Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तो नुसता ह्ंसायचा

त — तिमा, गुरुवार, 06/09/2016 - 12:02
तो नुसता हंसायचा, फारफार तर खुणा करायचा तसा कधीचाच येऊन बसला होता,माझ्या साठीनंतर पण, त्याला घाई नव्हती ,कसली मायाही नव्हती लहानपणी,तरुणपणीही, कधी दिसला होता पण तेंव्हा मधेच लुप्त झाला होता बासष्ठीला हॉस्पिटलातही उशाशीच होता, स्तब्ध पहात होता मी विचारलं तर ,अजून वेळ आहे म्हणून खुणावत होता पंचाहत्तरी करायची का बाबा, मुलगा विचारत होता हा मागे मिष्किलपणे डोळे मिचकावत होता ऐंशीनंतर जरा धुरकट दिसू लागले होते तरी हा स्वच्छ दिसत होता कालांतराने ही गेली तेंव्हा दोन दिवस गायब होता सगळे पाहुणे गेले आणि पुन्हा दिसू लागला होता नव्वदी गांठल्यावर सगळे शतायुषीचा आग्रह करत होते तेंव्हाही तो शांतपणे हंसत होता न्हाणीघरांत तोल गेला आणि सभोवतालचे धूसर झाले तेंव्हा फक्त्, सेचुरी नशिबांत नाही असे अस्पष्ट पुटपुटला होता

प्रतिक्रिया द्या
3182 वाचन

💬 प्रतिसाद (19)
म
मारवा गुरुवार, 06/09/2016 - 13:37 नवीन
आवडली. मस्तच.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 06/09/2016 - 14:09 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 06/09/2016 - 15:56 नवीन
वा. मृत्यूलाच मित्र बनवलंय. फार छान!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 06/09/2016 - 17:15 नवीन
खूप छान.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 06/09/2016 - 18:33 नवीन
शेवटची कलाटणी छान (पण मग कविता कशी लिहीली?)
  • Log in or register to post comments
श
शलभ गुरुवार, 06/09/2016 - 19:45 नवीन
छान
तो नुसता हंसायचा, फारफार तर खुणा करायचा
मला वाटलेलं पांडू असेल रात्रीस खेळ चाले चा ;)
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे गुरुवार, 06/09/2016 - 20:11 नवीन
ये म्हटलं तरी येतो, नको म्हटलं तरी येतो!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/09/2016 - 20:43 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 06/09/2016 - 20:46 नवीन
तिमाजीपंत, आवडलं बर का काव्य. मस्तय एकदम.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 06/10/2016 - 04:25 नवीन
अवांतर - हंसायचा ऐवजी हसायचा असा शब्द हवा असं वाटतं.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 06/10/2016 - 04:43 नवीन
कवीता... मित्रायन आवडले. सुपातला नाखु
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 06/10/2016 - 04:50 नवीन
ह ह ह अण्णा ईलय
  • Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक Fri, 06/10/2016 - 05:51 नवीन
छान ! '' सेचुरी नशिबांत नाही '' हे सांगण्याचा अधिकार त्यालाच तर आहे
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 06/10/2016 - 18:06 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 06/10/2016 - 18:15 नवीन
खूप छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 06/10/2016 - 20:25 नवीन
जबरी
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/11/2016 - 03:46 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 06/11/2016 - 06:01 नवीन
सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Mon, 06/13/2016 - 13:38 नवीन
हे हे हे... जबरा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा