Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंग्लंड भटकंती - डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव

अ
अभिजीत अवलिया
Sun, 06/19/2016 - 15:51
💬 21
मी गेल्या वर्षी पूल, इंग्लंड येथे काही महिने होतो. तेव्हा पूल पासून जवळच डर्डल डोअर हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे असे समजले. मग असेच एका दिवशी तिकडे जायला निघालो. पूल वरून वूल ला जाणारी ट्रेन पकडली. पूल वरून वूलला जायला फक्त १८-२० मिनिटे लागतात ट्रेनने. वूल स्टेशनच्या बाहेरून taxi मिळते डर्डल डोअरला जायला. तिने अवघ्या १५ मिनिटात डर्डल डोअर जवळ पोचलो. जिथे taxi सोडते तिथेच एक हॉटेल आहे जिथे राहण्याची आणी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. बरीच लोक कॅराव्हान घेऊन आली होती आणी त्या कॅराव्हान मधेच राहत होती. त्या हॉटेल पासून अंदाजे 10 मिनिटाची पायवाट आहे डर्डल डोअर पर्यंत पोचायला. डर्डल डोअर हे चूनखडीने बनलेले नैसर्गिक ठिकाण आहे. ज्युरासिक कोस्टचा एक भाग तसाच समुद्रात गेलेला आहे आणी त्याला मध्ये एक छिद्र तयार झाले आहे समुद्राच्या पाण्यामुळे. प्रत्यक्षात ही जागा खाजगी मालकीची आहे; तरी सर्वाना तिथे जायला परवानगी आहे. taxi जिथे सोडते तिथून एक तीव्र उतार आहे डर्डल डोअरला जायला. taxi stand पासून डर्डल डोअरकडे जाणारी पायवाट.  ही पायवाट एका ठिकाणी संपते आणी तिथून पुढे थोड्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला सरळ डर्डल डोअरच्या समोर घेऊन जातात. वरून काढलेले काही फोटो.    डर्डल डोअरचे काही फोटो खाली जावून एकदम जवळून काढलेले.    समुद्राचे पाणी खूपच थंड असल्याने पाण्यात जाण्याची हिम्मत झाली नाही. जवळपास २ तास तिथे राहिलो आणी मग पुन्हा पायऱ्या चढून वर आलो. ज्या पायवाटेने डर्डल डोअरला आलो होतो तिने चालत चालत लुल्वर्थ कोवला जायला निघालो. हे अंतर अंदाजे २ की.मी आहे. पूर्ण पायवाट समुद्राच्या कडेने जाते. एका बाजूला अथांग समुद्र आणी दुसऱ्या बाजूला सुंदर हिरवळ.    लुल्वर्थ कोवच्या अगोदर एक सुंदर डोंगर दिसला समुद्रात. त्याचा फोटो.  लुल्वर्थ कोव म्हणजे नैसर्गिक रित्या तयार झालेले एक वर्तुळ म्हणू शकतो. तुम्ही अगदी कोवच्या मुखाशी जावू शकता. पण मुखाशी जाण्यापेक्षा डोंगरावरूनच फार सुंदर दिसते हे ठिकाण. इथे काही हॉटेल्स आहेत आणी बाथरूमची सोय आहे. लुल्वर्थ कोवचे काही फोटो.   तिथे काही लोकांची घरे देखील आहेत. इतक्या सुंदर ठिकाणी रहायला मिळत असल्याचा हेवा वाटला.  मग तिथे काही वेळ घालवला नी परत पूलला आलो. अतिशय सुंदर जागा आहेत दोन्हीही. किमान एकदा तरी भेट द्याव्यात अश्या.
  • इंग्लंड भटकंती - भाग 2 - स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी
  • माझ्या मना....
  • इंग्लंड भटकंती - भाग ३ - गर्नसे आयलंड
  • इंग्लंड भटकंती भाग ४ - लंडन
  • इंग्लंड भटकंती भाग ५ - पूल
  • इंग्लंड भटकंती भाग ६ - पूल बाईक शो आणी मूर्स व्हॅली

Book traversal links for इंग्लंड भटकंती - डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव

  • इंग्लंड भटकंती - भाग 2 - स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी ›

प्रतिक्रिया द्या
16740 वाचन

💬 प्रतिसाद (21)
प
पद्मावति Sun, 06/19/2016 - 17:35 नवीन
वाह! अप्रतिम.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 06/19/2016 - 19:07 नवीन
चहा आणि मारी! जबरदस्त जागा!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 06/20/2016 - 04:08 नवीन
भारीये
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 06/20/2016 - 06:02 नवीन
निसर्गाचे स्वर्गीय सौंदर्य अनुभवले आहे तुम्ही. दोन - अडीच वर्षांंपूर्वी हे ठिकाण बिंगच्या होमपेजवर पाहिले तेव्हापासून आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी जायचे असा निश्चय केला आहे. हा अनुभव आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल खूप आभार.
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 06/20/2016 - 07:27 नवीन
फोटो पाहिल्यापासून हे ठिकाण places to visit before you die मध्ये टाकलेले आहे! छान फोटो आणि माहिती.पूल आणि वूल मजेशीर आहे!
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 06/20/2016 - 09:10 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
प
पक्षी Mon, 06/20/2016 - 09:50 नवीन
अतिशय छान आणि नेटकं वर्णन. अतिशय सुंदर जागा
  • Log in or register to post comments
म
मेघना मन्दार Mon, 06/20/2016 - 10:51 नवीन
आमच्या लंडन वारीला इथे जायची इच्छा खूप होती पण वेळे अभावी नाही जाता आल इथे. पुढच्या ट्रिप च्या वेळी नक्की जाणार . फोटो खूप सुंदर !!
  • Log in or register to post comments
ज
जुइ Mon, 06/20/2016 - 17:40 नवीन
दोन्ही ठिकाणे अतिशय सुंदर आहेत. एकदा तरी जायलाच हवे येथे.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 06/20/2016 - 18:06 नवीन
वाह ! पारणं फिटलं डोळ्याचं !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 06/20/2016 - 19:12 नवीन
अतिशय सुंदर छायाचित्रं आहेत.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Mon, 06/20/2016 - 19:12 नवीन
आकाशाची निळाई अप्रतिम टिपली आहे. डर्डल डोअर चा आकार बघुन मला हत्ती च्या सोंडेचा भास झाला. अशक्य सुंदर जागा आहेत
  • Log in or register to post comments
ब
बंड्याभाय Tue, 07/05/2016 - 00:05 नवीन
फारच सुंदर जागा आहे, फोटोज़ सुद्धा मस्त आलेत.
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय Tue, 07/05/2016 - 10:42 नवीन
अतिशय छान फोटो आणि व्रुत्तांत!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/05/2016 - 15:20 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
व
विद्यार्थी Tue, 07/05/2016 - 16:29 नवीन
लै भारी!!!
  • Log in or register to post comments
भ
भम्पक Wed, 07/06/2016 - 09:46 नवीन
सुरेख ठिकाण. एक विनंती....जर आपण तेथेच असाल तर कृपया एखाद्या टुमदार घराचा आतून बाहेरून फोटो पाठवू शकाल का..?
  • Log in or register to post comments
म
महामाया Wed, 07/06/2016 - 22:48 नवीन
सुंदर आहेत जागा...
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 07/06/2016 - 22:55 नवीन
स्वर्गच आहे जणू
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 09/13/2016 - 22:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
नया है वह Tue, 10/10/2017 - 14:54 नवीन
..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा