॉम्बिनेशन पाहा एकदा.
  • Log in or register to post comments
न
नितीन पाठक गुरुवार, 05/26/2016 - 12:48 नवीन
नमस्कार, Lexicon International School वाघोली, हडपसर आणि कल्याणीनगर येथे आहे. कृपया सविस्तर माहिती साठी खालील लिंक पहावी. http://www.lexicon.edu.in/# धन्यवाद.........
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 05/26/2016 - 16:14 नवीन
मला तर असे वाटते की चिंटुचे मित्र कुणा सरदार घराण्याचे वारसदार असावेत ज्यांची बडदास्त ठेवण्याचे काम या बिचार्या चिंटू साहेबांवर आले असावे
  • Log in or register to post comments
झ
झकास गुरुवार, 05/26/2016 - 17:54 नवीन
हे बघा : www.indusschoolpune.com. दोन मित्रांची मुले आहेत ह्या शाळेत. दोघेही खुश आहेत. पण फी वगैरे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 05/26/2016 - 20:27 नवीन
Sorry, I have to write in english due to some technical problem. Mi itakyatach punyat shift jhalo, mulaga ithe ICSE la asalyaane CBSC kinva ICSE board baghat hoto- majya baghanyat aalelyaa kahi changalya shala, tyavarache remark aani varshik Fee 1) Gurukul- E Square mage, changali shala pan admission milane kathin Fee 70 hajar 2) Vidya vally- Sus Gaon- Parat changali aani majori shala admissioncha bharavasa nahi, Fee 70 hajar 3)Ryan International- Bavdhan- OK shala, mala christian vatavaran nahi aavadal- Fee 70 hajar 4)Vibgyor- OK shala, Fee 2 lakh 5) S S Ravishankar- mi ithe admission ghetali- Bhugavla aahe, English madhyamatali marathi shala, Fee 50 K Baki itar anek aahet, thodya far farakane changalya vait..
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 05/27/2016 - 10:42 नवीन
Fee 70 hajar Fee 2 lakh Fee 50 K ही शाळेची फी आहे की इंजिनिअरींग कॉलेजची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
न
नाखु Fri, 05/27/2016 - 11:07 नवीन
है देनेवाले है, इसलीये तो लेनेवाले है!! पी एम्टी बशीतला प्रवाशी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Fri, 05/27/2016 - 11:34 नवीन
पी एम्टी बशीतला
अगदी कोंडुसकरच्या बशीची फीसुद्धा कमी आसल. माझा मुलगा सीबीएसई स्कूलला होता त्याची दहावीची फी ४५ ह. होती. यात युनिफॉर्म, पुस्तके वह्या, स्पोर्ट्स ड्रेस, जेवण आणि ट्रान्सपोर्ट हे सगळं अंतर्भूत होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Fri, 05/27/2016 - 11:57 नवीन
का शाळा त्यांची ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Fri, 05/27/2016 - 12:11 नवीन
नाही ना. नाहीतर लगेच सल्ला नसता का दिला ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
त
तुषार काळभोर Fri, 05/27/2016 - 11:54 नवीन
मोजून १० वर्षांपूर्वी मी इंजिनियरींगला वर्षाला मोजून १५००० भरायचो. सहा वर्षात (२ वाय्डी ;) ) / खरंतर आतापर्यंतच्या आयुष्यात एकदाही कसलाही क्लास/शिकवणी/ट्युशन नाही. माझा इंजिनियरींगचा एकूण खर्च २००१-२००७ एक लाखापेक्षा जास्त नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
र
रेवती गुरुवार, 05/26/2016 - 20:31 नवीन
बाकी काही असो, पिलियन रायडरला काकू म्हणालात ते महागात पडणार बहुतेक! जावा आता, काह्ही माहिती मिळणार नाही, शोधा आपले आपण!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 05/27/2016 - 07:22 नवीन
परत (इथे तोंड वेंगा-डुन डोळे उर्ध्व अशी स्मायली)..... टाकलीस काडी..........!!!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 05/27/2016 - 08:19 नवीन
माझं काही म्हणणं तरी आहे का?!! उगाच काड्या... ए चिंटुल्या.. तू बिन्धास्त काकू म्हण रे!
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे Fri, 05/27/2016 - 09:34 नवीन
चिंटु नक्की कुठे काकू म्हणाला ते काही सापडलं नाही... अर्थात काकूंना काकू म्हणण्याबाबत कोणी का का कू करावी काही कळेना!
  • Log in or register to post comments
च
चिंटु Mon, 06/13/2016 - 12:14 नवीन
सगळ्यान्चे पुन्हा एकदा आभार. अखेर पवार इन्टरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश मिळाला आहे. शिवाय डोनेशन लाग॑ले नाही काहीही.तुम्ही सगळ्यान्नी दिलेल्या माहितीचा पण उपयोग झाला. चार नवी नावे समजली. निवडताना काय व कसा विचार करावा हेसुद्धा समजले.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 06/13/2016 - 15:41 नवीन
पवाराशिवाय पर्याय नाही. मला म्हैत होते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
स
संदीप डांगे Mon, 06/13/2016 - 17:44 नवीन
अगदी अगदी... मनातलं बोल्लास.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ऋ
ऋषिकेश Mon, 06/13/2016 - 12:45 नवीन
इतक्या फिया ऐकल्या की मुलीला साध्याशा मराठी येस्सेस्सी शाळेत घातल्याबद्दल समाधान वाटते. वेळ पडली तर उरलेल्या पैशात तिच्याचसाठी कितीतरी गोष्टी करू शकेन!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा