Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गझल - आणि हा खेळ झाला

व — वेल्लाभट, Mon, 06/27/2016 - 07:54
जरा हासलो आणि हा खेळ झाला तुझा भासलो आणि हा खेळ झाला तसा संयमी नित्य मी राहणारा जरा त्रासलो आणि हा खेळ झाला मला वाटले वेळ आलीच होती तरी वाचलो आणि हा खेळ झाला मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला जरा शेवटी हात जोडावयाला उभा ठाकलो आणि हा खेळ झाला अता थांबता येत नाही अपूर्व जरा धावलो आणि हा खेळ झाला - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
4296 वाचन

💬 प्रतिसाद (20)
न
निश Wed, 06/29/2016 - 14:02 नवीन
मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला .....ह्या ओळि एकदम मस्त...
  • Log in or register to post comments
P
pj Wed, 06/29/2016 - 22:07 नवीन
प्रत्येक शेर जमलाय!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 06/30/2016 - 07:56 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 06/30/2016 - 09:26 नवीन
सर्वांना धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/30/2016 - 19:46 नवीन
नेहेमीप्रमाणेच आमची पोचपावती.... जरा हासलो आणि हा घोळ झाला 'तिचा' भासलो आणि हा घोळ झाला! नसे संयमी नित्य मी चापणारा जरा ग्यासलो आणि हा घोळ झाला! रमा बोलता वेळ झाली भिशीची उगा नाचलो आणि हा घोळ झाला! सुरा सोडणे मान्य होते तरीही पुन्हा प्यायलो आणि हा घोळ झाला! असे तातडी, नाडि सोडावयाला उभा ठाकलो आणि 'हा घोळ' झाला! कवी तिंबती आज 'रंग्यास' जाली जरा चावलो आणि हा घोळ झाला! (घोळदार)रंगा
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/01/2016 - 04:04 नवीन
वावा जबर घोळ घातलात !वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पैसा Fri, 07/01/2016 - 06:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
वटवट Fri, 07/01/2016 - 06:37 नवीन
हाही घोळ मस्त जमलाय.... भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/01/2016 - 04:13 नवीन
वेल्लाभट आणि रंगासेठ दोघांच्याही रचना खासच. -दिलीप बिरुटे (गझलप्रेमी)
  • Log in or register to post comments
व
वटवट Fri, 07/01/2016 - 06:36 नवीन
प्रत्येक शेर मस्त जमलाय... व्वा
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 07/01/2016 - 12:09 नवीन
आणि पुढचा घोळ दोन्ही फर्मास.. घोळसलेला खेळाडु नाखु
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 07/01/2016 - 13:40 नवीन
गेमच झाला
  • Log in or register to post comments
प
पथिक Fri, 07/01/2016 - 14:29 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 07/02/2016 - 19:21 नवीन
छान गजल
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 07/03/2016 - 11:48 नवीन
छान आहे !!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 05/02/2017 - 22:18 नवीन
ज ब र द स्त! त्यातही...त्रासलो,वाचलो आणि वाकलो...गजब शेर! >>>मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला>>>पहिलीच ओळ कितीतरी पुरेशी आहे खरं तर आणि त्यात ही दुसरी!लाजवाब!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/03/2017 - 06:22 नवीन
सुंदर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Largo al factotum" [ The Barber of Seville ] Andre Rieu
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 05/03/2017 - 07:05 नवीन
आहाहा ! सुंदर !!!
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 05/03/2017 - 07:10 नवीन
वाह वाह!! सुरेख.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 05/03/2017 - 08:38 नवीन
अरे वा. इतके दिवसांनी या ग़ज़लेचा धागा वर आलेला बघून छान वाटलं. प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद. सत्यजित, मदनबाण, मितान, दशानन!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा