Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोणता इन्शुरन्स घ्यावा?

स
सतिश पाटील
Sat, 06/04/2016 - 12:07
🗣 57 प्रतिसाद
निवांत दुपारच्या वेळेला आमच्या ऑफिसच्या क्षेत्रात एक एल आय सी प्रतिनिधी येऊन बसला होता. एल आय सी घ्यावी म्हणतात, आणि माझ्याकडे ती नसल्याने मी त्याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला तो टर्म इन्शुरन्स बद्दल काहीच सांगत न्हवता. पण मी सारखं हट्ट केल्याने त्याने माहिती दिली परंतु तो तितका उत्साही दिसत न्हवता. असो, टर्म इन्शुरन्स बद्दल थोडेसे माहिती असल्याने मी ती घेण्याची ठरवली, पण त्याच सोबत गुंतवणूक म्हणून सुद्धा काही रक्कम गुंतवण्याची तयारी आहे. जास्त काही यामध्ये माहित नसल्याने कृपया जाणकार लोकांनी मार्गदर्शन करावे अशी अशा. जेणेकरून माझ्यासारख्याच इतर लोकांनाही ज्ञान मिळेल. दुसरा काही पर्याय असेल गुंतवणुकीचा तर तोही सांगावा अशी विनंती. त्याने दिलेली माहिती थोडक्यात अशी माझ साध्याच वय -३१ वर्ष टर्म इन्शुरन्स- अमूल्य जीवन पोलीसी अवधी -२९ वर्ष वार्षिक प्रीमियम - १३८५८ खपल्यावर मिळणारे पैसे- ५०००००० ( पन्नास लाख ) दुसरी पोलीसी जीवन आनंद ८१५ पोलीसी अवधी -२९ वर्ष वार्षिक प्रीमियम -३८५४४ एकूण भरणा-१०९८२८८ २९ वर्षानंतर मिळणारा परतावा- ३३६०००० ( तेहतीस लाख साठ हजार ) लायीफ टायीम रिस्क कवर -१०००००० ( जो पोलीसी संपल्यावर देखील चालू राहतो ) नैसर्गिकरीत्या खप्ल्यास १० लाख आणि अपघाती खप्ल्यास २० लाख ३ वर्षानंतर कर्ज मिळण्याची सुविधा ३ वर्षानंतर ६० टक्के रक्कम परत काढून घ्येण्याची सुविधा

प्रतिक्रिया द्या
19185 वाचन

💬 प्रतिसाद (57)
प
प्रसाद भागवत गुरुवार, 06/09/2016 - 11:03 नवीन
मला आठवत असलेल्या आकडेवारीनुसार भारतातील बहुसंख्य पोलिसीज ह्या 15/20 वर्षे कालावधीच्या असतात. भारतातील प्रमुख खासगी कंपन्याना व्यवसाय सुरु करुन आता जवळपास 15 वर्षे झाली आहेत.. सबब .. नविन कंपन्य आत्ताशिक १० वर्ष पण काम करत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या कडे डेथ क्लेम येण्याचे प्रमाण पण कमीच असणार. त्यांचे खरे रंग पुढे अजुन काही वर्षानी दिसायला लागतील....ह्या वाक्याला तितकीशी धार नाही. एलाआअयसी चा सेटलमेंट रेशो उत्तमच आहे ..या वाक्याकरिता खाली प्रतिसाद दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
स
सुबोध खरे गुरुवार, 06/09/2016 - 09:23 नवीन
टर्म इन्शुरन्स चा क्लेम सेटल करताना ८०% देतात याला काही विदा आहे का ? असं कोणी आणि कुठे म्हटलं आहे? हा आपण काढलेला अर्थ आहे. (जर असेल तर ते चुकीचे आहे.) एनडोवमेंट पासून मनी बैक लहान मुलांच्या आणि/ किंवा मेडिक्लेम, कार पासून घराच्या चोरीच्या, आग लागणे इ सर्व तर्हेच्या विम्यात मिळून हा आकडा येतो कोणतीच कंपनी क्लेम सेटलमेंट रेशो कोणत्या विम्याचा आहे आणि किती टक्के पैसे देते हे लिहित नाही. आमचा क्लेम सेटलमेंट रेशो सर्वात जास्त आहे हा दावा "एल आय सी" चा चावटपणा आहे. त्यांचा विमा सर्वात महाग आहे आणि त्यांची सेवा सर्वात भिकार आहे (त्यांची वेबसाईटहि टीनपाट आहे) म्हणून लोकांना भीती घालण्यासाठी अशी दिशाभूल केली जाते. रेषांच्या मधील वाचून घेणे हि ग्राहकाची जबाबदारी आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 06/09/2016 - 09:33 नवीन
टर्म इन्शुरन्स घेताय तर एल आय सी कशाला घेता.? ते क्लेम देताना ८०-९० टक्केच देतात.
या मुद्द्यावरून विचारले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद भागवत गुरुवार, 06/09/2016 - 10:46 नवीन
विमा या विषयावर खरे तर विस्ताराने लिहिता येईल..मी काही काळ Actuarial science चाही अभ्यास केला आहे हे सांगणे येथे अप्रस्तुत होणार नाही. मात्र व्यवसायाची सर्वच गुपिते येथे उघड करायला मी ईच्छुक नाही. सांगावयाचे हे की केवळ क्लेम सेटलमेंट रेशो पहाणे ही आत्मवंचना होईल..पुढील गोष्टीकडे जरुर लक्ष द्यायला हवे. (१)महागड्या प्रिमियम्सच्या युलिपचे क्लेम सेट्ल करणे आणि टर्म पोलिसीचा क्लेम सेटल करणे यांत फरक आहे. हे प्रमाण काय आहे ?? (२)प्रति क्लेम द्यावयाची सरासरी रक्कम किती?? हा ही या अनुषंगाने महत्वाचा प्रश्न ठरतो. LIC कडील बहुतेक पॉलिसीज ह्या खुप जुन्या व तुलनेने कमी विमा रक्कम असणार्या आहेत. सबब अशा पॉलिसीजमध्ये क्लेम देणे सोपे असते. (३)मिळालेला प्रिमियम व सेटल केलेले क्लेम्स यांचे प्रमाण ही तपासावयास हवे. उदा दीडपट अधिक विमा हप्ता घेणारी कंपनी जर १०% अधिक क्लेम सेटल करीत असेल तर आपण काय म्ह्णाल?? (४) याशिवाय क्लेम्स देण्याकरिता सरासरी लागलेला अवधी पहाणे ही महत्वाचे आहे.. बरीच वर्षे सातत्याने ह्या आकडेवार्या तपासल्यानंतर हल्ली या बाबत मी तितकासा अपडेट नाही याबद्दल क्षमस्व. मात्र यातील कोणत्याही बाबतीत LIC भारतातील प्रमुख ४/५ खाजगी विमा कंपन्यांच्या तुलनेने निर्णायकपणे फायदेशीर ठरत नाही हा सातत्याने आढळ्लेला निष्कर्ष अजुनही खराच असावा.. टीपः - कोणीतरी शंका उपस्थित केली असल्याने खुलासा करतो की HDFCLife आत्महत्येचे दुर्दैवी क्लेम्स ०१ वर्षाच्या कलावधीनंतर मान्य करते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 07/07/2017 - 10:05 नवीन
अतिशय उपयुक्त धागा ! छान चर्चा ! बरीच माहिती मिळाली. कन्सलटन्टच्या शिफारसी वरुन बीएसएलआय (बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स) चा टर्म इन्सुरन्स घ्यायचा विचार आहे. या कंपनीचा कुणी टर्म प्लान घेतला आहे का ? या कंपनीचा कुणाला काही अनुभव आहे का?
  • Log in or register to post comments
द
दिपस्तंभ Fri, 07/07/2017 - 23:43 नवीन
https://www.basunivesh.com/insurance-planning/
  • Log in or register to post comments
द
दिपस्तंभ Fri, 07/07/2017 - 23:44 नवीन
https://www.basunivesh.com/2017/01/05/top-5-best-online-term-insurance-plans-india-2017/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपस्तंभ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा