स्मॉल इज ब्युटीफुल
पुर्ण लांबीच्या चित्रपटांची एक आपली मजा आहे. काही कथानक असे असते की त्याला तीन तासही अपुरे पडतात. हिन्दी चित्रपट साधारण २ ते अडिच तास कधी त्याहुन जास्त लांबीचे असतात. इंग्रजी चित्रपट सहसा त्याहुन कमी वेळ घेतात. तर अजुन एक चांगला फ़ॉर्म शॉर्ट फ़िल्म्स चा आहे. या फ़ारच लहान जास्तीत जास्त १५-२० मिनीटांच्याच. एकदम आटोपशीर मामला. म्हणजे २०-२० मॅचेस सारख्या शॉर्ट अॅन्ड स्वीट. फ़ारच कमी वेळ असल्याने दिग्दर्शका समोरील सर्जनशीलतेचे आव्हान अधिकच तीव्र होऊन जाते. त्याला प्रतिसाद देतांना एखादी कथा घटना इतक्या कमी वेळात बसवतांना शॉर्ट फ़िल्म्स च्या दिग्दर्शकाचा जाहीरातकारांसारखाच कस लागतो. जितका दिग्दर्शक कुशल, सर्जनशील, संवेदनशील तितका तो या शॉर्ट फ़िल्म मध्येही कधी कधी पुर्ण लांबीची तीन तासांची फ़िल्म देणार नाही असा एक झणझणीत अनुभव देतो. या शॉर्ट फ़िल्म पाहायला कंटाळा येत नाही कारण सहसा कमी वेळ असल्याने यांची वेगवान आणि इन्टेन्स हाताळणी असते . शॉर्ट फ़िल्म उलट पुर्ण एकाग्रतेने एका दमात बघितली व अनुभवली जाते. हीच शॉर्ट फ़िल्मस ची मजा असते. सहसा फ़िल्म इन्स्टीट्युट चे ताज्या दमाचे वि्द्यार्थी, , मोठ्या चित्रपटासाठी जे आर्थिक पाठबळ लागते ते उपलब्ध नसणारे, कधी काही अनुराग कश्यप सारखे दिग्गज आवडीने जाणीवपुर्वक , किंवा एखाद्या कॉज साठी कार्यकर्ते इ. सहसा सर्वसाधारणपणे शॉर्ट फ़िल्म्स बनवतात. सध्या इंटरनेटचा प्लॅटफ़ॉर्म सहज उपलब्ध असल्याने व तांत्रिक प्रगतीमुळे हव्या त्या विषयावर वेगाने कमी खर्चात शॉर्ट फ़िल्म बनवली जाते. व प्रसारीतही करता येते.
तर अशा पैकी काही शॉर्ट फ़िल्म्स खरोखर अत्यंत दर्जेदार सुंदर व प्रगल्भ अशा आहेत. या धाग्याचा हेतु इतकाच की अशा शॉर्ट फ़िल्म्स इथे शेअर केल्या जाव्यात त्यावर चर्चा व्हावी लिंका पुरवाव्या जेणेकरुन एक या फ़ॉर्म ची मजा घेण्याची संधी वाढेल. विवीध भन्नाट शॉर्ट फ़िल्म्स एका ठीकाणी सापडायला चर्चायला जागा होइल म्हणून हा धागा प्रपंच.
आपण कृपया आपल्याला आवडलेल्या शॉर्ट फ़िल्म्स विषयी इथे शॉर्ट मध्येच लिहावे ( थोड ही जास्त लिहील तर शॉर्ट फ़िल्मची मजाच संपुन जाइल म्हणुन ) तसेच जमल्यास लिंका द्याव्यात ही नम्र विनंती. सुरुवात मी करतो. खालील एकही फ़िल्म १५ मिनीटांपेक्षा जास्त नाही व सर्व यु ट्युब वर उपलब्ध आहेत. अगोदर बघितल्या नसतील तर एकबार जरुर आजमाईयेगा.
१- Teaspoon -(हिन्दी)
एक गृहीणी घरात ९० वर्षांचा. आजारी, अंथरुणाला खिळलेला सासरा ज्याची दिवसभर ती रोज सक्तीची सेवा करत राहते, व त्याने प्रचंड वैतागलेली असते, घरात मुलबाळ नाही नवरा कामावर गेला की सासरा सतत टक टक टक टक चमचा वाजवुन तिला बोलवत राहतो ( बोलता येत नाही ) व सारखा खायला मागत असतो. एक दिवस एक घटना घडते............ , अत्यंत प्रगल्भ अनेक अर्थ प्रश्न निर्माण करणारी फ़िल्म अनेक अवार्डने सम्मानित. गृहीणीचे काम केलेल्या अभिनेत्रीचा अद्वितीय अभिनय
https://www.youtube.com/watch?v=ZmVPCnxN-1A
२-Ahalya (बंगाली-इंग्रजी सबटायटल्स)
सुजॉय घोषची ही थ्रीलर शॉर्ट फ़िल्म बंगालीत आहे मात्र सबटायटल इंग्रजीत व थोडे लक्षपुर्वक बघितल्याने अगदी सहज कळते भाषेचा काहीच अडथळा येत नाही. यात एक म्हातारा शिल्पकार त्याची तरुण सेक्सी बायको राधिका आपटे, घरी एक दिवस सकाळी एक इन्स्पेक्टर येतो , एक तरुण मॉडेल महीन्यापासुन बेपत्ता आहे त्याचा तपास करण्यासाठी..............
पुढे प्रचंड धक्कादायक कथा........ एक अक्षरही सांगितल तर मजा जाईल. निव्वळ जबर कथा जबर अभिनय.
https://www.youtube.com/watch?v=Ff82XtV78xo
३-बायपास (मुक फ़िल्म)
एक नवाजउद्दीन सिद्दीकी व त्याचा एक डेंजर मुका सहाय्यक, एक वाळवंटी वैराण प्रदेशात, मोठा दगड घेऊन एका कारवर नेम धरुन मारतो................ड्रायव्हर ठार.... हाच धंदा..........एक इन्स्पेक्टर इरफ़ान खान येतो....... पुर्ण फ़िल्म मध्ये संवाद शुन्य ..........हिल्स हॅव आइज सारख भयावह वातावरण..........गतिमान कथा .. पुढे काय होते ? अंगावर येणारी फ़िल्म
https://www.youtube.com/watch?v=NCRBY9ss-58
४-That day after every day (हिन्दी)
अनुराग कश्यप दिग्दर्शीत. फ़िल्म... तिन सामान्य वर्कींग वुमेन... त्यातली एक राधिका आपटे..... कामावर जातांना मोहल्ल्यातल्या गुंडांचा भयंकर त्रास, छेडखानी...........जीना हराम.........नवरा इंटरेस्टींग कॅरेक्टर.... सुरुवातीला केवळ त्याचा आवाज व रटाळ डरपोक उपदेश ऐकु येत राहतो व वैतागलेली राधिका कामावर जाण्यास तयार होतेय....पुढे काही घटना घडते व मग शेवट बघण्यासारखाच..
जबर फ़िल्म महत्वाचा विषय वेगळीच हाताळणी व भारीच कलाटणी..
https://www.youtube.com/watch?v=U6sIlphLMFU
५-सॉल्ट अॅन्ड पीपर (हिन्दी)
पुन्हा नवाजउद्दीन सिद्दीकी व तेजस्वीनी कोल्हापुरे ( ही पदमिनीची मुलगी असावी एक अंदाज ) तरुण मुलगी प्रेमात ठोकर खाल्लेली आहे व आत्महत्येसाठी फ़ासावर लटकायला निघालीय .......नवाज नेमका तेव्हाच घरात शिरतो......म्हणतो मला फ़ार भुक लागली होती दोन दिवसांचा उपाशी आहे....... मग पुढे थोडी प्रेडीक्टेबल होऊन जाते फ़िल्म तरी एकवार बघण्यासारखी
https://www.youtube.com/watch?v=AQR6cB1DXzY
६- आय लव्ह यु टु (हिन्दी)
एक प्रेमी स्वत:शी बोलतोय....स्वगत अंगावर येत आहे......इरादा नेक नाही....... मर्डर चा प्लॅन डोक्यात घोळतोय...... जबर सायकीक फ़िल्म......देखोगे तो जानोगे....
https://www.youtube.com/watch?v=ohNswbR3Rag
७- सेल्फ़ी (हिन्दी)
या फ़िल्म विषयी खर म्हणजे काहीच सांगावस वाटत नाही तुम्ही बघा फ़क्त.......जबर एकदम
https://www.youtube.com/watch?v=xfM9VubbfJc
तर मित्रांनो आपल्या आवडत्या शॉर्ट फ़िल्स्म्स इथे शेअर कराव्यात ही पुन्हा एकदा विनंती.
💬 प्रतिसाद
(114)
ज
जव्हेरगंज
Tue, 06/28/2016 - 10:32
नवीन
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 06/30/2016 - 20:31
नवीन
Explain please!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 07/01/2016 - 23:22
नवीन
मलापण नाही समजली !!
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 06/28/2016 - 10:33
नवीन
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 06/28/2016 - 10:36
नवीन
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 06/28/2016 - 10:51
नवीन
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/29/2016 - 17:14
नवीन
आरारा...लैच म्हन्जे लैच जब्रा =))
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 06/30/2016 - 19:50
नवीन
Ek number!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/30/2016 - 20:06
नवीन
बाब्बौ =))
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 07/17/2016 - 19:49
नवीन
जबराट!
- Log in or register to post comments
ज
जागु
Tue, 06/28/2016 - 10:56
नवीन
ऑफिसमध्ये व्हिडिओज बॅन आहेत. घरी गेल्यावर पहावे लागेल.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 06/28/2016 - 10:58
नवीन
1 minute time machine
The Black Hole
SPIN
- Log in or register to post comments
व
वटवट
Wed, 06/29/2016 - 06:31
नवीन
वाचनखुण साठवतो.. मी पण
- Log in or register to post comments
म
मारवा
Wed, 06/29/2016 - 06:34
नवीन
जव्हेरगंज धन्यवाद
एकेक साठवुन बघायला पाहीजेत
तुमच्याकडे मोठा स्टॉक दिसतोय.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Wed, 06/29/2016 - 08:13
नवीन
मारवा साहेब तुमची सॉल्ट अँड पेपरची लिन्क That day after every day हा लघुपट द्खावते आहे.
आणि जव्हेरगंज भाऊ तुम्हाला वन टाईम मशीन द्वारेच "क्लिक" ही कथा सुचली अगदी २०० % बरोबर ना.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Wed, 06/29/2016 - 09:59
नवीन
+२००००% बरोबर मालक!
इथे पण कबूल केलेच आहे म्हणा!!
:)
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Wed, 06/29/2016 - 08:14
नवीन
मारवा साहेब तुमची सॉल्ट अँड पेपरची लिन्क That day after every day हा लघुपट द्खावते आहे.
आणि जव्हेरगंज भाऊ तुम्हाला वन टाईम मशीन द्वारेच "क्लिक" ही कथा सुचली अगदी २०० % बरोबर ना.
- Log in or register to post comments
म
मारवा
Wed, 06/29/2016 - 10:17
नवीन
सॉल्ट अॅन्ड पीपर
https://www.youtube.com/watch?v=1nUAPIysIdE
- Log in or register to post comments
M
Maharani
Wed, 06/29/2016 - 13:30
नवीन
गुत्थी, द कॉलर या पण मस्त thriller फिल्म्स आहेत.
Gutthi madhe eka lekhakala navin pustakasathi kathabij milat nahiye.evadyat tyala roj daratla kachara uchalnarya mansacha vagna chamatkarik vatata.aani to tya kacharevalyala ghari bolavto...mag gappanmadhun vegalach kahi samor yeta.
The caller madhe eka mansala achanak dhamki che calls yayla lagtat.tyachyavar konitari २२४७ watch theun aasta....
Hi pan mast aahe short film
- Log in or register to post comments
म
मारवा
Wed, 06/29/2016 - 15:20
नवीन
लिंक इथे
https://www.youtube.com/watch?v=IuefGFDAChQ
तिथे इन्ट्रॉडक्शन मध्ये खालील माहीती वाचावयास मिळाली.
Gutthi ( The Riddle ) is a story about a night-long conversation between a writer, Anand Rajan, and a garbage collector, Khalil. A night that leads to shocking revelations and the unlocking of several mysteries in their lives. Anand Rajan, who is a noted writer, is suffering from writer's block, when he catches Khalil, the garbage collector going through his dustbin.He then invites Khalil over for a session of weed and what unfolds is something nobody will anticipate. ""
बघायलाच पाहीजे एकदा.
- Log in or register to post comments
M
Maharani
Wed, 06/29/2016 - 19:06
नवीन
हो हो.. हीच. छान आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/29/2016 - 20:22
नवीन
ट्विस्ट मस्तय
- Log in or register to post comments
प
प्रियाजी
Wed, 06/29/2016 - 14:34
नवीन
मारवासाहेब, खूप सुन्दर धागा. पहिल्या चार फिल्म पाहिलया. धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 06/29/2016 - 17:07
नवीन
वेगळाच धागा. वा.खु.सा.आहे. धन्यवाद.
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 06/29/2016 - 23:35
नवीन
क्रितीच्या चोरीबद्दलच्या बातम्या वाचताना आणखी वीस शॉर्ट फिल्मची एकत्रित माहिती मिळाली. त्यातल्या काही इथे आलेल्याच आहेत. ही लिंक.
- Log in or register to post comments
प
पुंबा
गुरुवार, 06/30/2016 - 12:25
नवीन
ह्या चोरट्यांना कही तरी शिक्षा व्हायला पाहीजे. असंच मोकळं सोडलं तर असाच दुसर्याच्या कलाक्रुतीवर डल्ला मारुन मलीदा खातील हे पैशेवाले चोर..
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 06/30/2016 - 13:25
नवीन
कुंद्रुची फिल्म युट्युबने काढली आहे असं वाचलं.
- Log in or register to post comments
प
पुंबा
गुरुवार, 06/30/2016 - 14:16
नवीन
यूट्यूबवरून काढली ते ठीकच परंतू कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्या मूळ सर्जकाला व्यवस्थीत श्रेय मिळेल असा माफीनामा त्या कुन्द्रूकडून घ्यावा.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 07/17/2016 - 19:38
नवीन
तसं असेल तर चांगली गोष्ट आहे!
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 06/30/2016 - 11:49
नवीन
That day after every day आणि सेल्फि पाह्यल्या. दोन्ही आवडल्या. सेल्फि फापटपसारा न मांडता बरंच काही बोलून जाते.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/30/2016 - 12:19
नवीन
ओळखीत बरेच जण असे आहेत ज्यांना सेल्फि दाखवली पाहिजे
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 07/05/2016 - 12:07
नवीन
अगदी, मी चेपुवर शेअर केली आहे.
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 07/06/2016 - 19:35
नवीन
मीपण केली. खरंच खूप छान आहे.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 06/30/2016 - 12:36
नवीन
माझिही एक भर, छोटीसी,
काही महिन्यांपूर्वी एक ओरिया शॉर्ट फिल्म पाहिली होती, चांगली कथा, उत्तम अभिनय,
अ रिव्हर फ्लोस, बहुदा झी तॉकिज वर ही दाखवली होती लाइटहाउस मधे,
एकदा तरी पहाच!
अनिरुद्ध....
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 06/30/2016 - 14:39
नवीन
लिंक दिलीत तर बर होइल आणि ओरीया आहे म्हणता पण इंग्रजी सबटायटल्स असतील ना ?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प्रभू
Sat, 07/02/2016 - 05:48
नवीन
खरतर हाच प्रोब्लेम झाला आहे कि ही शॉर्ट फिल्म जाला वर सापडतच नाही आहे, अजुन एक त्याला इंग्रजी सबटायटल्स आहेत. झी टॉकिझ च्या साइट वर आहे. पण प्ले होत नाही आहे,
लिन्कः http://www.zeetalkies.com/lighthouse/videos/light-house-episode-no-5-part-2.html
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
गुरुवार, 06/30/2016 - 13:07
नवीन
https://www.youtube.com/channel/UCWnTC8o8AycL6a2eRrKSdBg
पॉकेट फिल्म्स
https://www.youtube.com/channel/UClR_A7xZrwegrToYsmS5dtg
mitid films
या चॅनलवर से एक शॉर्ट फिल्म्स पहायला मिळतील
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 06/30/2016 - 13:46
नवीन
गितांजली राव दिग्दर्शीत "चाय" काहीशी वेगळी शॉर्टफिल्म फार आवडली
रीअलीस्टीक सिनेमॅटोग्राफी व मोनोलॉग्ज दोन्ही आवडलीत.
श्रीकांत रेड्डी ची पीके-२ पण भन्नाट मस्तच.
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 06/30/2016 - 14:36
नवीन
चाय
https://www.youtube.com/watch?v=bPfrBRm_3Kg
पी़के-२
https://www.youtube.com/watch?v=LHu3_CXEdJY
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
गुरुवार, 06/30/2016 - 15:42
नवीन
ठँक्यु बर्का
चांगला धागा आहे
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 06/30/2016 - 16:49
नवीन
सर्व सहभागी प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद !
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 07/01/2016 - 02:40
नवीन
काय भारी धागा! आता निवांत एकेक बघतो. मारवाजी, धन्यवाद.
एक सुचवणी: व्हिडीयो एम्बेड करणं टाळलं तर बरं होईल. पान 'जमायला' वेळ लागतोय.
- Log in or register to post comments
फ
फारएन्ड
Fri, 07/01/2016 - 05:28
नवीन
धन्यवाद या धाग्याबद्दल, अहल्या पाहिली होती आणि आवडली होती. इतरही पाहतो आता.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 07/01/2016 - 17:24
नवीन
जबरदस्त! इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!!
- Log in or register to post comments
M
mahayog
Fri, 07/01/2016 - 20:15
नवीन
खूपच छान धागा. शॉर्ट फिल्म हा प्रकार माहित होता पण आवर्जून कधी बघितला नव्हता. या धाग्यामुळे छान शॉर्टफिल्म बघता आल्या.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 07/02/2016 - 05:35
नवीन
धन्यवाद...
वाखूसा
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sun, 07/03/2016 - 06:08
नवीन
धागा जरी शॉर्ट फिल्म चा असला तरी इथल्या सगळ्या लिंका बघण्या साठी बराच वेळ काढावा लागणार आहे.
मिपावरच रमताराम यांनी परिचय करुन दिलेली एक शॉर्ट फिल्म अली अॅन्ड द बॉल जरुर बघा.
ती बघण्या आधी ररांनी केलेले जबरदस्त सुरेख परिक्षण वाचायला इथे क्लीक करा.
आतापर्यंत अहल्या, टि स्पुन आणि बायपास बघितल्या. तीनही जबरदस्त आहेत. बायपास तर अंगावर आली. अहल्या मधे राधिका आपटेला पाहुन सुखद धक्का बसला. ती चांगली अभिनेत्री आहे. टीस्पुन मधल्या अभिनेत्रीने सुध्दा अतिशय सुरेख काम केले आहे.
बाकिच्याही वेळ काढुन बघतोच
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Mon, 07/04/2016 - 12:52
नवीन
आजच बघितली
जी ए च्या कथेवर आधारीत आहे.
यात जुन्या कोकणातले जे वातावरण निर्माण केले ते निव्वळ अप्रतिम आहे.
https://www.youtube.com/watch?v=6HARYeqw5I8
- Log in or register to post comments
प
पुंबा
गुरुवार, 02/01/2018 - 08:40
नवीन
फार सुंदर.
अगदी अंगावर येणारा शेवट.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 07/07/2016 - 11:15
नवीन
बोल...
अतिशय उत्तम मांडणी या साठी तर जरूर पहवी...
https://www.youtube.com/watch?v=LzvMUncgvGo
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »