दु:खः कारण आणि निवारण उपाय - भारतीय तत्वज्ञानाच्या नजरेतून
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥
- मनाचे श्लोक
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करुं कोणत्या गोष्टीचा । पति लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही ॥३॥
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे । कौतुक तूं पाहे संचिताचें ॥४॥
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपें त्याचा नाश झाला ॥५॥
संत एकनाथ महाराज हरिपाठ - अभंग २३ वा
💬 प्रतिसाद
(24)
र
रातराणी
Tue, 06/21/2016 - 06:54
नवीन
अरेच्या चुकून प्रकाशित झालं का?
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 06/21/2016 - 06:57
नवीन
आणखी विस्तृत विवेचन अपेक्षित होतं. चुकून अर्धवट वगैरे प्रकाशित झालाय का?
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Tue, 06/21/2016 - 07:00
नवीन
अगदी अगदी!
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 06/21/2016 - 07:26
नवीन
इ स्माॅल दुखंनिवारक जिलबि
- Log in or register to post comments
प
प्रभास
Wed, 06/22/2016 - 10:44
नवीन
=))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 06/21/2016 - 07:44
नवीन
देहाभिमान कर्माभिमान | जात्याभिमान कुळाभिमान |
ज्ञानाभिमान मोक्षाभिमान | या नांव भ्रम ||
मी तूं हा भ्रम | उपासनाहि भ्रम |
ईश्वरभाव हाहिं भ्रम | निश्चयेंशी ||
भ्रमरूप विश्व स्वभावें | तेथें काय म्हणोन सांगावें |
निर्गुण ब्रह्मावेगळें अवघें | भ्रमरूप ||
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Tue, 06/21/2016 - 15:56
नवीन
बोला , पुंडलीक वरदा , हरी विठ्ठ्ल ! !
- Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे
Tue, 06/21/2016 - 16:03
नवीन
भावनिक/मानसिक आधारासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 06/21/2016 - 16:21
नवीन
आदरणीय गावडे सर,
स.न.वि.वि.
आजकाल तुमची जरा काळजीच वाटायला लागली आहे , कसे आहात आपण , बरे आहात ना ?
बाकी तुमच्या ह्या अभंगांवरुन आम्हाला तुकोबांचा अभंग आठवला :-
ह्या पेक्षा सोप्प्या शब्दात आणी इतक्या प्रांजळपणे "दु:खः कारण आणि निवारण उपाय - भारतीय तत्वज्ञानाच्या नजरेतून " अन्य कोणी स्वानुभवातुन सांगितलेला माझ्या तरी पाहण्यात नाही.
असो. येता का यंदाच्या आषाढी वारीला ? तुम्ही तंबोरा घ्या , मी टाळ कुटतो , प्रचेतस सरांना ढोलकी मृदुंग वाजवायला देवु .
कळावे . लोभ असावा.
आपला विनम्र
सीझर मार्कस ऑरेलियस अॅन्टोनियस ऑगस्टस्
Vi Veri Veniversum Vivus Vici
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/21/2016 - 18:06
नवीन
>> आजकाल तुमची जरा काळजीच वाटायला लागली आहे , कसे आहात आपण , बरे आहात ना ?
=))
विकांताला "एका जनार्दनी अर्थात मनाचे आरोग्य" नावाचे पुस्तक विकत घेतले. मनाच्या आरोग्यविषयी त्यात काहीच नव्हते. निव्वळ साम्प्रदायिक पुस्तक. त्या पुस्तकात "एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा" या अभंगाचा संदर्भ सापडला.
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Wed, 06/22/2016 - 08:01
नवीन
आपणास पुस्तकातला मुद्दा समजलेला नाही.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 06/22/2016 - 08:51
नवीन
शक्यता आहे. आम्ही काही रंगांचे आकलन असलेले प्रवचनकार नाही.
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Wed, 06/22/2016 - 10:30
नवीन
हं!
- Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा
Wed, 06/22/2016 - 05:46
नवीन
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 06/21/2016 - 17:55
नवीन
जेसै ज्याचे कर्म तैसै,
फळ देई सु ईश्वर..
-गायक बहुदा आनंद शिंदे..
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/21/2016 - 18:02
नवीन
>> गायक बहुदा आनंद शिंदे.
प्रल्हाद शिंदे. आनंद शिंदेंचे वडील.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 06/21/2016 - 18:14
नवीन
करेक्ट.
बराच काळ लोटला त्यांची गाणी ऐकुन.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 06/21/2016 - 18:51
नवीन
तुमची एक खरड वाचली कुठेतरी" चांगले लेख कसे टाकावेत?" मार्गदर्शन करावे.त्या गुरुने फारच चांगले सोपे करून सांगितलेले आहे.प्रचिती आली.
#पण एक सांगा - हे ,अभंग ,ओव्या,चरण,श्लोक पाठ आहेत का?कमाल आहे.
- Log in or register to post comments
भ
भरत्_पलुसकर
Tue, 06/21/2016 - 20:00
नवीन
दुःख निवारणार्थ आम्ही हे ऐकतो
जिंदगी के सफर में
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Tue, 06/21/2016 - 23:30
नवीन
फार अपेक्षेने धागा उघडला होता! थोडी निराशाच पदरी पडली! :(
असो, पुलेशु!
Sandy
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/21/2016 - 23:56
नवीन
काही काळजी करु नका
सग्गळ्ळं चांगलं होइल...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/22/2016 - 05:11
नवीन
मला वाटलं दुःखाच्या कारणावर मोठा लेख असेल ? सकाळी सकाळी अपेक्षाभंग झाला.
१) दुःख आहे. २) दुःखाला कारण आहे ३) दुःख दूर करता येतात ४) दुःख दूर करण्याचे उपाय.
या बाबतीत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान मला अधिक वास्तव आणि पटनारे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
राजा मनाचा
Wed, 06/22/2016 - 07:49
नवीन
सद्यपरिस्थितीबद्दल दु:ख करणे आणि आगामी अनिवार्य वाईट स्थितीची काळजी करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण कोणत्या विषयावर बोलत आहोत?
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Wed, 06/22/2016 - 10:36
नवीन
सगाजी,
या आठ ओळीत दु:खाची कारणे आणि निवारण या बद्दल भारतीय तत्वज्ञान संपते असे तुम्हाला म्हणायचे नाही असे वाटते, बहुदा ही सुरुवात असावी.
मुळात बरीचशी तत्वज्ञाने परोपकार या तत्वावर आधारित असतात, त्यामुळे कुणाला तरी काहीतरी दु:ख असणे ही दुस-या कुणाच्यातरी मोक्षप्राप्तीची पायरी असते.
मला माहित असलेल्या पैकी ' सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया' आणि 'जो जे वांछिल तो ते लाहो' अशा एक दोन रचनाच सर्वांच्या सुखाचा विचार करतात, बाकी ' पीड परायी जाने रे,' या मार्गाने जाणारेच असतात.
- Log in or register to post comments