Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समाधान !

ख — खेडूत, Sat, 06/18/2016 - 09:48
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच ! पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय? तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …! *** होती अमुची प्रिया एक ती आमची मंजे कंपनीची सदैव वाटे तिजला कांही नविन करावे प्रतिमासी कधी कनेक्टे हार्ट आमुचे कधी पॉलीस्यां अपडेटवी तसा एकदा सर्व्हे केला 'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि ! मनात नसता भाग घेउनि सारे प्रतीसादून आले सर्व्हे झाला पटपट आणिक सार निघाले हो झटपट स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि छान छान पी पी टी सजवून आली हो ऐटीत पुण्याला प्रिया विमानी त्वरित बसून सगळ्यांना गोळा करूनि पोपटपंची झाली करून सगळे आपण कित्ती ह्याप्पी दमली नाही सांगून सांगून वेगवेगळे वयोगट ते मुले मुली अन बाप्पेही असोत अनुभवी वा नवखे सारेच कसे ते ह्याप्पी-ह्याप्पी विचारते झाले मग तिजला अडचणीचे ते प्रश्न असे सर्वे होता खराच न्युट्रल? का मागितले लॉगिन असे ? सांग आम्हाला हेतू आतले कुणि बनविले प्रश्न यातले असे प्रश्न का ज्याचे उत्तर येईल तुझिया मनासारखे? दमली बिचारी देऊन उत्तर पळती झाली ट्याब घेऊनि ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ.......! ''विल बी ब्याक टु यू'' म्हणूनि तेच जाहले चेन्नईत अन तसेच काही बंगळुरी 'कुठून केला सर्व्हे 'झाले गेली वैतागूनि अगदी फुडच्या म्हैन्यातच गेली प्रिया बिचारी कंपनी सोडून लीन्क्डीनवरती आता कळले गेली ती तिथुनीही निघून कंपनी शिकली एकच यातून प्रकार असले बंद करून समाधान जे मनी वसे ते सर्व्हेने का येई कळून ? (जिल्बूत) १८/६/२०१६

प्रतिक्रिया द्या
4245 वाचन

💬 प्रतिसाद (9)
र
रातराणी Sat, 06/18/2016 - 09:58 नवीन
भारीये! जिलबी म्हणवत नाही!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 06/18/2016 - 10:58 नवीन
मस्तच जमलीय की, ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ.......! करनारी प्रिया आवाडली. ;)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 06/18/2016 - 11:15 नवीन
प्रिया आज तुमची नसे सर्व्हे घ्याया...!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 06/18/2016 - 14:31 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/18/2016 - 17:22 नवीन
छानेय कविता! :-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 06/19/2016 - 08:16 नवीन
दमली बिचारी देऊन उत्तर पळती झाली ट्याब घेऊनि ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ.......! Image removed. ''विल बी ब्याक टु यू'' म्हणूनि Image removed. बालिका आठवली!
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 06/19/2016 - 08:45 नवीन
वाचक आणि प्रतिसादकांचे आभार ! @रातराणी : धन्यवाद . पहिलाच प्रयत्न असल्याने 'एकूण असा प्रकार झाला तर ' अशा प्रतिसादाचीही तयारी होती. :) नवकवींची पावलं अडखळतच पडतात म्हणे. अभ्याशेठ, ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ....ची पेर्णा गुर्जीकडून घेतली तरी खफवर केलेले दुत्त दुत्त हे आपले काव्य समोर होतेच.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 06/19/2016 - 08:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 06/21/2016 - 12:47 नवीन
असा(ही) प्रकार झाला तर.... बाकी संप्रेरणा भारी आहे. वाचक नाखु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा