Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नावडती

ज
जानु
Mon, 05/30/2016 - 09:05
🗣 3 प्रतिसाद
आतापर्यंत आपण आपल्याला आवडती आणि आनंद देणारी घटना, स्थळ, खानावळ, जेवण यांचा उल्लेख करतो आणि ईतरांना त्याची माहिती व्हावी, त्यांनी आस्वाद घ्यावा असा विचार करतो. पण बर्‍याचदा प्रवासात आणि कामाच्या निमित्ताने आपणास काही ठिकाणी अगदी वाईट आणि अस्वस्थ करणारे त्रासदायक अनुभव येतात आणि आपण तिथे जायचे कायम टाळ्तो किंवा ईतरांना ही तसे सांगतो. मला असे वाटते की सगळ्यांना असे अनुभव येतात. आपण जर ते सामाईक केले तर सगळ्यांना मदत होईल. १. अनुभव हे वैयक्तिक असतात आणि त्यांचे सार्वत्रिकीकरण करुन मते बनविणे तसे चुकीचे असु शकते पण तरी यावर चर्चा करावी. २. यात फक्त आपलीच बाजु असण्याची पुर्ण कल्पना आहे. अनुभव आम्ही काही नातेवाईक मिळुन कोल्हापुर मधील चंदगड तालुक्यातील नातेवाईक आणि मित्रांना भेटुन परत येत असतांना सातार्‍याला दुपारी स्माईल हॉटेल येथे जेवणाला थांबलो. दुपारी १ चा सुमार होता. ऑर्डर दिल्यानंतर सुमारे ४५ मिनिटांनी जेवण मिळाले. स्टार्टर पैकी एक २० मिनिटांनी आले. १४ पैकी ६ मुले होती. भुकेने शेवटी रडायला आली. आम्हाला किचन पर्यंत जाउन सांगावे लागत होते. आचारी नाही. बिल आणि ऑर्डर घेणाराच बनऊन देत होता. शेवटी त्याने सांगितले की आज कोणीच नाही. हॉटेलमध्ये काही तरी अडचण आहे. नीट पार्किंग केली नाही म्हणुन एका गाडीवाल्याशी त्यांचा लॉज वाला अगदी विचित्र भाषेत बोलला. आम्ही पण उठणार पण कसेबसे खाल्ले. सुप अगदीच पातळ होते. पनीर बटर मसाला केचप सारखे दिसत होते आणि तश्याच चवीचे. पनीरचे अर्धा सेंटीमीटर चे ६-७ चौकीनी तुकडे दोन पोरींनी लगेच उचलले. दाल तडका चवीला ठीक पण अगदी पातळ माझ्या मुलीने तर चमचीने पिउन संपवले. आणि बाहेर येतांना बाजुच्या साध्या ढाब्यावाल्याला त्या बिलामधील काही हिस्सा देताना पाहिले. मग उमजले की याने त्याच्याकडुन आणुन आम्हाला दिले आणि त्यातही २०-२५ रुपये जास्त लाउन. तशी आम्ही त्या ढाबेवाल्याशी बोलुन खात्री ही केली. सगळ्या जेवणाला वेळ लागला सुमारे दोन तास.

प्रतिक्रिया द्या
1298 वाचन

💬 प्रतिसाद (3)
आ
आनन्दा Mon, 05/30/2016 - 09:09 नवीन
कठीण आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 05/30/2016 - 09:42 नवीन
अवघड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
न
नाखु Mon, 05/30/2016 - 09:15 नवीन
आणि उच्चभ्रू हाटेलातच (आवर्जून) जाणार्या काही मिपामित्रांच्या प्रतिसादाची या धाग्यावर गरज आहे. साध्या सुध्या जेवणात मन रमणारा नाखु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा