Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

..कुणी दार माझे ठोठावले..

क — कानडाऊ योगेशु, Sat, 05/28/2016 - 17:24
उगा आग्रहाने बोलावले. किती आज तेही सोकावले. कुठे चोर दडला अकस्मात तो? कुणी दार माझे ठोठावले..!!! पुन्हा झूळुकिशि सख्य सांधले पुन्हा एक वादळ घोंघावले. तिचे बेत होते,तिला धार्जिणे. तिने बेत माझे धुडकावले. चितेला म्हणालो आईच तू! किती छान मजला जोजावले.! थव्यामागुनि निघाले थवे कुणी दगड आत भिरकावले? असो देव वा तू तत्सम कुणी. असे कोण मजला रे पावले? किती काळ मजला झुंजावले अता दु:ख माझे थंडावले.! जुन्या वेदनेने लळा लावला सुखाला नव्या मी हुसकावले! कुणी भक्त ना पावण्या जोगता वरी देव सारे सुस्तावले! सुखाला म्हणालो सरक ना पुढे! किती सभ्यतेने गुरकावले! किती घोषणा अन किती योजना किती लोक सारे भांबावले! समजलेच नाही मलाही तसे (कुणाला कसे मीच समजावले?) प्रिये योग झाला संभोग हा.. असे एकमेकास भडकावले! सुदर्शन नको अन गीता नको इथे बासरीनेच नादावले. ------------ अवांतर : मिळाली तयाला मते भोपळा उगा चिन्ह का भोपळा लावले! तुझी चुंबने धुंद व्हॅम्पायरी कुणी ड्रॅक्युला का तुला चावले + कानडाऊ योगेशु

प्रतिक्रिया द्या
2082 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ज
जव्हेरगंज Sat, 05/28/2016 - 17:52 नवीन
..कुणी दार माझे ठोठावले..>>>> मग उघडा की मालक, उगाच काव्य का म्हणून प्रसवले.. ;)
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 05/28/2016 - 20:15 नवीन
उगाच काव्य का म्हणून प्रसवले.
. हॅ हॅ हॅ. इट वॉज अ‍ॅन अक्सिडँट असे समजा हवे तर. ह्यावरुन एक पुणेरी मायलेकीचा अतिशय चावट कायप्पा जोक आठवला. ;) शुभ वीकांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
च
चांदणे संदीप Sun, 05/29/2016 - 01:19 नवीन
ज ब र द स्त S a n d y
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 05/29/2016 - 08:59 नवीन
भारीच झालेय. योगेशु सध्या फॉर्मात आहेत.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 05/15/2018 - 20:16 नवीन
चितेला म्हणालो आईच तू! किती छान मजला जोजावले.! _/\_ अप्रतिम !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा