Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इनश्युरन्सचा हप्ता कसा चुकतो ?

म
माहितगार
Sun, 06/19/2016 - 08:12
🗣 6 प्रतिसाद
नेमेची येतो पावसाळा तसे आम्ही विमा पॉलीस्या काढतो, आता एकदम मुद्यावर उडी मारतो, आधीच्या पिढ्यांचा विम्याचे हप्ते चुकण्याचा अनुभव पाहून, मी अगदी पहिली विमा पॉलीसी उतरवताना पासून; हप्ते वेळेवर न भरल्याने पॉलीसी बंद पडेल एवढा विमा न काढणे तसेच प्रिमीअम भरण्याच्या तारखेच्या आधीच्या तारखेला संपेल असे फिक्स डिपॉझीट आणि इतर गुंतवणूकीच्या व्यवस्थाही करण्याची दक्षता घेतली; तरीही विम्याच्या हप्त्याच्या तारखा चुकल्यावाचून राहील्या नाहीत. असे का होते ? तुमचेही विम्याचे हप्ते कधी चुकले आहेत का ? आणि ज्यांचा हप्ता आजतागायत एकदाही चुकला नसेल ती मंडळी त्यांचे आर्थीक व्यवस्थापन कसे करतात ? किंवा वेळ ठरलेली देणी चुकू नयेत म्हणून आर्थीक व्यवस्थापन आणि आर्थिक शीस्त पाळण्यासाठी काय करावे ? या काथ्याकुटाचा उद्देश विमा पॉलीसींची चर्चा करणे नाही तर काढलेल्या विम्याच्या हप्ते असोत वा विशीष्ट वेळी परतफेड करावयाची देणी असोत, ती वेळेवर भरण्यासाठी लागणारे आर्थीक व्यवस्थापन आणि आर्थीक शीस्त विषयक प्रश्नांची दखल घेणे आहे. या विषयावर चर्चा लावली असली तरीही मी इंश्युरन्स एजंट नाही, (आणि हितसंघर्षाचा मुद्दा नको म्हणून इतर सक्रीय इंश्युरंस एजंटांनी चर्चेत सहभागाचा मोह टाळल्यास आभारी असेन). मी मागे एका वेगळ्या धाग्यात खेळते भांडवल या विषयासंबंधाने आर्थीक शीस्त विषयक चर्चा केली होती; घरगुती आर्थीक व्यवस्थापन चुकण्याचा व्यवसायांवरचे परिणाम अप्रत्यक्ष असतात, आर्थीक कोंडी झालेली कर्मचारी असंतुष्ट होणे आणि मॅनपॉवर टर्नओव्हर वाढणे हे अप्रत्यक्ष परिणाम असू शकतात. एकुण काढलेल्या विम्याचे असोत अथवा इतर विशीष्ट कालावधीने परतफेड करावयाची देणी असोत त्या कमीटमेंट्स यशस्वीपणे पार पाडण्याच्या गुरुकिल्लीचा शोध मिपाकरांच्या अनुभवाच्या बळावर घेणे हा या काथ्याकुटाचा विषय आहे. प्रतिसाद टाईम मॅनेजमेंटच्या अनुषंगानी येताहेत, लेखाचा उद्देश अधिक स्पष्ट करावयाचे तर आर्थीक अडचणींमूळे हप्ते चुकू नयेत म्हणून करावयाच्या आर्थीक व्यवस्थापना बद्दल आहे. या विषयावर पुर्वी चर्चा झाली असेल आणि कुणासाठी पुर्नउक्ती होत असेल तर क्षमस्व. अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
वर्गीकरण
विमा
अर्थ व्यवस्थापन

प्रतिक्रिया द्या
1967 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
सतिश गावडे Sun, 06/19/2016 - 08:25 नवीन
विमा कंपन्यांचे ग्राहक सेवा संस्थळ असते. अशा संस्थळावर आपली नोंदणी करावी. आपल्या विमापत्रांची त्यात नोंद केली की त्या त्या विमापत्राचे वर्षभराचे हप्ते कधी भरावे लागतील याची आगाऊ माहिती मिळते. त्या माहितीचा वापर करुन आर्थिक नियोजन करावे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 06/19/2016 - 08:49 नवीन
हल्ली स्मरण् पत्र येतेच. संस्थळे नसताना डायरीत प्रत्येक महिन्याची कामं लिहून ठेवत असे, त्यांचा आढावा वेळोवेळी घेतल्याने चुकायचा प्रश्नच आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ए
एस Sun, 06/19/2016 - 09:22 नवीन
एव्हढे मरणाचे एसएमएस आणि इमेल येत असतात की सारखे. ईसीएसचा पर्यायही आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 06/19/2016 - 09:35 नवीन
विमा कंपन्यांच्या दृष्टीकोनातून हा "इझी मनी" आहे. बाजारात पत आणि विमा नियंत्रण आणि विकास मंडळाकडून (IRDA) विमा व्यवसायाचा परवाना मिळवण्याची क्षमता असली की झालं. त्यामुळे तुमचा हप्ता चुकणार नाही याची पुरेपुर काळजी विमा कंपन्या घेत असतात. काही हप्ते चुकले आणि विमापत्र बाद झाले तरीही दंडाची काही रक्कम आकारुन ते पुनर्जिवित (revival of policy) करण्याची सुविधा विमा कंपन्या देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सामान्य वाचक Sun, 06/19/2016 - 09:29 नवीन
रिकरिंग काढणे म्हणजे एक रकमी पैसे हातात येतात किंवा मुदत ठेव करणे जी mature होईल आपल्या हपत्या च्या वेळेस कॅलेंडर वर हपत्या च्या तारखा लिहून ठेवणे। 2 वेळा म्हणजे समजा तुम्हाला पैसे 10मे ला भरायचे आहेत। तर 8 9 मे ला नोंद कराच आणि 10 एप्रिल ला पण लिहून ठेवा अर्थात आता वेगवेगल्या सायटी वर आणि मोबाईल वर रिमाईंडर लावता येतातच कर्ज चा दर महिन्याचा हप्ता असेल तर कायम 1 हप्तया एव्हडी अतिरिक्त रक्कम खात्यात कायम राहू द्या
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/20/2016 - 05:22 नवीन
मोबाईलवर हप्त्याचा दिवसाचा आणि त्या अगोदरच्या एक आठवड्याचा व एक महिन्याचा रिमाईंडर लावा. हप्त्याच्या पैशांची तरतूद ऐनवेळी करणार असलात तर त्यासाठी लागणार्‍या मुदतीच्या आधीचा रिमाईंडर लावा. हाकानाका.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा