ब्रेक्झीट !! लॉर्ड.. वाचव रे बाबा राणिसाहेबांना.
सर्वप्रथम अहत् क्लिण्टन (उर्फ मिल्टन) तहत् म्हात्रेसाहेबांची माफी मागतो, कि हा काथ्याकूट त्यांच्याकडुन येण्याऐवजी असा अर्धवट प्रसवला जातोय. ब्रेक्झीटची चर्चा इतरत्र होतेय का मिपावर?? सॉरी, माझ्या बघण्यात तरी नाहि आलं. याविषयाची लांबी-रुंदी-खोली अमाप आहे आहे याची कल्पना आहे, पण विषय बोर्डावर मांडावा लागतोय... आयला सेस्नेक्स हजारानी झोपला ना राव. अर्थात, रिकव्हर होईल म्हणा. किंबहुना त्यातुन फायदा कसा करुन घ्यावा हा हि एक महत्वाचा विषय आहेच.
तर आपण बघितलच कि साहेबांच्या देशाने काहिश्या अनपेक्षीतपणे युरोपीय महासंघातुन बाहेर पडण्याच्या बाजुने कौल दिला आहे. आता अनेक प्रश्न उपस्थीत होतात...
१) प्रथमतः मला हेच कळलं नाहि कि असं सार्वमत घ्यायच्या भानगडीत का पडला साहेब? सरकार इतकं अगतीक का झालं होतं कि त्यांना निर्णय घेता येत नव्हता? आपल्या लोकांच्या सर्वंकष बुद्धीचा एव्हढा भरवसा वाटावा ब्रिटीश सरकारला?
२) मुख्यतः निर्वासीतांच्या प्रश्नावर हि भानगड उद्भवली म्हणतात. निर्वासीतांचा प्रश्न एव्हढा गंभीर झालाय का कि ब्रिटनने युरोपशी नाळ तोडावी ?
३) यात मुझ्य फायदा कुणाचा? कुठलं थर्ड पार्टी राजकारणाचं पदर आहे का या मागे?
४) परतीचे सर्व दोर कापले गेले आहेत का? कि काहि चान्स आहे जैसे थे राहायचा?
५) एकुणच जगावर, भारतावर, मुख्य म्हणजे मिपावर काय परिणाम होणार याचा?
सुचेल तसं टंकलं आहे. काहि बहुमोल माहिती हाती लागेल हि खात्री आहेच.
जय हो.
हो. जर्मनीत निर्वासितांच्या नावाखाली घुसखोर घुसलेत. ते जे बलात्कार करताहेत त्या बातम्यांनी इथली माध्यमे जरी ओसंडून वाहात नसली तरी त्याविरुद्ध जनमत बरंच प्रक्षुब्ध आहे. यु.म. मध्ये ब्रिटन राहिल्यास हीच वेळ आपल्यावरही येऊ शकेल अशी चिंता इथे भेडसावते आहे."मॉर्केल बाईंना पण ह्याचा फटका,बसण्याबद्दल बरच वाचलं होतं, विशेषतः न्यु ईयर ईव्ह नंतर.