पैसा बचा डॉट कॉम
कुठे, केव्हा आणि काय खूप कमी किमतीत उपलब्ध होत याची चर्चा करता यावी म्हणून हा धागा काढतो आहे. धाग्याचा उद्देश ब्र्यांडेड उत्पादनांची किंमत वाढवून पून्हा सेल अथवा डिस्काऊंट दाखवून जाहीरात व्हावी असा नाही, सध्या इतर भाज्या महाग असताना बटाटे कांदे कमी दरात आहेत तर अशा ग्राहकोपयोगी उत्पादनांबद्दल कुठे, केव्हा आणि काय खूप कमी किमतीत उपलब्ध झाले/असते याची माहितीची मिपाकर वाचकांनी देवाण घेवाण करावी.
मिपावरील शेतकर्यांचे हित होईल का ? या धागा चर्चेत शेतकरी कसा नाडला जातो आणि आर्थीक फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यातील अडचणींची चर्चा झाली आहे. कुठे कोथींबीरीचे कुठे कांद्याचे किंवा अजून कशाचे भाव पडत असतात, अथवा कमी असतात, किंवा एखादा सिझन चालू आहे आणि किमती कमी झाल्या आहेत अशी माहिती या धाग्यास प्रतिसादातून मिळत रहावी अशी अपेक्षा.
किंवा काटकसर कशी करावी किंवा तुम्ही काटकसर कशी करता अथवा काटकसर करण्यातील तुमचे यश या बद्दलही या धाग्यातून चर्चा करण्याचे स्वागत असेल.
तर हा धागा म्हणजे आपले मिपावरचे पैसा बचा बचत करा .
उत्तरदायकत्वास नकारः या धाग्यातील प्रतिसादातून आलेल्या माहितीची शहानिशा स्व जबाबदारीवर करावी. आंतरजालावरील पैसाबचाडॉट कॉम नावाचे काही वेबसाईट असल्यास/आल्यास त्याचा या धागा लेखाशी काही संबंध नाही हे लक्षात घ्यावे
💬 प्रतिसाद
(22)
क
कंजूस
गुरुवार, 06/30/2016 - 08:47
नवीन
मी पयला.चांगला उपक्रम.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 06/30/2016 - 11:18
नवीन
चांगला उपक्रम. तसेच पैसे वाचविणार्य्या ऑनलाईन ऑफर बद्दलहि मिपाकरानी लिहावे
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 06/30/2016 - 11:35
नवीन
उत्तम उपक्रम. पैसे वाचवण्याच्या धाग्यात पहिला प्रतिसाद कंजुसाचा असावा हे योग्यच! मुळे आणल्यावर त्याचा पाला गृहिणी टाकून देतात असे दिसले आहे. त्या पाल्यात शेंगदाण्याचे कूट व दही घालून उत्तम कोशिंबीर होते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 06/30/2016 - 11:47
नवीन
अशा टिपा या धाग्याच्या उद्देश्यास अनुसरुन आहेत. संबंधीत पाकृ मिपावर असल्यास दुवे अवश्य द्यावेत म्हणजे जसे की कोथींबीरचे भाव पडले की कोथींंबीर ची पाकृचा दुवा अशा प्रतिसादांचे स्वागत.
प्रतिसादांसाठी आभार
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/01/2016 - 02:20
नवीन
मुळ्याची पालेभाजी सुद्धा करता येते. चविष्ट असते.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 06/30/2016 - 12:27
नवीन
खरं म्हणजे मुळ्याच्या पाल्यातच सर्व जीवनसत्त्वे असतात.सूज्ञ गृहिणी तो पाला टाकून देतात?अरेरे.भाजीविक्रेत्याला मी लहान मुळे दे असं सांगतो तेव्हा तो आनंदाने ते ( खूप पाला असलेले मुळे ) देतोच शिवाय इतरांनी न घेतलेला पालाही देऊन टाकतो.मलाही आनंद होतो. त्यादिवशी मुळादिवस साजरा होतो.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 06/30/2016 - 13:16
नवीन
मूळा निवासी काय करत असावेत
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 06/30/2016 - 15:04
नवीन
अतिषय सुंदर संकल्पना !
दरवर्षी जानेवारी मध्ये आमच्या सातार्यात जिल्हापरीषद ग्राऊंड्वर तांदुळ महोत्सव भरतो , त्या थिथे आपण डायरेक्ट शेतकर्यांकडुन माल विकत घेवु शकता ! अतिषय उत्कृष्ठ दर्जाचा शिवाय हातसडीचा आणि वेगवेगळ्या वाणांचा तांदुळ अत्यंत रास्त भावात विकत मिळतो :)
तसेच सातार्याच्या जुन्या मंडईत कधीकधी जे शेतकरी स्वतःचा तांदुळ घेवुन येतात तोही उत्तम असतो. काही शेतकरी स्वतःच्या तॅम्पोत घालुन पालेभाज्या विकायला थांबलेले असतात राजवाड्याजवळ ( दर थोडासा महाग असला तरी क्वालिटी बर्याचदा उत्तम असते असे पाहण्यात आलेले आहे !)
(प्रतिसाद लिहिताना जाणवले की इथे पिचि मध्ये येवुन तब्बल २ वर्षे झाली तरी अशी ठिकाणे माहीत नाहीत , आता एकदा नाखुनकाका आणि चौराकाकां सोबत गावात फिरायला पाहिजे !)
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 06/30/2016 - 15:27
नवीन
चिंचवडात मोरया गोसावी पार्क जवळ जे मोठे ग्राऊंड आहे तेथे अशी टेंपोमध्ये भरून भाजी विकायला येते.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 06/30/2016 - 15:22
नवीन
घरातली सगळी कामे स्व्तःच करतो. भांडी घासणे, केर काढणे ते मुलीची दुपटी धुण्यापर्यंत. यामुळे नोकरांवरचा खर्च वाचतो. त्या वाचलेल्या पैशात महिन्याला ३-४ बिअर, एक क्वार्टर घेता येतात. झालच तर धावण्याचे बूट किंवा सौ. ने काही कारणाने उद्धार केला असेल तर तिला एखादा ड्रेस किंवा एखादा ट्रेक वगैरेही होते.
दारु पिण्यावर वेगळे पैसे खर्च होत नाहीत. शिवाय बायकोला ओरडायला स्कोप राहात नाही ते निराळे.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 06/30/2016 - 23:43
नवीन
ते शिवसेनेच्या पाठिंब्यातून पुण्यात जे भाजी बाजारे सुरु झालेत त्यांचा आधी बराच बोलबाला होता. भाज्यांचे दरही वाजवी होते. ऐकीव माहितीप्रमाणे आता आजूबाजूच्या भाजीवल्यांचा व्यवसाय कमी झाल्याने त्यांनी त्यांचेच लोक भाज्या घेऊन त्या बाजारात बसवलेले असतात. तेथील भाजी घेणे आता कितपत विश्वसनीय राहिले असावे?
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Fri, 07/01/2016 - 02:36
नवीन
केवळ कमी दर किंवा सवलत / डीस्कौंत हा खरेदीचा निकष ठेवत नाही. सस्ता रोये बार बार हे बऱ्याच वेळा खर ठरत...
दैनंदिन किरकोळ खरेदी करतांना, विकणारा मालात काहीतरी खोट असल्या शिवाय विकताना आपण होऊन १ रुपया सुद्धा स्वस्त देणार नाही (दुकानात) अशी माझी धारणा झालेली आहे .
food बझार मध्ये दर बुधवारी अतीमहाप्रचंड सेल बिल असतो आमच्या हापिसच्या खाली असल्याने १ २ वेळा जाऊन बघितले. सगळे खाण्याचे आयटम्स अतिशय जुने, एक्सपायरी संपायला आलेले असेच असतात.
आणि भाज्या वगैरे विकणारे जर वृद्ध, गरीब असतील तर भाव सुद्धा नं विचारता खरेदी करतो.
पण मस्तवाल भैया असेल तर आधी खरेदी पूर्ण करून मग टोटल वर मजबूत घासाघीस
तथापि
इलेक्ट्रोनिक वस्तु (अगदी क्रोमा बिमा मध्ये सुद्धा) , गाडी सर्व्हिसिंग आदि सेवा घेतांना मन:पूत घासाघीस करून घसघशीत सवलत मिळवल्या शिवाय सोडत नाही ...
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/01/2016 - 07:56
नवीन
कमी किमतींची आमिषे दाखवून चिटींग केले जाऊ शकते, जसे काही वर्षा पूर्वी पुण्यात उपवासाच्या दिवशी भेसळयूक्त भगर अत्यंत स्वस्तात विकली गेली ज्यामुळे खाणार्यांना गंभीर शारीरीक परिस्थितींना तोंड द्यावे लागले आपण दाखवलेली नाण्याची एक (खेदकारक) बाजू बद्दल सहमत आहे.
अर्थात मागणी पेक्षा पुरवठा अधिक असणे, अधिक व्हॉल्यूमची विक्री करणे शक्य असणे, एखाद्या विशीष्ट ठिकाणी घाऊक बाजारात किरकोळ विक्री होत असणे, क्वालिटी चांगली असूनही ब्रँडींग झालेले नाही अथवा किंवा ब्रँड नवीन आहे म्हणुन प्रोत्साहनात्मक योजना या जेनुआईनही असू शकतात.
जसे भगरीचे वाईट उदाहरण दिले तसे एक चांगलेही उदाहरण देतो, नवीन प्रॉडक्ट्सच्या लाँच मध्ये एकदा मी लसूण सोलण्यास सोपी जाणारी रबरी नळी १५ रुपायात कुठल्याशा एक्झिबीशन मध्ये घेतली सहा महिन्या नंतर त्याचीच दुकानांमधली किमंत अवाजवी मोठी असल्याचाही अनुभव घेतला.
आपण मॉल्सचा उल्लेख केलात सुपर शॉपींमध्ये अधिक मार्जीन असलेल्या गोष्टी रॅक मध्ये ग्राहकाच्या नजरेच्या लेव्हलला ठेवल्या जातात, कमी किंमत अथवा मार्जीन कमी असलेल्या वस्तु रॅकच्या तळाशी ठेवल्या जातात.
एका प्रसिद्ध सुपरशॉपीच्या फळ विभागात सेम क्वालीटी फ्रेश अॅपल्स डिस्काऊंटेड आणि नॉन डिस्काऊंटेड दोन्ही प्रकारच्या रॅकवर ठेवली जात-डिस्काऊंटेड रॅकवरची अॅपल्स मार्केटपेक्षाही बरीच स्वस्त असंत-, ग्राहकाला चीट करण्याची पद्धत क्वालीटीशी तडजोड करुन नव्हती, दर पंधरा दिवसांनी डिस्काऊंट लेबल असलेला रॅक बदलला जायचा म्हणजे सहसा ग्राहक नेहमी सवय असलेल्या रॅकवरुन अॅपल उचलेल पहिल्यांदा घेताना प्राईस टॅग वगैरे सगळे पाहील पण त्याच्या नंतरच्या भेटींमध्ये प्राईस टेग्स चेक करणार नाही आणि इतर सामाना सोबत जास्त किमतीच्या वस्तू तुमच्या बास्केटमध्ये भरल्या गेल्या तुमचे तुम्हालाही कळणार नाही. असो.
घासाघीस हि एक कला आहे आणि त्यावर एक वेगळा धागा लेख घासाघीस कुशलांनी टाकावयास हवा.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 07/01/2016 - 08:45
नवीन
ह्या इथे जॉर्ज सिडेल सरांचा निगोसियेशन्स स्किल्स्स विषयीचा अप्रतिम कोर्स उपलब्ध्द आहे !
https://www.coursera.org/learn/negotiation-skills
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/01/2016 - 08:04
नवीन
माझ्या एका मिपावरील कवितेतून
वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा
खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा...
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 07/01/2016 - 08:10
नवीन
घासाघीस च्या उलटही एक पद्धत आहे.
मी गेली तीन वर्षे आंबे एकाच बंगाली माणसाकडून घेतो. तीन वर्षात या वर्षाच्या सुरुवातीला निघालेला एक खराब आंबा सोडला तर सर्वच्या सर्व आंबे उत्कृष्ट निघाले. आंबा महोत्सवाच्या किंवा इतर विक्रेत्यांच्याच भावात आंबे मिळाले परंतु प्रत्येक आंबा उत्तम दर्जाचा निघाला. आमच्या वडिलांनी कोकणातून आणलेल्या आंब्यांपेक्षा( २५० रुपये डझन यात १५% खराब निघाले ) याचे आंबे मोठे आणि जास्त चवदार होते (३०० रुपये डझन होते.)
पहिला पाऊस पडल्यावर त्याने सरळ सांगितले की सर हापूस आंबे तुम्हाला देण्यासारखे नाहीत. त्याऐवजी उत्तम असे केशर आंबे त्याने दिले.
एकदा हा ग्राहक आपल्याकडेच येणार ही खात्री असेल तर विक्रेते तुम्हाला वाजवी भावात माल देतात आणि दर्जा सुद्धा उत्तम मिळतो.
आमचा बेकरीवाला सुद्धा असाच आहे. तो सर्वात ताजा आलेला पाव/ ब्रेड देतो. एक दिवस शिळा असेल तर सरळ सांगतो साहेब हा तुमच्यासाठी नाही.
माणसं जोडलेली असतील तर उत्तम दर्जा मिळण्याची खात्री असते.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 07/01/2016 - 08:21
नवीन
१००% सहमत
- Log in or register to post comments
ग
गंम्बा
Fri, 07/01/2016 - 08:39
नवीन
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जिथे तुम्ही रेग्युलर खरेदी करणार असाल अश्या ठीकाणी, गिर्हाइकानी आपल्यावर विश्वास ठेवला आहे असे दिसले ( आणि आपण ते दाखवुन दिले ) तर विकणार्यांना पण नैतिक जबाबदारी वाटते आणि फसवणुक होत नाही.
तसेही तुम्ही डॉक्टर असल्याचे हे काही इम्प्लिसिट फायदे आहेत असा तुम्ही विचार करुन बघितला आहे का?
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Fri, 07/01/2016 - 09:24
नवीन
आमचे तीर्थरूप अगदी असेच म्हणतात आणि त्यांना तुम्ही म्हणता तसेच अनुभव येतात.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 07/01/2016 - 08:24
नवीन
बाकी विषय आलाच आहे म्हणून सांगतो.
मध्यंतरी एका मोठ्या सुपरमार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा बरेच चांगले चांगले ब्रँड गायब झालेले पाहिले, किंवा कदाचित अडगळीत टाकले गेलेले पाहिले.
१. हार्पिक
२. गिट्स
३. जेमिनी शेंगतेल इत्यादी.
बिस्किटे आणली ते मोडकी
मनच उडाले त्या दुकानावरून. मॉलचे नाव अमेरिकेतिल एका प्रसिद्ध शृंखलेवरून बेतलेले आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/01/2016 - 08:34
नवीन
असे होण्यास पडद्या मागच्या शक्यतांची संख्या बरीच असू शकते.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 07/01/2016 - 09:48
नवीन
आंबे खाउन झाल्यावर कोयी,साली पाण्यात टाकाव्यात व पाणी उकळावे.हे पाणी मग भातात घालून उत्तम आमरस भात तयार होतो.
- Log in or register to post comments