पाककृती
संग सगेली
Primary tabs
कर्नाटक प्रांतात केली जाणारा हा पदार्थ. संग म्हणजे सफरचंद.बाकी कुळकथा ठावुक नै.
साहित्यः-
१)भेंडी पाव किलो. एका बाजुने उभी चिरावी.
२)एक मध्यम आकाराचे सफरचंद. मध्य्म आकाराचे तुकडे करावे.
३)२ चमचे लिबांचा रस ( किंवा एका लिंबांचा )
४)१ चमचा जिरे
५) २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन घ्याव्या.
६) ४ चमचे शेंगदाणा कुट.
७)१ चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला.
८)मिठ चविनुसार ,
९) १ चमचा जिरे पुड..
१०)हळद पाव चमचा.
११) तेल
कृती ;-
१) जिरे पुड,शेंगदाण्याचे कुट.काळा मसाला .एकत्र करुन उभ्या चिरलेल्या भेंडीत भरुन घ्या.
२) कढईत तेल गरम करुन त्यात अनुक्रमे जिरे,हिरवी मिरची, हळद आणी भेंडी टाका.
३) एक वाफ आल्यावर सफरचंदाच्या फोडी,मीठ आणी लिंबाचा रस टाकुन आणखीन एक वाफ येऊ द्या.
४) आवड असल्यास कोथिंबिर टाकुन सर्व करा.
समाप्त.
- टोनी
कशी काय लागेल कुणास ठावूक?
फोटो काय जार्विस टाकणार
असो,
अशा पा.कृ.चे फोटो नसावेत.
अणुमोदन. फोटो टाका बे पाकृंचे . नाहीतर पाकृ फौल आहे
फोटो टाकले असते पण तेवढ्यासाठी हा पदार्थ खाण्याची माझी तयारी नाही.
बाकी हा पदार्थ कर्नाटक प्रांती विजापुर परीसरात कुठल्याही हुच्चभ्रु हॉटेलात मिळेल.
-क.लो.अ.
--टोनी aka जेपी
*पण तेवढ्यासाठी हा पदार्थ पुन्हा खाण्याची माझी तयारी नाही..
हे बरंय.पाकृ लिहिणाराच परत खाण्याची तयारी नाही म्हणतोय =))))
आवडलेल्या पदार्थांच्याच पाकृ टाकाव्यात असा लूल आहे का?
काये का आदू, काये का???
लूऽऽऽऽल!
करुन पाहिली, फारच चविष्ट. येऊ देत अजून अशा अनवट पाकृ.
खरंच केलीस का यशो? घरात सफरचंद लोळताएत दोन.चांगली लागत असेल तर करून पाहीन.
अजया!! =))))))
दु दु दु यशो =))))
केली असती ना आत्ता चविष्ट भाजी =))))
मला सुचलेले काही विकल्प -
१) सफरचंदाऐवजी अननस वापरणे
२) भेंड्यांऐवजी वांगी वापरणे
३) अंडे घालून पाकृ बनवणे (ऑल टाइम मिपा फेवरेट)
अविनाश काका लोण इथवर आल्याचे पाहून जीवन धन्य झाले! असो!.
वेळ जात नाय का?
जुने जाणते मिपाकर असं नवोदित बल्लवांना नाउमेद करत आहेत हे बघून एक मिपाकर म्हणून....
माझया मते हळद आणि मसाला कॅन्सल केल्यास भाजी चांगली लागेल. भेंडी क्रिस्प होऊ द्यायची आणि सफरचंद आंबट हवे.
अवांतर - साध्या जिरेपूड घातलेल्या भाज्यांमदह्ये आणि बिन कांद्याच्या सॅलेड मध्ये सफरचंद छान लागते.