Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर…!!!

व — वटवट, Tue, 06/28/2016 - 13:20
कर…! काजळलेल्या राती.. पाजळलेली स्वप्नं.. कातरवेळी डोळ्यामधुनी.. पाझरलेली रत्नं.. मग, रत्नांच्या त्या गर्दीमध्ये.. गुरफटलेली धुंदी.. तू मी असता दुःख गं कसलं??... सारे काही आनंदी.. तू असताना दुःख सुद्धा गं रूप बदलते राणी.. वणव्याच्याही ओठी फुलती.. नाजूक फुलांची गाणी.. ऐक गं राणी, फुले सुद्धा ही नाहीत अगदी साधी… ह्याच फुलांनी बरी होते, शतजन्मांची व्याधी… शतजन्माची माझी व्याधी, बरी कराया ये ना… नक्षत्रांवर आपुली नावे, कोराया ये ना… चंद्र चंद्र मी.. रात्र रात्र तू.. होऊन होऊन जाशील… रोज सकाळी .. संध्याकाळी ... माझी कविता गाशील… ये ये माझी कविता गाण्यासाठी… माझी होऊन जाण्यासाठी… दोघे मिळून बांधून टाकू… पुढील शतजन्माच्या गाठी… सार्थक होईल ह्या जगण्याचे... तुझ्या गं राणी अस्तित्वाने… प्रश्न पडतो पदरी माझ्या, खरंच पडतील एवढी दाने??? भगवंतालाच आता साकडे.... "देवा.... इतुके माझ्यासाठी कर…!" आयुष्यभर करीन चुकता… "अगदी जो जो म्हणशील तो तो कर...!" . . . आयुष्यभर करीन चुकता… "अगदी जो जो म्हणशील तो तो कर...!" -चेतन दीक्षित

प्रतिक्रिया द्या
1408 वाचन

💬 प्रतिसाद (6)
न
निश Tue, 06/28/2016 - 19:07 नवीन
मस्त ...अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 06/28/2016 - 19:09 नवीन
ते कर शब्दाचे दोनतीन अर्थ होतात ना म्हणून शेवटचं जरा कंफ्युज झालं. बाकी कविता उत्तम.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 06/28/2016 - 19:11 नवीन
तुम्ही बार्शीकर का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
वटवट Sun, 07/10/2016 - 11:44 नवीन
होय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sun, 07/10/2016 - 12:21 नवीन
ह्ये जिगर, मिलाओ हाथ. मी पण बार्शीकर :) आता मिसळपाव लीगच्या मॅचेस होतील तेव्हा आपली सोलापूर लेखकटीम मजबूत पायजेल. तुम्ही आहेत भारी झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
ए
एकप्रवासी Wed, 06/29/2016 - 14:12 नवीन
आवडली कविता ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा