आंबा कलाकंद
Primary tabs
साहित्यः १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम हापूस आंब्याचा रस, १०० ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम खवा. सजावटीसाठी पिस्ते काप, केशराच्या काड्या.

कृती: हापूस आंब्याचा रस काढून मिक्सरवर फिरवून बारीक करून घ्यावा. रस मोजून घ्यावा. पनीर आणि खवा एकत्र करून गुठळ्या मोडून घ्याव्या. साखर आणि आमरस एकत्र करून मंद गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की एकत्र केलेले खवा पनीर त्यात मिसळावे. परतत रहावे. मिश्रणाचा गोळा होत आला की ताटाला तूप लावून गोळा थापावा. पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्यांनी सजवावे. चांदीचा वर्खही लावता येईल. आवडीप्रमाणे वड्या कापाव्या.
मी माझ्या आत्याच्या पंचात्तरीला मुंबईला न्यायचे असल्याने मिश्रण बर्फीसारखे न ठेवता वडीसारखे घट्ट केले. नाहीतर कलाकंद थोडा ओलसर असतो. ताज्या आंब्याचा मस्त स्वाद येतो.
दुसरा फोटो कार्यक्रमाच्या गडबडीत फार काही चांगला आला नाहीय.

नक्कीच करून बघीन....
फक्त ते हाप्पूस आंबे बायकोच्या नकळत चोरावे लागणार.
नक्की देईल आंबे!
करणार.
एकदम भारी प्रकार आहे अनन्या!
खवा भाजून घ्यायचा नाही का? पनीर घालण्याचं पटलं नाही.सर्व खवाच हवा.
सगळा खवा घातला तर ती बरफी होईल कि.
आपल्याला कलाकंद करायचाय. त्यात पनीर असतंच.
मस्त दिसतायत फोटो.
कलाकंदमध्ये पनीर वापरतात माझ्या माहिती प्रमाणे. आणि टेस्ट अप्रतिम आली होती...खरच!!
वाह, मस्तं!
छान दिसतो आहे कलाकंद,
स्वाती
छान दिसत आहे.....नक्कि करुन बघनार...
जबरी..
फोटो फारच जीवघेणा आलाय.
दिपकबाबा पनीरवाले यांचेशी शमत!
आपणही येताना पनीरचं काहीतरी बनवून आणा.
ताई मी आले की करुन ठेव ;).. नेहमी सारखीच सिंपल बट ऑसम रेसेपी
आंबे संपण्यापूर्वी ये, मग देता येईल करून.
Ho.
Sadhi pan apratim pak kruti!
वा!वा!झकास.
आहा सुंदरच!
आहा सुंदरच!
मस्त दिसतोय
मस्त दिसतेय.
पण घरात मी ektich गोड खाणारी असल्याने करणार नाही.एकासाठी खुप उपद्यावप होईल तो.
सर्वांना धन्यवाद!!
मस्तच