Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुला देव कसं म्हणायचं?

व — वेल्लाभट, Sat, 06/18/2016 - 09:22
ब्लॉग दुवा हा कविता - तुला देव कसं म्हणायचं? a नाही; राहून राहून हाच प्रश्न पडतो जिथे तुझ्या साच्यातून माणूस घडतो तुझ्या इच्छेशिवाय जगात पानही हलत नाही तुझ्यामुळेच नभावर रंग चढतो रंग देणारा तूच, रूप देणारा तूच भावनाही तुझ्याच आणि विचार देणारा तूच काही असलं तर ते तुझ्यामुळेच काही नसलं तरीही ते तुझ्यामुळेच मग असं असताना गोष्टी का बिघडतात? माणसं सांग एकाएकी अशी का बदलतात? सोपे प्रश्न क्लिष्ट होतात साधी माणसं दुष्ट होतात मग येतो आम्ही तुझ्याकडे आमचे विचार थांबल्यावर पुन्हा फिरून येत राहतो तुझाही उपाय लांबल्यावर आणि तुझा उपाय कधी होतच नाही बहुतेक तुझ्या हातातली ती बातच नाही पाऊस पाडणं सोपं असेल, पण विचार कर बहुदा माणूस माणूस झाल्यावर तुझ्या हातात रहातच नाही हो की नाही? नाही; मग सांग, विश्वास कसा ठेवायचा? आणि 'विश्वास ठेव' कसं म्हणायचं? 'माणूस'च जर तुझ्या हातात नसेल, तर तुला देव कसं म्हणायचं? - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
2841 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ल
लालगरूड Sat, 06/18/2016 - 14:20 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 06/18/2016 - 17:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 06/19/2016 - 12:19 नवीन
१ १३ ७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नाखु Mon, 06/20/2016 - 11:41 नवीन
७ ७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चांदणे संदीप Mon, 06/20/2016 - 12:38 नवीन
४८९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पद्मावति Mon, 06/20/2016 - 11:12 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा