Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महिला वायुदल पायलटस

अ
अत्रन्गि पाउस
Sat, 06/18/2016 - 19:06
🗣 60 प्रतिसाद
३ महिलांनी भारतीय वायुदलात फायटर जेट पायलट म्हणून जबाबदारी स्वीकार्लीये. त्या युवतींचे मनापासून कौतुक, आदर आणि अभिमान. तथापि ह्या युवतींना काय प्रकारच्या कामगिऱ्या पार पाडाव्या लागतील हा प्रश्न सतावतोय. विशेषत: उद्या युद्ध सुरु झाल्यास ह्या महिलांना हम्म घ्या हे विमान आणि जाऊन करा बॉम्बिंग सिमेपलीकडे असा आदेश पार पडावा लागेल का ? सौरभ कालिया वगैरे आठवले कि अशा जागी एखादी स्त्री असेल तर काय होईल असे वाटते. आर्मी आणि नेव्हीत काय परिस्थिती आहे ? प्रत्यक्ष युद्धमैदानावर स्त्रिया जातात का ? इतर देशानमध्ये काय परिस्थिती आहे ? मला झाशीची राणी, रायबघन वगैरे उदाहरणे ठाऊक आहेत पण फायटर प्लेन्स वगैरे म्हणजे केवळ स्तिमित करणारे आहे ... सोन्याबापू, डॉक्टर खरे आदी प्रभृतीनच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
12675 वाचन

💬 प्रतिसाद (60)
म
मारवा Sun, 06/26/2016 - 13:43 नवीन
उद्या दहशतवाद्यानविरुद्ध लढाई साठी त्यांनी स्त्री सैनिक पाठवले आणि दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस धरून बलात्कार केला( सूड घेण्यासाठी) आणि ठार न मारता अगदी "सोडून" दिले तर देशभर लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडात शेण घातले जाईल
असे समजा झालेच गृहीत धरु या ही बातमी आज आली तर तुम्ही यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडात शेण घालणार का ? जर हो तर तुम्ही काय कारण द्याल ? म्हणजे काय मुद्द्यावर तुम्ही त्यांना जबाबदार धरणार ? काय अपेक्षा तुम्ही करता ? तुम्ही त्यांना काय म्हणणार ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/27/2016 - 06:56 नवीन
मारवा साहेब तुम्ही एअर ऑफिसर कमांडिंग आहेत आणि पाकिस्तानच्या सरगोधा बेसवरील अणुक्षेपणास्त्रे नष्ट करण्यासाठी हल्ला करायला जग्वार विमाने पाठवायची आहेत. यात १० % शक्यता विमाने पडली जातील अशी आहे. तुमच्या कडे १६ विमाने आहेत आणि ३२ वैमानिक ज्यातील ४ स्त्रिया आहेत अशा वेळेस तुम्ही स्त्री वैमानिकांना पाठवाल की पुरुष? केवळ समानता म्हणून पुरुषांबरोबर स्त्रियांना पाठवाल का?
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 06/27/2016 - 07:58 नवीन
पण पण.. स्त्रियांनी जाण्याची इच्छा दर्शविली तर? (जी इच्छा त्यांच्या स्वेच्छेने ही खडतर करियर स्वीकारण्याच्या निर्णयात ऑलरेडी अंतर्भूत आहे असं मानायला हरकत नाही.) आणि कधीतरी खुद्द "एअर ऑफिसर कमांडिंग" ही निर्णय घेणारी व्यक्तीच स्त्री असावी यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे असं नाही वाटत? की तसं व्यवस्थेला नको वाटत असेल? उदा. म. फुल्यांनी / सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण/ हक्क देण्याबाबत सुरुवात केली त्या प्रतिकूल संघर्षपूर्ण काळात "हे सर्व बोलायला ठीक आहे, पण तुमच्या मुलीला तुम्ही वेळ आल्यास सावित्रीबाईंच्या शाळेत घालाल का? ती जास्त शिकली तर तिचं लग्न होईल का?" असे प्रश्न विचारले गेलेच असतील ना? तिथे एकट्या सावित्रीबाई आणि एकेकटे आगरकर , एकेकटे कर्वे उभे राहिले. इथे सरकार आणि हवाईदल उभं राहिलंय. अभिनंदन, अभिमान आणि सॅल्यूट टू गर्ल पॉवर..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Mon, 06/27/2016 - 09:44 नवीन
जर वरील परीस्थीती आहे समजा आणि मला निर्णय स्वातंत्र्य आहे तर नक्कीच १०० % मी स्त्री वैमानिकांना च पाठवेल. याच कारण असे की आजपर्यंत पुरुषांना अनेक वेळा संधि मिळाली होती आहे व मिळेल. मात्र या निमीत्ताने एक उदाहरण प्रस्थापित होणार असेल एक संधी उपलब्ध होणार असेल तर नक्कीच स्त्री वैमानिकाला आवर्जुन पाठवलेच पाहीजे. दुसर अस की त्याने एक उदाहरण प्रस्थापित होइल. पुढच्या वेळेस मग जेव्हा स्त्री वैमानिक पाठवायची असेल तेव्हा शंकांना धास्तींना पुर्णविराम बसुन एक त्यांच्या कार्यक्षमते विषयी विश्वास निर्माण होइल. म्हणून १- आवर्जुन अशी संधी स्त्री वैमानिकांना मिळण गरजेच अत्यावश्यक आहे. २- त्यानंतर निर्माण झालेलं उत्तम उदाहरण भविष्यकालीन स्त्रीयांचा मार्ग प्रशस्त करेल. आपली घटना आपले सर्वांचे शिक्षण आपला विवेक आपल्याकडुन या समानतेची न्यायाची अपेक्षा करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Mon, 06/27/2016 - 08:16 नवीन
गवि, कार्योचित्य (suitability for job) नावाचा प्रकार आहेच ना? स्त्रिया आघाडीच्या कामासाठी सुयोग्य नाहीत. लढाई करू शकतील. अगदी पुरुषांपेक्षाही उत्तम लढाई करतील. पण इतर पर्याय उपलब्ध असतांना तशी ती करू द्यावी का, असा प्रश्न आहे. आज भारतीय सैन्यात स्त्रियांना अतिशय मानाने वागवलं जातं. मेजवानीच्या प्रसंगी सर्वोच्च सेनाधिकारी सुद्धा साध्या सैनिकाच्या बायकोला अधिक मान आणि आदर मिळावा म्हणून प्रयत्नशील असतो. बायकांना ही खास वागणूक कशासाठी? माझ्या मते बायकांना ही खास वागणूक मिळण्याचा आणि त्यांना प्रत्यक्ष युद्धावर न पाठविण्याचा हेतू एकंच आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 06/27/2016 - 08:34 नवीन
कार्योचित्य (suitability for job) नावाचा प्रकार आहेच ना? स्त्रिया आघाडीच्या कामासाठी सुयोग्य नाहीत. लढाई करू शकतील. अगदी पुरुषांपेक्षाही उत्तम लढाई करतील. पण इतर पर्याय उपलब्ध असतांना तशी ती करू द्यावी का, असा प्रश्न आहे.
संधी द्या. जोखीम आणि परिणाम त्यांना जोखू द्या ठरवू द्या. क्षमता सिद्ध करुन दाखविण्याची केवळ संधी द्या. सर्वांप्रमाणेच त्यांनाही. खास औदार्य म्हणून नव्हे. संधी द्या हे व्यवस्थेला उद्देशून आहे. फायटर पायलट बनण्याची संधी दिली गेलीच आहे. व्यवस्था बदलते आहे. आता या प्रशिक्षित स्त्रियांनी प्रत्यक्ष युद्धवेळ आल्यास परिस्थितीला थेट तोंड देऊन सिद्ध करावं यात आनंद वाटेल. तिथे सवलत घेतल्यास खेद वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे Mon, 06/27/2016 - 08:36 नवीन
गवि स्त्रियांनी जायची इच्छा दाखवणे हा एक भाग झाला. आणि ते योग्य सुद्धा आहे. स्त्रियांना लढाऊ विमानात वैमानिक होण्यासाठी कोणतीच आडकाठी नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे. परंतु दुर्दैवाने प्रत्त्येक पुरुषाची मनोवृत्ती अशी नाही आणि लष्करी डावपेच तज्ञांना ज्यांना उत्तर द्यायचे आहे तेही लोक तितक्या खुल्या मनाचे असतील असे नाही. कागदोपत्री समानता छान आहे. एखाद्या वैमानिक महिलेला एखाद्या मिशन वर पाठवले असताना तेथे न्हाणीघर किंवा शौचालय असेलच असे नाही. किंवा तंबूत राहायचा प्रसंग येतो अशावेळेस तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी हा एक मोठा कठीण विषय असू शकतो. अधिकाऱ्यांचे स्नानघर मी विक्रांतवर असताना न्हाणीघराला फक्त प्लास्टिकचा पडदा होता. एखादा पुरुष अधिकारी जर महिला अधिकारी नहात असताना "चुकून" पडदा सारून आत आला तर? ही "चूक" चुकून झाली की नाही हे सिद्ध करणे किंवा ती तशी चुकूनच झाली आहे हेही सिद्ध करणे कठीण आहे. ३०,००० सैनिकांमध्ये माझी वर्गमैत्रिण श्रीलंकेत एकटी स्त्री वैद्यकीय अधिकारी होती. तंबूत राहणे. कॅनव्हॉसच्या तंबूतच तिच्यासाठी न्हाणीघर तयार केलेले होते. त्याला अर्थात कुठे ही कुलूप घालणे शक्य नसे. चारी बाजूला पहार्यावर असलेले पुरुष सैनिकच होते. एखादा अविचारी किंवा नैराश्य (desparate वर frustrated) आलेला सैनिक रात्री तंबूत घुसेल काय या भीतीने तिला रात्र रात्र नीट झोप लागत नसे. साधे सॅनिटरी नॅपकिन आणण्यासाठी बाजारात जाताना तिला तीन गस्ती सैनिक घेऊन जायला लागायचे. अख्ख्या ब्रिगेडला "माहिती" होत असे की डॉक्टर मॅडमची "पाळी" चालू आहे. यात तसे लपवण्यासारखे काही नसले तरी जगजाहीर होण्यासारखी लाजिरवाणी परिस्थिती नाही. ब्रिगेड कमांडरचे डोके सुद्धा तिची परत भारतात बदली होईपर्यंत शांत झाले नव्हते. कारण युद्धमान स्थितीत असलेले सैनिक कसे वागतील याचा कधी भरवसा देता येत नाही. नौदलाच्या जहाजावर स्त्रियांना पाठ्वण्यात आले तेंव्हा काही विचित्र प्रसंग उद्भवले होते. काही पुरुष अधिकारी मेसमध्ये निळा चित्रपट पाहत असताना दोन स्त्री अधिकारी तेथे आल्या आणि त्यांनी आम्हाला पण हा चित्रपट आताच पाहायला मिळाला पाहिजे अशी मागणी केली. पण एक पुरुष अधिकाऱ्याने "आपली" सीडी काढून खिशात टाकली. त्यावर त्या स्त्रियांनी आम्हाला महिला म्हणून वेगळे वागवले जाते याबद्दल लेखी तक्रार केली. त्यांना तुम्ही तुमची सीडी आणा असे सांगून ते प्रकरण मिटवण्यात आले. प्रत्येक जहाजावर स्त्रियांसाठी वेगळे न्हाणीघर/ शौचालय नाही. तसे बांधणे आता शक्य नाही. परंतु लष्करी कायद्यात काही कलमे अशी आहेत की ज्याची नक्की व्याख्या करता येत नाही. उदा व्हायोलेशन ऑफ गुड ऑर्डर अँड मिलिटरी डिसिप्लिन. अशा वेळेस नक्की काय करायचे हा फार कठीण प्रश्न असतो. यासाठीच नेहमी २ + २ = ४ होतातच असे नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 06/27/2016 - 08:49 नवीन
परंतु दुर्दैवाने प्रत्त्येक पुरुषाची मनोवृत्ती अशी नाही आणि लष्करी डावपेच तज्ञांना ज्यांना उत्तर द्यायचे आहे तेही लोक तितक्या खुल्या मनाचे असतील असे नाही. कागदोपत्री समानता छान आहे. एखाद्या वैमानिक महिलेला एखाद्या मिशन वर पाठवले असताना तेथे न्हाणीघर किंवा शौचालय असेलच असे नाही.
श्रीलंकेत एकटी स्त्री वैद्यकीय अधिकारी होती.
एखादीच स्त्री आहे सध्या, म्हणून यातले बहुतांश प्रॉब्लेम्स आहेत. बहुतांश पुरुष आहेत म्हणून एक विशिष्ट मनोवृत्ती रुढ आहे. बहुतांश पुरुष आहेत म्हणून एकटीला टॉयलेट नाहीये.. बहुतांश पुरुष आहेत म्हणून एकटीच्या सॅनिटरी नॅपकिन्सची चर्चा आहे. बहुतांश पुरुष आहेत म्हणून समानता कागदोपत्री वाटते आहे. वुई गॉट टु ब्रेक द व्हिशियस सर्कल टु मेक इट चेंज. एकटीच महिला इथपासून भरपूर महिला असा बदल होईपर्यंत हा संघर्ष अटळ आहे. पहिल्या गिर्यारोहकाला दोरीशिवाय कपारीत बोटं खोचत जावं लागतं. नंतर वहिवाट तयार होते. त्यासाठी पूर्ण जबाबदारी त्यांना देणं आवश्यक आहे असं म्हणणं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Mon, 06/27/2016 - 10:18 नवीन
यात तसे लपवण्यासारखे काही नसले तरी जगजाहीर होण्यासारखी लाजिरवाणी परिस्थिती नाही.
पाळी विषयी लपवण्यासारखे काही नाही व आवर्जुन जाहीर करण्यासारखीही काही बाब नाही. अगदी त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर विचार केल्यास कुणाला पडलच माहीती कोणाला तर त्यातही लाजिरवाणं काही नाही. मात्र तरीही ते लाजिरवाणं वाटत यात ज्यांना वाटत त्यांच्या मर्यादेचा प्रश्न आहे. पाळी येणे ही अत्यंत सर्वसाधारण बाब आहे. त्याकडे बघण्याचा सहज दृष्टीकोण आपल्याकडे अजुन नाही याचा साधा अर्थ आपल्या समाजाला अजुन लांबचा पल्ला गाठायचा आहे. अनेक स्त्री वाद्यांनी पाळीकडे बघण्याचा दृष्टीकोण सहज करण्यासाठी ( पावित्र्य वा अपावित्र्य इ. च्या पलीकडे एक साधं बायोलॉजिकल फॅक्ट या अर्थाने ) आवर्जुन प्रयत्न केलेले आहेत करत आहेत. आणि यात लाजिरवाण वाटण्यासारखं काही नाही हे माझ्यापेक्षा एक डॉक्टर म्हणून आपण अधिक उत्तम तर्हेने समजावु शकतात.
परंतु दुर्दैवाने प्रत्त्येक पुरुषाची मनोवृत्ती अशी नाही आणि लष्करी डावपेच तज्ञांना ज्यांना उत्तर द्यायचे आहे तेही लोक तितक्या खुल्या मनाचे असतील असे नाही. कागदोपत्री समानता छान आहे.
ते तितक्या खुल्या मनाचे नाहीत हीच अडचण आहे आणि नेमकी याच अडचणींवर मात करायची आहे व ती करायची असेल तर त्यांची मने खुली करण्यासाठी अनुकुल परीस्थीती व अनुकुल उदाहरणे व अनुकुल प्रचार करणे गरजेचे आहे. उदा. आज हा पाकीस्तान नंतर उशीरा का होइना हा निर्णय घेऊन हा प्रयत्न केलेलाच आहे असेच एक एक पाऊल उचलावे लागेल. थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप गवि म्हणतात तसे आज मोजकी उदाहरणे आहेत म्हणून अडचणी आहेत. जेव्हा सावित्रीबाई फुले उदा काही वर्षापुर्वी शाळेत शिकवत होत्या तेव्हा कदाचित स्त्री-शिक्षीका संपुर्ण महाराष्ट्रात एकच एक असावी. मात्र त्यांनी एकदा सर्व शेण इ. झेलुन सुरुवात केली ( जशी तुम्ही भीती व्यक्त केली सध्याच्या केसमध्ये लोक शेण घालतील) तसे त्यांनी प्रत्यक्षात भोगले. त्याचा काय परीणाम झाला ? तुम्ही बघतच आहात महाराष्ट्रातच याच राज्यात याच ठीकाणी काही दशकांपुर्वी जिथे एकच स्त्री-शिक्षीकेने सुरुवात झाली आता आज महाराष्ट्रात किती स्त्री-शिक्षीका शाळांत अभिमानाने निर्भयतेने आनंदाने शिकवत आहेत ? काही लाख तरी असतील. कारण कालांतराने एकेक जोडत अनेक उदाहरणे झाली अनेक पिढ्या झाल्या व काल अगदीच अशक्य भयंकर वाटणारी बाब सर्वसामान्य झाली. अगदी त्याच सावित्रीबाइंप्रमाणे आज तीनच महीला फायटर पायलट आहेत निरनिराळे प्रश्न आहेत तीन मधील काही प्रत्यक्षात लढतील शौर्यपदके मिळवतील तिन कडुन प्रेरीत होउन पुढच्या तीन लाख येतील.यात युटोपिया नाही हे सावित्रीबाइंसारख वास्तवात येणार. मिनीस्ट्री ऑफ डिफेन्स ने या फायटर पायलट संदर्भात जो प्रेस रीलीज दिला होता त्यात असे म्हटले आहे “Since their induction into the transport and helicopter streams of the IAF, their performance has been praiseworthy and at par with male counterparts. Inducting women into the fighter stream would provide them with an equal opportunity to prove their mettle in combat roles as well,” the statement said. विशेष म्हणजे बरोबर मागच्याच वर्षी ज्या एयर चीफ मार्शल राहा यांनी फायटर पायलट स्त्रीयांच्या क्षमतेविषयी जी शंका या शब्दात व्यक्त केलेली होती “As far as flying fighter planes is concerned, it is a very challenging job. Women are by nature not physically suited for flying fighter planes for long hours, especially when they are pregnant or have other health problems,” त्याच एयर चीफ मार्शल यांच्या ही विचारात परीवर्तन सकारात्मक परीवर्तन झालेले दिसुन येते. त्यांनी पुर्वीच्या विधाना विरोधात आता असे म्हटलेले आहे. Earlier this month, Air Chief Marshal Arup Raha said, "We have women pilots flying transport aircraft and helicopters. We are now planning to induct them into the fighter stream to meet the aspirations of young women in India." असे विचार हळुहळु बदलत असतात. दृष्टीकोण बदलत असतात. मी एक पुरुष आहे माझ्याही मनात नेणीवेत कुठेतरी अजुन खोलवर मलाही न जाणवणारा स्त्री विरोधी दृष्टीकोण दडलेला असेल कदाचित. त्यासाठी सतत स्व-परीक्षण करत राहण गरजेच आहे. व स्वतःच्या चुकीच्या विचारांना सुधारणे व त्यात सुसंगती आणत राहणे ही मी माझी व्यक्तीगत जबाबदारी समजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Mon, 06/27/2016 - 10:29 नवीन
पाकीस्तानची स्त्री फायटर पायलट आयेशा फारुक युद्धासाठी सज्ज आहे. http://www.dnaindia.com/world/report-i-m-ready-for-war-says-first-female-pakistani-pilot-ayesha-farooq-1882979 पाकीस्तानची दुसरी एक फायटर पायलट मरीयम मुख्तियार चा ऑन ड्युटी एका अपघातात मृत्यु झाला. तिला एका शहीद सैनिकाप्रमाणे सन्मान मिळाला. कराचीच्या फैजल एयर बेस वर लष्करी इतमामात तिच्या स्त्री-पुरुष सहकार्‍यांकडुन तिला सन्मानाने अंतिम निरोप दिला गेला. ती केवळ २३ वर्षांची होती. http://blogs.wsj.com/indiarealtime/2015/11/26/pakistani-female-fighter-pilot-mourned-after-jet-crash/ पाकीस्तानने २००६ पासुन दहा वर्षांपुर्वीच स्त्री फायटर पायलट ना सैन्यात सामील करणे सुरु केले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा