Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ती आणि मी....

ए — एक एकटा एकटाच, Fri, 06/10/2016 - 19:10
ती तशी नेहमीच गराड्यात असते मी त्या गर्दीचा एक भाग असतो ती तशी सगळयांच्या जवळ असते मीच कधी तिच्या नजरेत नसतो ती नुसती येण्याची चाहुल देते तो मुक्त तिच्यावर बरसत जातो ती चिंब तारुण्य उधळून देते मी धुंद स्वत:ला हरवत जातो ती गुलाबी सांज लेवुन येते मी क्षितिजासवे तिच्यात रंगून जातो ती नशावते कातरवेळ तिच्याच अदांनी मी नकळत तिच्यात विरघळत जातो ती अलगद रात्री स्वप्नात येते सारा आसमंत तिनेच भारलेला असतो ती एकच वेळ अशी असते जिथे ती "फ़क्त" माझी अन मी तिचा असतो पण........ ती आता चंदेरी दुनियेतच रमते मी आजही तिला दुरूनच न्याहाळतो अन तिच्या आठ्वांची कोमजलेली फुले मी गुपचुप हृदयात जपत असतो.

प्रतिक्रिया द्या
1427 वाचन

💬 प्रतिसाद (3)
अ
अभ्या.. Sat, 06/11/2016 - 04:38 नवीन
जमलिय पण समथिंग इज मिसिंग. तुझ्या जुन्या कवितामधला फ़ॅक्टर इथे मात्र गायबलाय. पु ले शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 06/11/2016 - 05:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
शार्दुल_हातोळकर Sun, 07/03/2016 - 11:51 नवीन
एक धुंद कविता.... छान आहे !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा