Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"व्वा…क्या बात है…!"

अ — अश्विनी वैद्य, Sun, 05/29/2016 - 23:42
"व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर जीव ओवाळून टाकावा त्या शब्दांवर, त्या सुरांवर, त्या मधुर आवाजावर, त्या अभिनयावर एकूणच त्या साऱ्या बेभान कलाकृतीवर, आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर भान हरपून स्वत्वही हळुवार निसटावं अगदी स्वतःच्याही नकळत, पार आत खोलवर कुठेतरी काहीतरी कधीतरी असं भिडावं नसलेल्यातलं असणं डोळ्यासमोर उभं राहावं, असलेल्याच्याही नकळत, आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर बंद डोळ्यांच्या पडद्याआड सगळे संदर्भ, स्पष्टीकरणासहित लागावेत, संवेदनशीलतेच्या परिसीमा तिची हद्द ओलांडून जाव्यात, पंचेंद्रियांच्या जाणीवा तृप्ततेच्या साधनेत बुडाव्यात, आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर या रमण्याचे पाश इतके खोलवर रुजावेत की, व्यावहारिक देण्याघेण्याची ओळख ते विसरावेत नशिबाने असे क्षण वारंवार यावेत, आयुष्याच्या लांबीची मोजपट्टी ते व्हावेत बस्स, एवढंच काय ते जगणं, बाकी निव्वळ वयाची गणितं अश्विनी वैद्य

प्रतिक्रिया द्या
1362 वाचन

💬 प्रतिसाद (2)
श
शिव कन्या Mon, 05/30/2016 - 15:20 नवीन
लेखाजोखा आवडला. सुंदर.
  • Log in or register to post comments
अ
अश्विनी वैद्य Tue, 05/31/2016 - 00:00 नवीन
Thank you very much...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा