Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खडसे पुराण

द
दिव्य
Sun, 06/05/2016 - 15:44
🗣 5 प्रतिसाद
जळगावातील नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर एक नवीनच चर्चा सुरू झाली. ब्राम्हण अाणि बहुजन अशा या चर्चेला फाेडणी देण्याचे काम नारायण राणे यांनी दिले. तसे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील राजकारणात ब्राम्हण विरूद्ध बहुजन या चर्चेला सुरूवात झालीच हाेती. खरतर खडसेंना बहुजनांचे नेते म्हणता येणार नाही. खडसेंचा प्राबल्य हे खान्देशात त्यातच जळगाव जिल्ह्यात. त्यांना जळगाव जिल्ह्यात अाव्हान देणारे दुसरे भाजप नेते गिरीश महाजन हे बहुजन. परंतु ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले ते ब्राम्हण म्हणून नवे. अभ्यासू, भ्रष्टाचाराचा लवलेश नसल्यामुळे माेदींची मर्जी त्यांच्यांवर बसली. मग काेणत्याही मंत्रीपदाचा अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. दुसरीकडे गाेपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर एकनाथ खडसे यांना अापणच अाता भाजपचे मुख्यमंत्री, असे वाटू लागले. खान्देशात प्रचार करताना त्यांनी खान्देशच्या मुख्यमंत्री हाेण्यासाठी जास्तीत जास्त अामदार निवडून द्या असा प्रचार केला. खडसेंकडे अभ्यास, काम करण्याची प्रचंड क्षमता अाणि प्रशासनावर वचक हे सर्व गुण असताना त्यांना केवळ स्वच्छ प्रतिमा नसल्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पद मिळाल्यावरही ते मुख्यमंत्रीसारखे वागू लागले हाेते. अापणासच प्रशासन चालवता येते, अधिकारी अापलेच एेकतात, हे ते खासगीत सांगत हाेते. हळूहळू त्यांनी अापल्याबराेबर अापल्या परिवारातील अनेक सदस्यांनाही पदे वाटणे सुरू केले. अाधी सूनेला खासदार केले. त्यानंतर मुलगी जिल्हा बॅंकेची चेअरमन झाली. पत्नी जिल्हा दूध संघाची चेअरमन व नंतर महानंदाच्या चेअरमन झाल्या. घरात फक्त वर्षाच्या नातूकडे पद नव्हते. एक व्यक्ती एक पद असे धाेरण असलेल्या भाजपातील सर्व पदे एकाच कुटुंबात जात हाेती. त्याला मग लाेकशाहीने निवडून अाले, असे गाेंडस नाव दिले जात हाेते. स्वत: खडसेंकडे १२ खात्याचे मंत्रीपद हाेते. मंत्री असताना त्यांनी काय उद्याेग केले, हे माध्यमांमध्ये चर्चेला जात अाहे. त्यातील सत्य बाहेर येईल. परंतु अती तेथे माती हे वाक्य खडसेंच्या बाबतीत लागू पडते.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
2157 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ज
जव्हेरगंज Sun, 06/05/2016 - 15:50 नवीन
6 years 8 months या प्रदिर्घ कालावधीनंतर डायरेक दणकूण २ जिलब्या ;)
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sun, 06/05/2016 - 16:15 नवीन
आपणास कोणत्या प्रकारच्या चर्चेचा हव्यास आहे ते कळले.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 06/05/2016 - 16:37 नवीन
खडसेंचे दाऊद प्रकरण चालू झाल्यापासून ट्वीटर्,फेसबूकावर तसा शुकशुकाटच होता.त्यात आता एकनाथरावांनी राजिनामा दिल्याने अंजली दमानियांची लहानपणापासूनची सर्व माहिती जमा करण्याच्या कामाला काही 'भक्त हॅकर्स' लागले असावेत असा ह्यांचा संशय आहे. असो. कुमार केतकर्,उद्धव्,नारायण राणे पुढचे महिनाभर घरी गोडधोड करून खाणार असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 06/05/2016 - 16:57 नवीन
माई बर्याच दिवसानी दर्शन दिले. तुमच्या ह्यान्ची तब्येत कशी आहे ? सध्या कोणत्या नावानी कुठे असतात ? ;))
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 06/05/2016 - 17:41 नवीन
अभ्यासू, भ्रष्टाचाराचा लवलेश नसल्यामुळे ???? भ्रष्टाचारा,अभ्यासूचा लवलेश नसल्यामुळे ????
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा