Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुरज (हिंदी-उर्दू रचना आणि तिचा अनुवाद)

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 06/28/2016 - 11:55
न जाने क्या है वहाँ जो सुरज रोज सुबह उठकर बिना थके दिन के चारो पहर की सारी सीढीया चढ के ऊपर चला जाता है --- फिर कुछ देर दुनिया की जानिब घूरता रहता है मानो कोई जंग जित ली हो --- कभी कभी लगता है अपने परछाई को हराने का जूनून सवार है उसपे --- ओ सुरज, तुम बडे कब होगे? |-मिसळलेला काव्यप्रेमी-| (२७/०६/२०१६) जानिब = दिशा ---------------------------------------------------------------------- (अनुवाद) असं काय ठेवलंय त्या तिथं, की हा सूर्य रोज म्हणजे अगदी रोज सकाळीसकाळी उठून जराही न थांबता, दिवसाच्या चारी प्रहरांचे जिने चढून हा असा जाऊन बसतो वरती. --- आणि मग थोडा वेळ बघत बसतो एकटक दुनियेच्या पसार्‍याकडे एखादी मोठ्ठी लढाई जिंकून आल्याच्या थाटात --- झपाटून गेलाय जणू स्वतःच्याच सावलीला हरवायच्या नादात --- ए सूर्या, कधी रे होणारेस तू मोठा? -- एस (२८/०६/२०१६) ता. क. : एस भाऊंना मनापासून धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
2763 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ध
धनंजय माने Tue, 06/28/2016 - 12:04 नवीन
मिका, तुला ज्या भाषेत चांगलं सुचतंय त्याच भाषेत व्यक्त हो! अप्रतिम जमलिय. नेहमीप्रमाणेच
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/28/2016 - 12:07 नवीन
अनुवाद छान झालाय, पण मूळ रचनाच भिडली नाही. म्हणून अशी खास मजा घेता आली नाही. मिकासेठ, इतकं चांगलं वातावरण आहे, जरा आपल्या पोतडीतून वरीजनल काही येऊ दे...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 06/28/2016 - 13:11 नवीन
वरिजिनलच हाये वो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/28/2016 - 17:17 नवीन
व्वाहव्वा!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 06/28/2016 - 17:59 नवीन
मूळ रचना आणि अनुवाद दोन्ही मस्त. शेवटची ओळ खलास.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 06/28/2016 - 18:48 नवीन
मस्त रे मिका, मला आवडली. चॅलेंजिंग आहे कविता. . "ए सुऱ्या, लका शाना बन कि आता" असं गावठी व्हर्जन टाकूसं वाटतंय. ;)
  • Log in or register to post comments
न
निश Tue, 06/28/2016 - 19:09 नवीन
मिका साहेब....मस्त कविता
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 06/28/2016 - 19:39 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 06/28/2016 - 21:27 नवीन
दोन्हीही रचना छान झाल्या आहेत. कधी मोठा होणार हा फार थेट प्रश्न होतोय. आणि तो देखील कुणालातरी उद्देशून. आणि आधीची रचना कथन केल्यासारखी आहे. शेवटच्या ओळीत स्वगत ही चालले असते. क्या जाने कब समझेगा, यूं कोई बडा नही होता....
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 06/29/2016 - 04:21 नवीन
खरं तर तो प्रश्न सुर्याला उद्देशून नाहीच आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सिरुसेरि Wed, 06/29/2016 - 10:59 नवीन
मस्त कविता ... कुठे तरी "विक्रम वेताळ"शी साधर्म्य जाणवले .
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 07/02/2016 - 05:57 नवीन
अपने परछाई को हराने का जूनून सवार है उसपे
हे जास्त अस्सल वाटतयं अनुवादात इथेच (आणि फक्त इथेच) काहीतरी निसटले आहे. नक्की शब्दात सांगता येत नाही. कविता सुरेख.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 07/02/2016 - 08:50 नवीन
मस्त रे मिका. छानच लिहिली आहे.. अगदी मनापासुन.... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा