काथ्याकूट

६ ओळीत बाबुजी

Primary tabs

माझ्या मामांनी म्हणजे श्री.अशोक गोडबोले ह्यांनी केलेली कविता.
प्रत्येक ओळीचे पहिले अक्शर जोडले की सुधीर फडके हे नाव बनते.

सुरात सात गात गात विहरला जगी विहंग
धीर रंगवी रणात जीवनसमिधा अभंग
रसपावन रामकथागान करी अजरामर
फलमंगल यशयुत नवजीवन हो शिवसुंदर
डमरू वाजे दिगंत विजयाचे सामगान
केवळ मम शब्दचि रे तव मधुरालाप तान

मंदार

विसोबा खेचर

सुंदर काव्य!

गोडबोले मास्तर हेदेखील मिपाचे सभासद आहेत! :)

तात्या.

राघव

वाहवा..सुंदर कविता!
गोडबोले काकांस आमच्या शुभेच्छा नक्की कळवा. :)
मुमुक्षु

मदनबाण

फारच सुरेख कविता..

>>>>> मदनबाण

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

केशवराव

मंदार,
आमच्या गोडबोले सरांचे अतिशय सुंदर काव्य तू ईथे दिलेस. खुपच छान!