Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही,

ज — जगप्रवासी, Tue, 06/14/2016 - 10:45
काल जुनी अडगळ साफ करताना कॉलेज मध्ये असताना ट ला ट जोडून लिहिलेली कविता सापडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि रात्री ४ वाजेपर्यंत बायकोशी गप्पा मारत बसलो. सहज तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून इथे टंकली. पहिली कविता मी लिहिलेली, माझ्या बायकोला (तेव्हा गर्लफ्रेंड होती) एका साध्या कागदावर लिहून गुलाबा सोबत दिलेली. तिने तो कागद अजून जपून ठेवला आहे. मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही तुझी प्रेम करण्याची रीत मला कळत नाही सांगता येत नाही कधी रुसशील आणि कुठल्या गोष्टीवरून खुदकन हसशील हसता हसता माझ्यात हरवून जाशील हरून सुद्धा सगळ जिंकून जाशील माझ्यासाठी कोणाशी भांडशील याचा काही भरोसा नाही मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही माझ्या आयुष्यातील क्षण मला आठवत नाहीत पण तू तर त्या क्षणांची तारीख पण विसरत नाहीस सगळ्या गोष्टी तुला काल घडल्यासारख्या आठवतात माझ्यापुढे स्वतःच्या अस्तित्वाचा विचारही करत नाहीस खर सांगतो मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही याला उत्तर म्हणून तिने देखील जे सुचल ते लिहून मला दिलं होत. कधीतरी पहाटे एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी आणि दचकून उठताना तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी यासारख सुख ते काय…… कधीतरी भांडताना एखादी गोष्ट तू नकळत बोलून जावी आणि ती छोटी जखम दिवसभर छळत राहावी यासारख दुःख ते काय…… कधीतरी रविवारी सगळ घर पसरलेलं आणि दुपार नुसती पडून आळसात घालवावी यासारखी मजा ती काय…… कधीतरी रडताना तू एखाद वाक्य बोलाव आणि मी रडता रडता हसले कि पटकन कवेत घ्याव यासारखा आधार तो काय…… कधीतरी लढताना सगळे माझ्या विरुद्ध आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर एका नजरेत समर्थन मिळाव यासारख बळ ते काय …… कधीतरी चुकताना मला तू वेळोवेळी बजावाव आणि तू सांगूनही मी चुकल्यावर पुन्हा एकदा समजून सांगाव यासारख प्रेम ते काय……. कधीतरी हसताना तुझ्या डोळ्यात पहावं आणि आज पर्यंतच्या सर्व कष्टांच सार्थक झाल अस वाटावं यासारख समाधान ते काय ……. कधीतरी कातरवेळी जुन्या आठवणींना जागवाव आणि जे हव ते सर्व तू दिलस अस म्हणता याव यासारख आयुष्य ते काय ……. जगप्रवासी

प्रतिक्रिया द्या
5746 वाचन

💬 प्रतिसाद (23)
अ
अभ्या.. Tue, 06/14/2016 - 13:49 नवीन
अरेवा, मस्तच की. तुमच्या मिशेशची कविता जास्त विशेश आहे.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 06/14/2016 - 14:07 नवीन
सुंदर!!
तुमच्या मिशेशची कविता जास्त विशेश आहे.
:) सहमत.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 06/16/2016 - 08:29 नवीन
तुमच्या मिशेशची कविता जास्त विशेश आहे. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
आ
आनंद कांबीकर Tue, 06/14/2016 - 14:08 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 06/14/2016 - 14:10 नवीन
कधीतरी लढताना सगळे माझ्या विरुद्ध आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर एका नजरेत समर्थन मिळाव यासारख बळ ते काय …… + कधीतरी कातरवेळी जुन्या आठवणींना जागवाव आणि जे हव ते सर्व तू दिलस अस म्हणता याव यासारख आयुष्य ते काय ……
.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 06/14/2016 - 14:33 नवीन
सुरेख लिहिलंय.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 06/14/2016 - 15:17 नवीन
छान... दूसरी कविता जास्त आवडली, ती पण जूनीच आहे की आताची ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 06/15/2016 - 01:06 नवीन
बायकोची कविता जास्त आवडली.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 06/15/2016 - 01:37 नवीन
दोन्ही कविता एकदम मस्त. मनातले सगळेच जणू कागदावर अवतरले. सहज विचारतो, किती वर्षांपूर्वीच्या आहेत ह्या ?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 06/15/2016 - 04:44 नवीन
दोन्ही कविता आवडला. बाकी लग्नाला ३० वर्ष होत आले अजूनही तिच्या प्रेमाचे गणित कळले नाही... शिवाय तिला कविता हि करता येत नाही.. कस होईल???
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Wed, 06/15/2016 - 07:02 नवीन
आणि या दोन्ही कविता साधारण/९/१० वर्षापूर्वीच्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व
वपाडाव गुरुवार, 06/16/2016 - 12:38 नवीन
दुसर्‍या कवितेचा आशय वाचुन ती १० वर्षापुर्वीची असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी
ट
टवाळ कार्टा Wed, 06/15/2016 - 05:07 नवीन
मस्तय
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Wed, 06/15/2016 - 07:02 नवीन
सर्वांचे धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 06/15/2016 - 07:31 नवीन
दूसरी कविता अप्रतिम आहे! तुमच्या अर्धांगीनीला लिहिते ठेवा!
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स गुरुवार, 06/16/2016 - 08:50 नवीन
दुसरी कविता जास्त आवडली …… तोडीस तोड आहे … बाकी कवितेस कवितेने प्रतिसाद मिळणे म्हणजे अहोभाग्यच !!!!
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी गुरुवार, 06/16/2016 - 11:39 नवीन
पण आम्ही दोघे कधीतरी मेसेजवर बोलताना एकमेकांना टाइमपास म्हणून चारोळ्या लिहून पाठवायचो (म्हणजे अजून पण पाठवतो). ती खूप छान लिहिते मी त्याबाबतीत दगड आहे, अजून पण तिच्या डायरीत कविता लिहिते. वेळ मिळाला की एक एक करून इथे टंकत जाईन. सर्वांचे धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
व
वपाडाव गुरुवार, 06/16/2016 - 13:07 नवीन
त्यांनाच का नाही बोलवत इथे? हाच तो सुर्य अन हा जयद्रथ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी
अ
अभ्या.. गुरुवार, 06/16/2016 - 13:31 नवीन
वपाकृष्णा, वपासूदना ह्या अर्जुनाला तरी सोडा, का धर्मसंकटात टाकतायसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
च
चांदणे संदीप Fri, 06/17/2016 - 07:38 नवीन
+१ तुमच्या मिशेशला कविता आवडते आणि कवितेतूनच प्रतिसाद देता येतो हे परमविशेश आहे! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
स
सुचिकांत गुरुवार, 06/16/2016 - 13:43 नवीन
दोघांच्या कविता छानच ..
  • Log in or register to post comments
द
दीपा माने गुरुवार, 06/16/2016 - 14:05 नवीन
दोन्ही कविता तोडीस तोड आहेत. दोघांनीही आपापल्या कविता पुरूषप्रधान (तुम्ही) आणि स्रीप्रधान (मिसेस) भावनांसह तंतोतंत लिहील्या आहेत. आणखीही तुम्हा उभयतांच्या कविता वाचायला नक्कीच आवडतील.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 06/17/2016 - 05:13 नवीन
अगदी आमचीच ष्टुरी लिहिलीयं तुम्ही लोकांनी! लयंच भारी! आवडली. :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा