Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?

अ — अविनाशकुलकर्णी, Wed, 06/01/2016 - 05:10
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? . कधी राग,कधी अनुराग, कधी प्रेम, कधी आग कधी हो, कधी नाही कधी घरी विचारते,कधी माहीत नाही, तू तर रोज सखे भेटतीस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? . कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग कधी भांड भांड भांडतेस, तर कधी गळ्यात पाडून रडते कधी स्वत:च खरं करतेस, तर कधी माझ चुकलं म्हणतेस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? . कधी अल्लड, पोरसवदा मुलीच वागणं तर कधी प्रौढे सारखं बोलणं कधी फोन कट करणं , तर कधी,सारखं मिस कॉल देणं कधी म्हणते, तोंड बघणार नाही, तर कधी,तुला भेटल्या शिवाय करमत नाही कधी तू खूप चांगला,तर कधी, खूप वा‌ईट्ट सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? सांगा ना, काय असेल तिच्या मनांत? . हे कोड कधी उलगडेल का? रमणी च मन कधी कळेल का?

प्रतिक्रिया द्या
1699 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
सतिश गावडे Wed, 06/01/2016 - 05:22 नवीन
सुंदरीला मटण आणि बीयर मद्याच्या पार्टीला यायचे असेल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/01/2016 - 05:26 नवीन
काय अकुकाका ऑं...जिलब्या पाडायलात रोज.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/01/2016 - 08:09 नवीन
नै तेव्हा ते तांब्या, बसणे, वगैरे च्या जिलब्या पडतात तेव्हा मात्र धावत येता आणि किती अप्रतिम कविता अशी दाद देता. असा व्यक्ति पाहुन भेदभाव. हे काय आवडलं नाय. :/ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 06/01/2016 - 10:04 नवीन
अहो त्याही जिलब्या, ह्याही जिलब्याच. जिलब्यांत काय आपलं परकं करायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/01/2016 - 08:26 नवीन
तुमची सुंदरी जशी विचारते ना ? तसं तीही विचारते बरं का की तुझ्या मनात काय चाललं म्हणून सांग. मला तुमच्या रचनेवरुन एक गाणं आठवलं ''चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात नाचते मी तोर्‍यात, मोरावाणी काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात गोड गोड गुपित, तुझ्या मनी, रे" (दुवा) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे Wed, 06/01/2016 - 11:34 नवीन
सुंद्री कंफ्युज्ड आहे असे वाटत आहे. लवकरात लवकर डॉक्टर चा सल्ला न घेतल्यास केस हाताबाहेर जाऊ शकते. एवढे हायपर मूड fluctuations????
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा