Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हायकू – एक काव्य प्रकार

उ — उल्का, Mon, 06/27/2016 - 14:54
अचानक पावसाची सर यावी आणि चिब भिजवून जावी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालंय. वाचनात अचानक एक हायकू आली आणि मला त्यात ओढून घेऊन गेली. हायकू पूर्वी ऐकली/वाचली तेव्हा साहित्य, काव्य ह्यात जेमतेम रस होता. त्यामुळे तेव्हा दुर्लक्षित राहिलेली हायकू आज मात्र वेड लावून गेली. तीन ओळींचे हे मुळचे जपानी काव्य निसर्गाशी जवळीक साधणारं, मनाला भिडणारं, समजायला खूप सोप्प असं आहे. ते क्लिष्ट नाहीये हाच मला आवडलेला त्याचा गुण म्हणेन मी. गुगल राजाला विविध प्रकारे आळवणी केल्यावर खूप माहिती वाचायला मिळाली. हायकूचे नियम कळले. 'हायकू' ही तीन ओळींची कविता. पूर्वार्धात एक विधान केलेले असते. उत्तरार्धात कलाटणी असते. पहिल्या व तिसर्‍या अथवा दुसर्‍या व तिसर्‍या ओळीत यमक साधलेले असते. तेव्हा आता प्रयत्न तर करायलाच हवा असे ठरवले. १. पहिला पाऊस आला घेऊन मातीचा सुवास नि एक तृप्त निश्वास २. झाडावरती सरडा चढला बदलत रंग जन त्यासी शोधण्यात दंग ३. पिल्लाने उघडली चोच आतून होती लाल लाल कावळा भरवी भुकेचा घास ४. निष्पर्ण झाड गर्द लाल झालं गुलमोहोराने बहरून गेलं ५. डांबरी रस्ता अचानक निळा निळा झाला जांभळांनी त्याला आपलासा केला माहित नाही हेच हायकू का ते? जाण्कारांनी प्रकाश टाकावा ही विनंती. त्यासाठीच इथे लिहिले आहे. पहिलाच प्रयत्न आहे. हे रोजचे दिसणारे स्तंभित करणारे माझे अनुभव आहेत हे नक्की. एक स्पष्ट करते की मी काही कवयित्री नाही. तेव्हा लगेच उत्कृष्ट हायकू जमेल असे कसे म्हणू मी? – उल्का कडले

प्रतिक्रिया द्या
14687 वाचन

💬 प्रतिसाद (36)
प
पद्मावति Mon, 06/27/2016 - 15:00 नवीन
सिंपल आणि स्वीट!! १ आणि ५ बेस्ट!!
  • Log in or register to post comments
उ
उल्का Mon, 06/27/2016 - 16:24 नवीन
धन्यवाद पद्मावति.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ए
एस Mon, 06/27/2016 - 15:28 नवीन
हायकूमध्ये फक्त एखादी घटना वर्णिलेली असते. मानवी भावभावना ह्या त्या घटनेतून अप्रत्यक्षरित्या केवळ सूचित केलेल्या असतात. त्यादृष्टीने तुमच्या त्रिवेण्यांना हायकू म्हणता येणार नाही. मित्सुबिशी बाशो यांच्या हायकू छान आहेत.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 06/27/2016 - 15:30 नवीन
*मात्सुओ बाशो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
उ
उल्का Mon, 06/27/2016 - 16:23 नवीन
प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद एसजी. मी त्याच पद्धतीने करायचा प्रयत्न केलाय. जमलं नाही तर. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
च
चतुरंग Mon, 06/27/2016 - 21:51 नवीन
तुमच्याच कल्पनांवरती थोडा फेरबदल करुन हायकू कदाचित असे दिसतील.... १. पहिला पाऊस मातीचा सुवास जमिनीचा तृप्त निश्वास २. रंगवला कुणी? झाडावरती करडा आत्ता सरडा! ३. एक घास काऊचा भुकेली चोच इवली लाल चिमुकली! ४. निष्पर्ण, गर्द लाल मनात गुलमोहोर! ५. डांबरी कुळकुळीत अचानक निळा निळा लगडला जांभळांनी! (हायकूप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 06/27/2016 - 22:02 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
उ
उल्का Tue, 06/28/2016 - 03:29 नवीन
रंगा भाऊ, खूप छान. 3 नं खूपच आवडली. शिरीष पै यांचा लेख ह्या लेखात शिरीष पै म्हणतात त्याप्रमाणे माझ्या त्या तीन ओळींच्या कविता झालेल्या आहेत. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अजया Tue, 06/28/2016 - 04:49 नवीन
उल्का, मिपावर शरद सरांचे लेख आहेत हायकुवर.नक्की वाच.
  • Log in or register to post comments
उ
उल्का Tue, 06/28/2016 - 06:19 नवीन
लिंक देऊ शकशील का? आवडेल मला वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
न
नाखु Tue, 06/28/2016 - 05:15 नवीन
हायकु प्रेमींनी इथेच आपली कला टंकावी म्हणजे सगळ्यांना वाचता येतील. चतुरंग यांची फेरजुळवणी म्हणजे तेच घटक ठेऊन केलेली "सुग्रास्+चवीष्ट" पाककृती. ======== देवा मायबापा पांडुरंगा ऐक लेकराची हाक कर पावसाचा दंगा ============== ता.क. आज वारीचे पिंपरी चिंचवडमध्ये आगमन म्हणून माझ्या तमाम शेतकरी बांधवांकडून विठ्ठलचरणी. मी मिपा वारकरी नाखु
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 06/28/2016 - 09:49 नवीन
================ रानातला पाचोळा नकळत पाउल पडले पाखरु उडुन गेले =============
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Tue, 06/28/2016 - 11:36 नवीन
ह्याचे हायकू करून दे, मनातील काही तनातील घाई पेनातील शाई संपलेली अभंगासारखे मी लिहीलयं, हायकू+अभंग = हायभंग (रसभंग झाला नाही म्हणजे मिळवली )
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 06/29/2016 - 06:20 नवीन
पेनातील शाई..संपलेली अरेरे...मग घ्या..संन्यास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर
म
माहितगार Fri, 07/01/2016 - 09:31 नवीन
तन-मन सैरभैर लाही लाही जन-मन रसभंग काहीबाही मौन-मना कुठे शोधतो, लेखणी नी शाई ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर
न
नाखु Tue, 06/28/2016 - 11:40 नवीन
एक एकदा केलेला प्रयत्न चारोळीवाला नाखु
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Tue, 06/28/2016 - 11:47 नवीन
माझ्या वरील प्रयत्नांना इतर कुणी म्हणायच्या आत, "तुम लिखताय कायकू" असे मीच मला म्हणतो,म्हणजे इतरांना संधी नाही.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 06/29/2016 - 06:17 नवीन
लालभडक तर्री ..कांदा लिंबू साथिला मिसळपाव . . लई खाव खाव सुटली राव
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 06/29/2016 - 08:29 नवीन
निष्पर्ण वॄक्षावर ..भर दुपारी कुठुन हि पालवी फुटली श्रावणाची चाहुल लागली
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 06/29/2016 - 09:36 नवीन
मुसळधार पाऊस कारवर बरसला वायपरचा हात दुखला! Sandy
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 06/29/2016 - 15:05 नवीन
हे हे हे कसलं भारी ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
य
यशोधरा Wed, 06/29/2016 - 15:18 नवीन
मुसळधार पाऊस कारवर बरसला वायपर रुसला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ब
बोका-ए-आझम Wed, 06/29/2016 - 20:47 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ए
एस Wed, 06/29/2016 - 22:17 नवीन
आभाळ भरलेलं विजेचा लोळ - एक तावदान थरथरलं
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 06/30/2016 - 04:19 नवीन
काही आमच्याही त्रिवेण्या इथे
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 06/30/2016 - 05:37 नवीन
चंदनाचा पाट सोन्याचे ताट भाजी अळणी
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 06/30/2016 - 05:59 नवीन
जरासा सुटलेला बराच सोडून दिलेला गुंता काही पाठ सोडेना सदा धांदरफळे "नाखु"
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/30/2016 - 08:08 नवीन
ठेवला तांब्या बाजूला विसरून गेले वैजूला गुर्जी काही लिहिनात
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 06/30/2016 - 08:16 नवीन
असं आहे. वर्षाव पडता प्रेमाचा विसर पडे वैजूचा तांब्या तिथे गौण भासे संध्यासमयी. अगोबामागे लपलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/30/2016 - 09:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस Sat, 07/02/2016 - 05:50 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सिरुसेरि Fri, 07/01/2016 - 07:20 नवीन
काहि गाजलेली मराठी गीतेही हायकु या प्रकारामधे येत असावीत असा कयास आहे . जसे की - "गेला गर्दीत मारुन धक्का धक्का धक्का द्वाड मवाली दिसतोय पक्का" "तु तेव्हा तशी तु तेव्हा तशी तु बहराच्या बाहुंची" "शुरा मी वंदिले धारातीर्थी तप ते आचरती सेनापती यश यांची बले" "नभ उतरु आलं अंग सरसरलं रान झिम्माड झालं हिरव्या बहरात "
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/01/2016 - 09:12 नवीन
उलका छान चतुरंग बदल खुप छान वाटताहेत.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Fri, 07/01/2016 - 10:16 नवीन
@ अविनाशकुलकर्णी,'ती'शाई नाही संपली रे बाबा,कुठे संन्यास देतोस. @माहीतगार, good improvisation,छान सुधारणा केलीत. @सिरूसेरी,चांगलं निरीक्षण..गाजलेली गीतं खरच हायकू वाटायला लागलीत.
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ Sat, 07/02/2016 - 08:09 नवीन
या काव्यप्रकाराची नेहमीच भुरळ पडते. मी केलेला एक प्रयत्न: जडावल्या तिन्हिसांजेला ओल्या पावसाचा गंध ... झुगारले सारे बंध ओला पाऊस दाटतो आभाळात अनवट ... भाळावरी मळवट चिंब रात्रीच्या उरात पेटलेली आग आग ... उगा अंधाराला जाग अंधाराच्या अंगावर उजेडाचा कवडसा ... पाण्यावर ओल्या रेषा
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ Sat, 07/02/2016 - 08:11 नवीन
या काव्यप्रकाराची नेहमीच भुरळ पडते. मी केलेला एक प्रयत्न: जडावल्या तिन्हिसांजेला ओल्या पावसाचा गंध ... झुगारले सारे बंध ओला पाऊस दाटतो आभाळात अनवट ... भाळावरी मळवट चिंब रात्रीच्या उरात पेटलेली आग आग ... उगा अंधाराला जाग अंधाराच्या अंगावर उजेडाचा कवडसा ... पाण्यावर ओल्या रेषा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा