Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्मॉल इज ब्युटीफुल

म
मारवा
Mon, 06/27/2016 - 13:25
🗣 114 प्रतिसाद
पुर्ण लांबीच्या चित्रपटांची एक आपली मजा आहे. काही कथानक असे असते की त्याला तीन तासही अपुरे पडतात. हिन्दी चित्रपट साधारण २ ते अडिच तास कधी त्याहुन जास्त लांबीचे असतात. इंग्रजी चित्रपट सहसा त्याहुन कमी वेळ घेतात. तर अजुन एक चांगला फ़ॉर्म शॉर्ट फ़िल्म्स चा आहे. या फ़ारच लहान जास्तीत जास्त १५-२० मिनीटांच्याच. एकदम आटोपशीर मामला. म्हणजे २०-२० मॅचेस सारख्या शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट. फ़ारच कमी वेळ असल्याने दिग्दर्शका समोरील सर्जनशीलतेचे आव्हान अधिकच तीव्र होऊन जाते. त्याला प्रतिसाद देतांना एखादी कथा घटना इतक्या कमी वेळात बसवतांना शॉर्ट फ़िल्म्स च्या दिग्दर्शकाचा जाहीरातकारांसारखाच कस लागतो. जितका दिग्दर्शक कुशल, सर्जनशील, संवेदनशील तितका तो या शॉर्ट फ़िल्म मध्येही कधी कधी पुर्ण लांबीची तीन तासांची फ़िल्म देणार नाही असा एक झणझणीत अनुभव देतो. या शॉर्ट फ़िल्म पाहायला कंटाळा येत नाही कारण सहसा कमी वेळ असल्याने यांची वेगवान आणि इन्टेन्स हाताळणी असते . शॉर्ट फ़िल्म उलट पुर्ण एकाग्रतेने एका दमात बघितली व अनुभवली जाते. हीच शॉर्ट फ़िल्मस ची मजा असते. सहसा फ़िल्म इन्स्टीट्युट चे ताज्या दमाचे वि्द्यार्थी, , मोठ्या चित्रपटासाठी जे आर्थिक पाठबळ लागते ते उपलब्ध नसणारे, कधी काही अनुराग कश्यप सारखे दिग्गज आवडीने जाणीवपुर्वक , किंवा एखाद्या कॉज साठी कार्यकर्ते इ. सहसा सर्वसाधारणपणे शॉर्ट फ़िल्म्स बनवतात. सध्या इंटरनेटचा प्लॅटफ़ॉर्म सहज उपलब्ध असल्याने व तांत्रिक प्रगतीमुळे हव्या त्या विषयावर वेगाने कमी खर्चात शॉर्ट फ़िल्म बनवली जाते. व प्रसारीतही करता येते. तर अशा पैकी काही शॉर्ट फ़िल्म्स खरोखर अत्यंत दर्जेदार सुंदर व प्रगल्भ अशा आहेत. या धाग्याचा हेतु इतकाच की अशा शॉर्ट फ़िल्म्स इथे शेअर केल्या जाव्यात त्यावर चर्चा व्हावी लिंका पुरवाव्या जेणेकरुन एक या फ़ॉर्म ची मजा घेण्याची संधी वाढेल. विवीध भन्नाट शॉर्ट फ़िल्म्स एका ठीकाणी सापडायला चर्चायला जागा होइल म्हणून हा धागा प्रपंच. आपण कृपया आपल्याला आवडलेल्या शॉर्ट फ़िल्म्स विषयी इथे शॉर्ट मध्येच लिहावे ( थोड ही जास्त लिहील तर शॉर्ट फ़िल्मची मजाच संपुन जाइल म्हणुन ) तसेच जमल्यास लिंका द्याव्यात ही नम्र विनंती. सुरुवात मी करतो. खालील एकही फ़िल्म १५ मिनीटांपेक्षा जास्त नाही व सर्व यु ट्युब वर उपलब्ध आहेत. अगोदर बघितल्या नसतील तर एकबार जरुर आजमाईयेगा. १- Teaspoon -(हिन्दी) एक गृहीणी घरात ९० वर्षांचा. आजारी, अंथरुणाला खिळलेला सासरा ज्याची दिवसभर ती रोज सक्तीची सेवा करत राहते, व त्याने प्रचंड वैतागलेली असते, घरात मुलबाळ नाही नवरा कामावर गेला की सासरा सतत टक टक टक टक चमचा वाजवुन तिला बोलवत राहतो ( बोलता येत नाही ) व सारखा खायला मागत असतो. एक दिवस एक घटना घडते............ , अत्यंत प्रगल्भ अनेक अर्थ प्रश्न निर्माण करणारी फ़िल्म अनेक अवार्डने सम्मानित. गृहीणीचे काम केलेल्या अभिनेत्रीचा अद्वितीय अभिनय https://www.youtube.com/watch?v=ZmVPCnxN-1A २-Ahalya (बंगाली-इंग्रजी सबटायटल्स) सुजॉय घोषची ही थ्रीलर शॉर्ट फ़िल्म बंगालीत आहे मात्र सबटायटल इंग्रजीत व थोडे लक्षपुर्वक बघितल्याने अगदी सहज कळते भाषेचा काहीच अडथळा येत नाही. यात एक म्हातारा शिल्पकार त्याची तरुण सेक्सी बायको राधिका आपटे, घरी एक दिवस सकाळी एक इन्स्पेक्टर येतो , एक तरुण मॉडेल महीन्यापासुन बेपत्ता आहे त्याचा तपास करण्यासाठी.............. पुढे प्रचंड धक्कादायक कथा........ एक अक्षरही सांगितल तर मजा जाईल. निव्वळ जबर कथा जबर अभिनय. https://www.youtube.com/watch?v=Ff82XtV78xo ३-बायपास (मुक फ़िल्म) एक नवाजउद्दीन सिद्दीकी व त्याचा एक डेंजर मुका सहाय्यक, एक वाळवंटी वैराण प्रदेशात, मोठा दगड घेऊन एका कारवर नेम धरुन मारतो................ड्रायव्हर ठार.... हाच धंदा..........एक इन्स्पेक्टर इरफ़ान खान येतो....... पुर्ण फ़िल्म मध्ये संवाद शुन्य ..........हिल्स हॅव आइज सारख भयावह वातावरण..........गतिमान कथा .. पुढे काय होते ? अंगावर येणारी फ़िल्म https://www.youtube.com/watch?v=NCRBY9ss-58 ४-That day after every day (हिन्दी) अनुराग कश्यप दिग्दर्शीत. फ़िल्म... तिन सामान्य वर्कींग वुमेन... त्यातली एक राधिका आपटे..... कामावर जातांना मोहल्ल्यातल्या गुंडांचा भयंकर त्रास, छेडखानी...........जीना हराम.........नवरा इंटरेस्टींग कॅरेक्टर.... सुरुवातीला केवळ त्याचा आवाज व रटाळ डरपोक उपदेश ऐकु येत राहतो व वैतागलेली राधिका कामावर जाण्यास तयार होतेय....पुढे काही घटना घडते व मग शेवट बघण्यासारखाच.. जबर फ़िल्म महत्वाचा विषय वेगळीच हाताळणी व भारीच कलाटणी.. https://www.youtube.com/watch?v=U6sIlphLMFU ५-सॉल्ट अ‍ॅन्ड पीपर (हिन्दी) पुन्हा नवाजउद्दीन सिद्दीकी व तेजस्वीनी कोल्हापुरे ( ही पदमिनीची मुलगी असावी एक अंदाज ) तरुण मुलगी प्रेमात ठोकर खाल्लेली आहे व आत्महत्येसाठी फ़ासावर लटकायला निघालीय .......नवाज नेमका तेव्हाच घरात शिरतो......म्हणतो मला फ़ार भुक लागली होती दोन दिवसांचा उपाशी आहे....... मग पुढे थोडी प्रेडीक्टेबल होऊन जाते फ़िल्म तरी एकवार बघण्यासारखी https://www.youtube.com/watch?v=AQR6cB1DXzY ६- आय लव्ह यु टु (हिन्दी) एक प्रेमी स्वत:शी बोलतोय....स्वगत अंगावर येत आहे......इरादा नेक नाही....... मर्डर चा प्लॅन डोक्यात घोळतोय...... जबर सायकीक फ़िल्म......देखोगे तो जानोगे.... https://www.youtube.com/watch?v=ohNswbR3Rag ७- सेल्फ़ी (हिन्दी) या फ़िल्म विषयी खर म्हणजे काहीच सांगावस वाटत नाही तुम्ही बघा फ़क्त.......जबर एकदम https://www.youtube.com/watch?v=xfM9VubbfJc तर मित्रांनो आपल्या आवडत्या शॉर्ट फ़िल्स्म्स इथे शेअर कराव्यात ही पुन्हा एकदा विनंती.

प्रतिक्रिया द्या
41608 वाचन

💬 प्रतिसाद (114)
ज
जेपी Mon, 06/27/2016 - 13:37 नवीन
वाचनखुण साठवतो.. मस्त धागा.. प्रतिसादांच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 07/05/2016 - 18:07 नवीन
+७८६ वाचनखूण हा धागा खूप रात्रींची सोय करू शकतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Mon, 06/27/2016 - 13:41 नवीन
Ahalya बघितली आहे...फिल्म आणि राधिका....दोन्ही जब्राट ;) बाकी हा धागा फक्त भारतीय फिल्मसाठीच मर्यादित नका ठेउ
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 06/27/2016 - 13:52 नवीन
वाखुसा. अनाहितात पण शाॅर्ट फिल्मच्या धाग्यावर यातल्या काही फिल्म्सचा उल्लेख झालाय.त्यामुळे बघितल्या गेल्यात.अहल्या विशेष आवडली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 06/27/2016 - 13:54 नवीन
हुँ.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 06/27/2016 - 14:11 नवीन
शेवट अत्यन्त थरारक ... बाकीच्या त्याच पंक्तीत बसवल्याने तत्काळ पाहण्यात येतील
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 06/27/2016 - 14:14 नवीन
मनोज वाजपेयीची 'कृती' ही शॉर्ट फिल्म पाहिली. अवघ्या १८ मिनिटांत जी थरार, रहस्य आणि मनोव्यापारातील गुंतागूंत उभी केलीय त्याला तोड नाही. प्रचंड ताकदीची कथा,गुंतवून ठेवणारे संवाद आणि राधीका आपटे-मनोज वाजपेयी यांचा सटल अभिनय असा त्रिवेणी संगम आहे.. जरूर पहा.. युट्यूब वर आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 06/27/2016 - 16:45 नवीन
शिरिष कुंद्रूने नेपाळी शॉर्ट्फिल्मवरून चोरली आहे म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Tue, 06/28/2016 - 08:16 नवीन
बोंबला..!!! काही तरी ओरीजिनल सुचतं की नाही या लोकांना? पण भारी आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ट
टवाळ कार्टा Tue, 06/28/2016 - 09:02 नवीन
कृती बघितली...इतकी काही खास वाटली नाही...हिरवीणीच भारीयेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
महासंग्राम Mon, 06/27/2016 - 14:32 नवीन
PS ही सुद्धा एक सुंदर शॉर्ट फिल्म आहे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 06/27/2016 - 16:01 नवीन
अगदी मोजक्या शब्दांत बोलायच झाल तर काय सांगाल या फिल्म विषयी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Tue, 06/28/2016 - 06:20 नवीन
प्रत्येक नात्यामध्ये काळजी हवीच पण त्याचा अतिरेक नको, नवरा बायकोच्या नात्याच्या पदर उलगडणारी शॉर्ट फिल्म आहे ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Mon, 06/27/2016 - 16:01 नवीन
अगदी मोजक्या शब्दांत बोलायच झाल तर काय सांगाल या फिल्म विषयी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
मारवा Mon, 06/27/2016 - 16:13 नवीन
अगदी मोजक्या शब्दांत बोलायच झाल तर काय सांगाल या फिल्म विषयी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
उ
उल्का Mon, 06/27/2016 - 14:35 नवीन
मी शॉर्ट फिल्म बघायला सुरुवात केली ती ह्या फिल्मने. Afterglow' ह्या फिल्मची सुरुवात होते ती ह्या वाक्याने - “Let my thoughts come to you, when I am gone, like the afterglow of sunset at the margin of starry silence.” ― Rabindranath Tagore थोडी गंभीर आहे. पारसी कुटुंब आहे. त्यामुळे बघायला आणि पारसी थाटातील संवाद ऐकायला मस्त वाटतं. ***************************************************** मला अतिशय आवडली ती ही फिल्म. Dum Dum Deega Deega ही फिल्म नक्की बघा. अतिशय सुन्दर अभिनय केलाय ह्या छोट्या अज्जूने. ****************************************************** अजुन बर्याच आहेत. इतर अनाहिता सांगतीलच. :)
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 06/27/2016 - 15:58 नवीन
नक्की बघतो या फिल्म्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का
म
मारवा Wed, 06/29/2016 - 06:27 नवीन
फार सुंदर आहे प्रचंड आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/29/2016 - 16:47 नवीन
विषय तितका टच करणारा वाटला नाही पण अज्जूचा अभिनय मात्र छान. आइस्क्रीम खाऊन निघतो तेव्हाची स्टाईल लैच आवडली. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का
प
पद्मावति Mon, 06/27/2016 - 14:43 नवीन
मस्तं धागा. वाचन खूण केली आहे.
  • Log in or register to post comments
र
रायगड Mon, 11/28/2016 - 19:33 नवीन
वाचनखुण कशी करायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
म
मराठी कथालेखक Mon, 06/27/2016 - 14:46 नवीन
एकूणातच शॉर्टफिल्म्स मध्ये "राधिका आपटे" बरीच फॉर्मात दिसतेय तर. मला तिचा अभिनय्, आवाज आणि संवाद बोलण्याची शैली आवडते. निदान तिच्या फिल्म्स तरी नक्की पाहीनच
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 06/27/2016 - 16:24 नवीन
मारवाजी, 'कृती' नक्की पहा.. भारीये
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 06/29/2016 - 15:16 नवीन
एकदम ए वन आहे. धन्यवाद सुचवणीसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा गुरुवार, 06/30/2016 - 14:13 नवीन
दुर्दैवाने ही चोरी निघाली. आधी आवडलेली खूप परंतू चोरी आहे हे कळल्यापासून नाही चांगली वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सुधीर Mon, 07/04/2016 - 21:44 नवीन
कुंदरची प्रेस कॉन्फरन्स https://m.youtube.com/watch?v=P159ywwrIfk आणि बॉबच्या दिग्दर्शकाची पोस्ट https://m.facebook.com/aneel.neupane/posts/1211237398900193 सगळ्या फिल्म नाही पाहता आल्या पण पहिल्या दोन आवडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
मारवा Mon, 06/27/2016 - 16:26 नवीन
१- नयनताराज नेकलेस कोंकणा सेन आणि तिलोत्तमा शोम अभिनीत जयदीप सरकार दिग्दर्शीत अप्रतिम फिल्म जयदीप ची कॉमेंट बोलकी आहे “I wanted to make something about the world we live in, where we see lives on hoardings and the life which is promised to us by the malls and the glamour of the promised life. And it’s about the journey that we’ve made to get there and to be able to afford that lifestyle,” he said. https://www.youtube.com/watch?v=L1TTNOBbN2k २-अंबानी द इन्व्हेस्टर फक्त एक्स्ट्राऑर्डीनरी स्टोरी आहे एक लहान मुलगा काय शिकतो काय करतो त्याची याहुन जास्त सांगु शकत नाही. https://www.youtube.com/watch?v=DubdqpkKsPA
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 06/27/2016 - 17:15 नवीन
एक वेगळाच अनुभव मिपाकराना देण्यासाठी हा धागा जरूर उपयुक्त ठरेल. चित्रपटाचा खरा आत्मा त्याची कथा हीच असते. बाकी पटकथा दिगदर्शन संवाद हे आलेच पंण मूळ कथा महत्वाची त्यामुळे कादंबरी या बरोबरच लघुकथा यानाही वेगळे स्थान साहित्यात आहे. नाटकांइतकेच एकांकिकाना ही आहे. तेच स्थान लघुचित्र पटाला आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/27/2016 - 17:53 नवीन
नुकताच अमाहितामध्ये हा विषय चालू केल्याने योगायोगाची गंमत वाटली. आफ्टरग्लो, केवडा चांगल्या आहेत. कुंडली, टीस्पून बर्‍या आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 06/27/2016 - 19:21 नवीन
तुम्ही लिस्ट केलेल्या सगळ्या पाहिल्यात शेवटच्या ३ सोडुन. टी स्पून नुकतीच पाहिली आणि आवडली. परिणाम साधण्यासाठी थोडा बोल्ड धक्का दिलाय पण तो लाक्षणिक अर्थाने पाहिला तर पटतो. त्या अभिनेत्रीने डि डे मध्ये पण सुरेख काम केलंय. ही अभिनेत्री, राधिका आपटे, निमरत कौर या मला वाटतं अंडरस्टेटेड रत्नं आहेत. बाकी अनाहितामध्ये पण चांगलं कलेक्शन झालंय. टाकु आम्ही ते इथे ही हळुहळु.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 06/27/2016 - 19:22 नवीन
बादवे , त्या अभिनेत्रीचं नाव श्रीस्वरा ( सौजन्यः गुगल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
क
किसन शिंदे Mon, 06/27/2016 - 19:55 नवीन
या सगळ्या शाॅर्टफिल्म पाह्यल्यात. छान आहेत, अगदी काल परवा आलेली कृती ही शाॅर्टफिल्मही जबर आहे.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 06/27/2016 - 20:03 नवीन
क्रिती मला मनोज वाजपेयी च्या अभिनयासाठी आवडली. कथाबीज तसं याआधी अनेकदा आलेलं आहे. कौन आठवत असेल उर्मिला चा तर साधारण कल्पना येते काय असेल त्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/27/2016 - 20:20 नवीन
सेल्फी सोडल्या तर बाकीच्या पाहिल्या नव्हत्या. अधिकाधिक उत्तम शॉर्ट फिल्मच्या लिंका या धाग्यात बघायला मिळतील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 06/27/2016 - 22:14 नवीन
मस्त धागा.. मी यातले कुठलेच पाहिले नाहीत, त्यामुळे आता वेळ मिळाला कि पाहायला बरीच मोठी यादी मिळाली :-) आणखी एक - "द अदर पेअर"
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/28/2016 - 07:33 नवीन
क्लास स्टोरी आहे, त्या पोराने भारी अभिनय केलं आहे. आणि कथेने माणूस अधिक हळवा होऊ शकतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
स
स्मिता_१३ गुरुवार, 06/30/2016 - 12:51 नवीन
द अदर पेअर पाहिली आत्ताच. अतिशय सुरेख !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
न
निओ१ Mon, 11/28/2016 - 20:13 नवीन
एक ही वाक्य नसलेली पण आशयाने भरपूर अशी ही फिल्म मला भावली खूप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
ब
बोका-ए-आझम Tue, 06/28/2016 - 04:25 नवीन
किंवा वृत्तचित्र हाही एक जबरदस्त प्रकार आहे. उडता पंजाबच्या चलत मुसाफिर यांनी काढलेल्या धाग्यावर पंजाबमधल्या ड्रग्जच्या प्रश्नावर असलेल्या एका documentary ची link रामदासकाकांनी दिलेली आहे. ती छान आणि अंगावर येणारी documentary आहे. बाकी आवडलेल्या documentaries च्या links देतो इथेच.
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 06/28/2016 - 07:18 नवीन
डॉक्युमेंटरीज पण इंटरेस्टीं असतात कधी कधी सिनेमापेक्षा जास्त रोमांचक असतात. तुम्ही ही विलक्षण डॉक्युमेंटरी बघितली का ? https://www.youtube.com/watch?v=jqxENMKaeCU https://en.wikipedia.org/wiki/Home_(2009_film)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
महासंग्राम Tue, 06/28/2016 - 06:23 नवीन
mitid या लिंक वर उत्तमोत्तम शॉर्ट फिल्म पाहता येतात. मराठी मधल्या आहेत बहुतेक पण सुंदर आहेत .
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 06/28/2016 - 07:55 नवीन
भयंकर आहे अंगावर काटा येतो. दिग्दर्शक अनुराग कश्यपचा गुरु असावा असे वाटते. भयंकर. सेल्फि सुद्धा जबरदस्त. मराठीतली केवडा पण मस्त. अहल्या आणि That day after every day या तर नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या आहेत.
  • Log in or register to post comments
उ
उदय के'सागर Tue, 06/28/2016 - 08:06 नवीन
पुन्हा नवाजउद्दीन सिद्दीकी व तेजस्वीनी कोल्हापुरे ( ही पदमिनीची मुलगी असावी एक अंदाज )
तेजस्विनी ही पदमिनीची बहिण आहे.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 06/28/2016 - 08:10 नवीन
जबरदस्त लेख आणि धागा! या सगळ्या शॉर्ट फिल्म्स नक्कीच बघणार. मारवाजी - हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद! अशी एकत्रित स्वरूपात दर्जेदार शॉर्ट फिल्म्सविषयी माहिती क्वचित मिळते आणि त्यामुळे हे प्रभावी माध्यम थोडे दुर्लक्षितच राहते. खरं म्हणजे अशा अनवट, प्रयोगात्मक, कल्पक माध्यमांची चर्चा करणारे आणि अशा माध्यमांना प्रसिद्धी मिळवून देणारे काहीतरी असायला हवे.
  • Log in or register to post comments
ब
बरखा Tue, 06/28/2016 - 08:51 नवीन
व्वा ! छान माहीती दिलित. मी क्र २ आणी ४ पाहील्या आहेत. खुप सुंदर आहेत. आता बाकीच्या पण बघेन.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 06/28/2016 - 10:28 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 06/28/2016 - 10:29 नवीन
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/29/2016 - 17:22 नवीन
फुटलो =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ज
जव्हेरगंज Tue, 06/28/2016 - 10:31 नवीन
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 06/28/2016 - 10:54 नवीन
माझी शनिवारची सकाळ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा